New income tax rules | 1 एप्रिलपासून नवे आयकर नियम लागू, जाणून घ्या काय आहेत नवे नियम?
केंद्र सरकारने बदललेले नवीन आयकर नियम (New income tax rules) 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत. हे बदल फेब्रुवारीमध्ये मांडलेल्या अर्थसंकल्पात (Budget 2021) नमूद करण्यात आले होते.
नवी दिल्ली : फेब्रुवारीमध्ये मांडण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2021 मध्ये आयकराच्या नियमांत काही बदल करण्यात आले होते. ते बदल आता उद्यापासून, म्हणजे 1 एप्रिलपासून सुरु होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षात लागू होणार आहेत. या नवीन आयकर नियमात काय बदल करण्यात आले आहेत ते पाहू.
EPF मध्ये बदल
या वर्षीपासून आता केंद्रीय अर्थमंत्र्यांनी EPF म्हणजे कर्मचारी भविष्य निधीवरही कर लावायची घोषणा केली होती. उद्यापासून लागू होणाऱ्या नव्या नियमामध्ये, 2.5 लाख रुपयांच्या पेक्षा जास्त पीएफवर मिळणाऱ्या व्याजावर तुम्हाला कर द्यावा लागणार आहे. ज्यांचे पगार जास्त आहेत त्यांना डोळ्यासमोर ठेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
आयकर भरायला सोपं
या नव्या नियमानुसार आता आयकर भरण्यामध्ये अधिक सुलभता येणार आहे. आयकर भरणाऱ्या लोकांना डोळ्यासमोर ठेऊन सरकारने टॅक्स रिटर्न फाईल करण्याची प्रक्रिया सोपी केली आहे. तसेच आयटीआर फाईल करणेही सोपं झालं आहे.
TDS दुप्पट होणार
केंद्र सरकार आयटीआर फाईलिंग करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. जे लोक आयटीआर फाईल करणार नाहीत त्यांना दुप्पट TDS द्यावा लागेल असं केंद्राने स्पष्ट केलं आहे. केंद्र सरकारने आयकर कायद्यामध्ये नवीन सेक्शन 206B जोडले आहे. त्यानुसार आता आयटीआर फाईल न केल्यास 1 एप्रिलपासून दुप्पट TDS भरावा लागणार आहे.
नव्या आयकर कायद्यानुसार, पीनल टीडीएस आणि टीसीएल 10 ते 20 टक्के इतके झाले आहे. ते या आधी 5-10 टक्के इतके होते. आयटीआर दाखल न करणाऱ्यांसाठी टीडीएस आणि टीसीएस हा 5 टक्क्याचा दर दुप्पट होणार आहे.
वयोवृद्धांना टॅक्स रिटर्नचा दिलासा
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 75 वर्षावरील वृद्धांना टॅक्स रिटर्नमध्ये दिलासा देणार असल्याचं सांगितलं होतं. 1 एप्रिलपासून 75 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या लोकांना टॅक्स रिटर्न फाईल करण्याची गरज नाही. जे लोक पेन्शन वा फिक्स डिपॉजिटच्या व्याजावर अवलंबून आहेत अशा ज्येष्ठ नागरिकांना ही सवलत असणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Gold Silver Price | सोन्याच्या भावात 640 रुपयांची वाढ तर चांदी 1800 रुपयांनी घसरली
- WB Election 2021 | "देशद्रोह्यांना योग्य उत्तर देईल", नंदीग्राममधील प्रचारसभेत ममता बॅनर्जी यांचा शुभेन्दु अधिकारी यांच्यावर निशाणा
- Indian Railway | रात्रीच्या वेळी रेल्वेत मोबाईल, लॅपटॉप चार्ज करता येणार नाहीत; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय