Corona Test : देशात कोरोना चाचणीचा नवा विक्रम, गेल्या 24 तासात सर्वाधिक 20.66 लाख चाचण्या
देशात सलग नवव्या दिवशी नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या 24 तासात 3 लाख 57 हजार 630 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असताना, कोरोना चाचण्याची वाढल्या आहेत. गेल्या 24 तासात 20.66 लाखांपेक्षा जास्त चाचण्या करुन भारताने एका दिवसात सर्वाधिक चाचण्या करण्याचा नवा विक्रम पुन्हा एकदा रचला आहे. सलग चार दिवस दररोज 20 लाखांपेक्षा जास्त चाचण्याही करण्यात आल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. दैनंदिन पॉझिटीव्हिटी दरात 12.45 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. देशात गेल्या 24 तासात एकूण, 20,66,285 चाचण्या करण्यात आल्या आहेत.
देशात सलग सहाव्या दिवशी 3 लाखांपेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत. देशात सलग नवव्या दिवशी नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या 24 तासात 3 लाख 57 हजार 630 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या आज 2 कोटी 30 लाख 70 हजार 365 झाली. रुग्ण बरे होण्याचा दर वाढून 87.76 टक्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, देशातील एकूण सक्रीय रुग्णसंख्येत घट होत ती आज 29 लाख 23 हजार 400 वर पोहोचली आहे. देशातील एकूण सक्रीय रुग्णांपैकी ही संख्या 11.12 टक्के आहे.
देशात आतापर्यंत लसीच्या एकूण 19.33 कोटी मात्रा दिल्या
देशात लसीकरण मोहीमेत आतापर्यंत एकूण 19.33 कोटी मात्रा देण्यात आल्या आहेत. आज सकाळी सात वाजेपर्यंत, एकूण 19 कोटी 33 लाख 72 हजार 819 लसीच्या मात्रा 27 लाख 76 हजार 936 सत्रांमध्ये देण्यात आल्या. देशभरात आतापर्यंत झालेल्या एकूण लसीकरणापैकी 66.30 टक्के मात्रा दहा राज्यात दिल्या आहेत.
इतर संबंधित बातम्या
- Corona Update : कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ, गेल्या 24 तासात 2.76 लाख नव्या रुग्णांची भर तर 3,874 जणांचा मृत्यू
- Covid19 Sputnik V vaccine: देशात ऑगस्ट महिन्यात सुरु होणार स्पुटनिक V चे उत्पादन
- कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड लस घेतलेल्यांना आंतरराष्ट्रीय प्रवासाला अडचण नाही, सरकारचं स्पष्टीकर
- Jammu and Kashmir | कोरोना लसीकरणात जम्मू-काश्मीरमध्ये विक्रम; राष्ट्रीय सरासरीच्या दुप्पट लसीकरण