Corona Vaccination : लसीकरण मोहिमेत नवा विक्रम; एका दिवसात 88 लाखांहून अधिक जणांचं लसीकरण
वयोगटानुसार लसीकरण बघितले तर 17 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत 60 वर्षांवरील 22.4 टक्के, 45-60 वयोगटातील 32 टक्के आणि 18-44 वयोगटातील 45.6 टक्के लोकांना लस देण्यात आली आहे.
नवी दिल्ली : देशात सोमवारी 88.13 लाखांहून अधिक कोरोना लसीचे डोस देण्यात आले. लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून एका दिवसात झालेलं हे सर्वाधिक लसीकरण आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते, भारतातील 46 टक्के प्रौढ लोकसंख्येला कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे आणि 13 टक्के लोकसंख्येला दोन्ही डोस देण्यात आले आहेत.
भारतात, कोरोना लसीचा सर्वाधिक डोस सोमवारी एकाच दिवशी देण्यात आला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 16 ऑगस्ट रोजी लसीकरण मोहिमेअंतर्गत 88 लाख 13 हजार 919 लसीचे डोस देण्यात आले. ज्यात पहिल्या आणि दुसऱ्या डोसचा समावेश आहे. यासह, भारताचे लसीकरण वाढून 55 कोटी 47 लाख 30 हजार 609 झाले आहे. त्यापैकी 43 कोटी 11 लाख 94 हजार 809 लोकांना पहिला डोस देण्यात आला आहे. 12 कोटी 35 लाख 35 हजार 800 लोकांना दोन्ही देण्यात आले आहेत.
जर वयोगटानुसार लसीकरण बघितले तर 17 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत 60 वर्षांवरील 22.4 टक्के, 45-60 वयोगटातील 32 टक्के आणि 18-44 वयोगटातील 45.6 टक्के लोकांना लस देण्यात आली आहे.
लसीकरणाची एकूण आकडेवारी
- 1 कोटी 03 लाख 50 हजार 941 आरोग्य सेवकांना पहिला डोस मिळाला आहे. तर 81 लाख 20 हजार 754 आरोग्यसेवकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत.
- 1 कोटी 82 लाख 86 हजार 002 फ्रंटलाइन कामगारांना पहिला डोस कप 1 कोटी 22 लाख 44 हजार 940 फ्रंटलाईन कामगारांना दोन्ही डोस दिले आहेत.
- 18 ते 44 वयोगटात 20 कोटी 20 लाख 24 हजार 963 लोकांना पहिला डोस देण्यात आला. तर 1 कोटी 61 लाख 02 हजार 484 लोकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत.
- 45 ते 59 वयोगटात 11 कोटी 87 लाख 86 हजार 699 लोकांना पहिला आणि 4 कोटी 64 लाख 06 हजार 915 नागरिकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत.
- 60 वर्षांवरील 8 कोटी 17 लाख 46 हजार 204 लोकांना पहिला डोस मिळाला आहे आणि 4 कोटी 06 लाख 60 हजार 707 लोकांना दोन्ही डोस मिळाले आहेत.
इतर बातम्या :