(Source: ECI/ABP News/ABP Majha)
New Wage Code : 'वेज कोड' तुर्तास लागू नाही, पगारातील बदल टळला, कंपन्यांसह नोकरदारांना मोठा दिलासा
एक एप्रिल 2021 पासून लागू होणारा नवा वेज कोड (New Wage Code) तुर्तास लागू करण्यात आलेला नाही. यामुळं कंपन्यांसह नोकरदारांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे. कामगार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार नव्या वेज कोडला काही काळापुरतं टाळण्यात आलं आहे.
नवी दिल्ली: आज एक एप्रिल 2021 पासून लागू होणारा नवा वेज कोड (New Wage Code) तुर्तास लागू करण्यात आलेला नाही. यामुळं कंपन्यांसह नोकरदारांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे. कामगार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार नव्या वेज कोडला काही काळापुरतं टाळण्यात आलं आहे. यामुळं एक एप्रिल 2021 पासून कर्मचाऱ्यांच्या सॅलरी स्ट्रक्चरमध्ये बदल होणार नाही. त्यामुळं आता टेक-होम सॅलरी (Take Home Salary) मध्ये देखील कपात होणार नाही.
EPFO बोर्डाचे सदस्य विर्जेश उपाध्याय यांनी सांगितलं की, सरकारकडून जोपर्यंत नवं नोटिफिकेशन जारी होत नाही, तोपर्यंत नव्या निर्णयाची अंमलबाजवणी होत नाही. 1 एप्रिलपासून नवी वेतन नियमावली लागू होणं कठीण आहे. मागील काही दिवसांपासून वेज कोड चर्चेत आहे. हा नवीन कोड एक एप्रिलपासून लागू होणार होता. तज्ञांच्या मतानुसार या वेज कोडमध्ये काही ऋटी असल्यानं याला लागू करण्यात अडचणी आहेत.
काय आहे नवीन वेज कोड (New Wage Code)
वेज कोड अॅक्ट (Wage Code Act), 2019 नुसार कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना दिला जाणारा पगार म्हणजेच कॉस्ट टू कंपनीच्या (CTC) 50 टक्के रक्कम बेसिक आणि 50 टक्के भत्ता अशा रुपात द्यावी लागणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांच्या एकूण पगाराची 50 टक्के रक्कम आधीच बेसिक आहे त्यांच्यावर या नव्या नियमांचा काहीही परिणाम होणार नाही. ज्यांची बेसिक सॅलरी एकूण रकमेच्या 30 ते 40 टक्के आहे, त्यांच्या हातात येणाऱ्या पगारात मात्र कपात होईल.
New income tax rules | 1 एप्रिलपासून नवे आयकर नियम लागू, जाणून घ्या काय आहेत नवे नियम?
सॅलरी स्ट्रक्चर बदलणार
वेज कोड अॅक्ट (Wage Code Act), 2019 लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचं सॅलरी स्ट्रक्चर पूर्णपणे बदलणार आहे. कर्मचाऱ्यांचा हातात येणारा पगार (Take Home Salary) कमी होईल. कारण Basic Pay वाढल्यामुळं त्यांचा पीएफ जास्त कट होणार आहे. त्यामुळं ते भविष्यासाठी चांगलं असणार आहे. तसंच पीएफसोबत ग्रॅच्युएटी (Monthly Gratuity)देखील वाढणार आहे.