एक्स्प्लोर

मोहरमच्या दिवशी दुर्गा मूर्ती विसर्जनावर ममता बॅनर्जींची बंदी

दोन्ही सण एकाच दिवशी आल्याने समाजामध्ये वाद निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेतल्याचं ममता सरकारचं म्हणणं आहे.

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 1 ऑक्टोबरला दुर्गा मूर्तींच्या विसर्जनावर बंदी घातली आहे. ममतांच्या या निर्णयामुळे वाद होण्याची शक्यता आहे. यंदा दुर्गा विसर्जन आणि मोहरम एकाच दिवशी म्हणजे 1 ऑक्टोबरला आहे. मोहरममुळे दुर्गा पुजेनंतर होणाऱ्या विसर्जनावर 30 सप्टेंबर संध्याकाळी 6 पासून 1 ऑक्टोबरपर्यंत बंदी राहिल. विसर्जन 2,3, 4 ऑक्टोबरला करता येईल, असं ममता बॅनर्जी यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. https://twitter.com/MamataOfficial/status/900394210116775936 https://twitter.com/MamataOfficial/status/900395774466334720 दोन्ही सण एकाच दिवशी आल्याने समाजामध्ये वाद निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेतल्याचं ममता सरकारचं म्हणणं आहे. "यंदा दुर्गा विसर्जन आणि मोहरम एकाच दिवशी आहे. सणांच्या काळात आपल्याला शांतता राखायला हवी. मी पोलिसांना पूजा आणि मोहरम समितींशी बातचीत करण्यास सांगेन. जिथून मोहरमचे जुलूस जातील तिथे बॅरिकेट्स लावले जातील. जेणेकरुन दोन्ही समुदायांच्या मिरवणुकींचा सामना होणार नाही. यासंदर्भात पूजा समित्यांना महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागेल. कोणतीही अप्रिय घटना घडू नये याची काळजी घ्यावी. आम्ही दंगली भडकावण्याची परवानगी देत नाही," असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. ममता बॅनर्जी यांच्या घोषणेनंतर भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. या निर्णयाविरुद्ध कोर्टात जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं. भाजपचे राष्ट्रीय महासचिव राहुल सिन्हा यांच्या मते, "ममता सरकार मनमानी करत आहे. त्यांनी हिंदू सणावर बंदी घातली आहे. केवळ अल्पसंख्यांकांना खुश करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. सरकारने रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवरही बंदी घातली आहे. या या प्रकरणी कोर्टात जाणार आहोत." विशेष म्हणजे गेल्यावर्षीही असाच प्रसंग उद्धभवला होता. त्यावेळी कोलकाता हायकोर्टाने ममता सरकारला धारेवर धरुन हा आदेश रद्द केला होता. राज्य सरकारचा निर्णय मनमानी करणारा आणि विशेष समुदायाला खुश करण्याचा प्रयत्न असल्याचं हायकोर्टाने सांगितलं होतं.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vivek Bhimanwar : विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?

आदित्य ठाकरेंच्या वरळीत शिवसेनेत नाराजी; तिकीट न मिळाल्याने शाखाप्रमुखाचा राजीनामा, दोन पदाधिकाऱ्यांचीही निराशा

कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा

व्हिडीओ

Nitin Deshmukh : निवडणुकीतून माघार पण शरद पवारांना सोडू शकत नाही,नितिन देशमुख EXCLUSIVE
NCP Merger Vastav 256 : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठीचं पहिलं पाऊल? कार्यकर्त्यांची कोंडी?
Bala Nandgaonkar : निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना काय कानमंत्र दिला?
Sanjay Raut PC : शरद पवारांच्या आत्मचरित्रात सारं ब्लॅक अँड व्हाइट आहे - संजय राऊत
Nawab Malik NCP : नवाब मलिकांच्या घरातील तिघांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vivek Bhimanwar : विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
आदित्य ठाकरेंच्या वरळीत शिवसेनेत नाराजी; तिकीट न मिळाल्याने शाखाप्रमुखाचा राजीनामा, दोन पदाधिकाऱ्यांचीही निराशा
आदित्य ठाकरेंच्या वरळीत शिवसेनेत नाराजी; तिकीट न मिळाल्याने शाखाप्रमुखाचा राजीनामा, दोन पदाधिकाऱ्यांचीही निराशा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय

पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?

मोठी बातमी : भाजपनं पुरतं घेरलं, शिंदेसेनेचे रवींद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीला; बायको, मुलाला उमेदवारी नाकारल्याने वेगळा पर्याय?

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 डिसेंबर 2025 | सोमवार

Embed widget