(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Corona Vaccine | रिलायन्सच्या सर्व कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना मिळणार कोरोनाची मोफत लस, नीता अंबानी यांची घोषणा
रिलायन्स कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबाच्या वॅक्सीनेशनचा सर्व खर्च स्वत: करणार असल्याची माहिती नीता अंबानी यांनी दिली आहे.
मुंबई : देशभरात सध्या कोरोना लसीकरणच्या मोहिमेला सुरुवात झालेली आहे. लसीकरणाचा दुसऱ्या टप्प्यालादेखील 1 मार्च पासून सुरुवात झाली आहे. दरम्यान लसीकरणासंदर्भात रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष नीता मुकेश अंबानी यांनी मोठी घोषणा केली आहे. रिलायन्स कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबाच्या वॅक्सीनेशनचा सर्व खर्च स्वत: करणार आहे.
नीता अंबानी म्हणाल्या, कोरोनावर लवकरच आपण सर्वजण मात करूच परंतु तोपर्यंत काळजी घेणे गरजेचे आहे. हे लढाई आता शेवटच्या टप्प्यात आहे. मी आणि मुकेश अंबानी यांनी निर्णय घेतला की, आम्ही रिलायन्सच्या सर्व कर्मचाऱ्यांना आणि कुटुंबातील सदस्यांना विनामूल्य वॅक्सीन देणार आहे.
"ज्या कर्मचाऱ्यांना वॅक्सीन घ्यायचे आहे. त्यांनी सरकारी पोर्टलवर नोंदणी करावी. जेणेकरून आपण कोरोनावर लवकरात लवकर मात करू शकेल, असे आवाहन देखील नीता अंबानी यांनी कर्मचाऱ्यांना केले आहे. लसीकरणाचा दुसरा टप्पा 1 मार्चपासून सुरू झाला आहे.
इंफोसिस आणि अॅक्सेंचरचा फ्री लसीकरणचा निर्णय
आयटी क्षेत्रातील इंफोसिस आणि सॉफ्टवेयर कंसल्टिंग फर्म एक्सेंचर या दोन दिग्गज कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबियांनाही कोरोना लस मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. काही लोकांचा लसीकरणाचा पहिला डोस घेऊन झाला आहे. लसीकरणाचा दुसऱ्या टप्प्यालादेखील 1 मार्च पासून सुरुवात होत आहे. यात 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनाही लस देण्यात येणार आहे. त्यासोबतच 45 वर्षांवरील रुग्ण व्यक्तींनाही लस देण्यात येणार आहे. अशातच लसींची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनीही आपल्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचसोबत आयटी क्षेत्रातील इंफोसिस आणि सॉफ्टवेयर कंसल्टिंग फर्म एक्सेंचर या दोन दिग्गज कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबियांनाही कोरोना लस मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.
आतापर्यंत 90 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या लसीचा पहिला डोस
आतापर्यंत नऊ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 90 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. झारखंड, कर्नाटक, तामिळनाडू आणि गुजरात ही राज्ये आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशातील 100 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. सुरुवातीला कोरोनाची लस घेण्यासाठी लोक घाबरत असल्याचं दिसून आलं होतं. कोरोनाच्या लसीबद्दल पसरणाऱ्या अफवांमुळे लोक असं करत होते. पण गेल्या काही दिवसात कोरोनाच्या लसीबद्दल जागरुकता निर्माण झाल्याचं पहायला मिळालंय. ओडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीलगड या सोबत नऊ राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशांनी आपल्या 75 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस दिली आहे.
संबंधित बातम्या :