Corona Updates : 5 महिन्यानंतर देशात सर्वात कमी दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद; 24 तासांत 25 हजार रुग्ण
India Coronavirus Updates : देशात गेल्या 24 तासांत 25,166 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 437 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

India Coronavirus Updates : भारतात कोरोना संसर्गामध्ये घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. पाच महिन्यांनी सर्वात कमी दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 25,166 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 437 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी 15 मार्च रोजी 24,492 रुग्णांना कोरोनाची लागण झाली होती. तसेच देशभरात गेल्या 24 तासांत 36,830 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
कोरोनाची एकूण आकडेवारी
कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 22 लाख 50 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 32 हजार 79 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 14 लाख 48 हजार लोक कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या चा लाखांहून कमी आहे. एकूण 3 लाख 69 हजार रुग्णांवर अद्यापही उपचार सुरु आहेत.
देशातील सध्याची कोरोनास्थिती :
कोरोनाची एकूण आकडेवारी : तीन कोटी 22 लाख 50 हजार 679
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 14 लाख 48 हजार 754
सक्रिय रुग्णांची एकूण आकडेवारी : तीन लाख 69 हजार 846
एकूण मृत्यू : चार लाख 32 हजार 79
लसीकरणाची एकूण आकडेवारी : 55 कोटी 47 लाख 30 हजार लसींचे डोस
राज्यात काल (सोमवारी) 4,145 नव्या कोरोनाबाधितांची नोंद
राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून कमी होऊ लागली आहे. काल (सोमवारी) 4,145 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 5 हजार 811 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 61 लाख 95 हजार 744 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.86टक्के आहे. राज्यात आज 100 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के झाला आहे. तब्बल 42 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 62 हजार 452 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
राज्यात डेल्टा व्हेरियंटची धास्ती; आतापर्यंत 76 रुग्णांना लागण
राज्यात कोरोना प्रादुर्भावात काही प्रमाणात घट झाली आहे. राज्य सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून सावरत असताना, कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटनं डोकं वर काढलं आहे. सध्या डेल्टा व्हेरियंटच्या वाढत्या रुग्णांनी राज्याच्या चिंतेत भर पडली आहे. राज्यात काल (सोमवारी) कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटची लागण झालेल्या 10 रुग्णांची नोंद करण्यात आली. यामध्ये चिंतेची बाब म्हणजे, कोरोनाची लस घेतलेल्या रुग्णांनाही डेल्टा व्हेरियंटची लागण होत आहे.
सध्या राज्यात डेल्टा प्लसचे एकूण 76 रुग्ण आहेत. तर यापैकी लस घेतलेल्या 18 जणांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आतापर्यंत राज्यात 5 डेल्टा प्लस व्हेरियंटची लागण झालेल्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल (सोमवारी) राज्यात कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटची लागण झालेल्या 10 रुग्णांची नोंद करण्यात आली. यापैकी सहा कोल्हापूर तीन रत्नागिरी तर एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण आहे.
मुंबईत गेल्या 24 तासात 190 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 190 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 271 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,18,354 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 2,749 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1966 दिवसांवर गेला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- ... तर मात्र राज्यात पुन्हा निर्बंध लावणं अपरिहार्य, टास्क फोर्स प्रमुख डॉ संजय ओक यांची माहिती
- Delta Plus advances in Maharashtra : राज्यात डेल्टा व्हेरियंटची धास्ती; आतापर्यंत 76 रुग्णांना लागण, लस घेतल्यांचाही समावेश, परिस्थिती काय?
Before You Go
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?





















