एक्स्प्लोर
कैलास सत्यार्थी यांचा नोबेल पुरस्कार चोरला!

नवी दिल्ली : नोबेल पुरस्कार विजेते आणि सामाजिक कार्यकर्ते कैलास सत्यार्थी यांच्या घरी चोरी झाली आहे. चोरट्यांनी नोबेल पुरस्काराची प्रतिकृती लांबवली आहे. नवी दिल्लीतील अलकनंदा अपार्टमेंटमध्ये काल (सोमवार) रात्री ही चोरी झाली. चोरटे घराचं कुलुप तोडून आत घुसले आणि नोबेल पुरस्काराच्या प्रतिकृतीसह दागिने आणि रोकडही लंपास केली. कैलास सत्यार्थी एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी परदेशात आहेत. घरात कुणीही नसल्याचं हेरत चोरट्यांनी डाव साधला बालहक्क संरक्षण कार्यकर्ते असलेले कैलाश सत्यर्थी यांना 2014 मध्ये शांततेच्या नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. 'बचपन बचाओ आंदोलन' या संस्थेचे ते संस्थापक आहेत.
आणखी वाचा























