एक्स्प्लोर
राज ठाकरे म्हणाले म्हणून अॅट्रॉसिटी कायदा रद्द होणार नाही : आठवले
नवी दिल्ली : राज ठाकरे म्हणाले म्हणून अॅट्रॉसिटी कायदा रद्द होणार नाही, त्यामुळे त्यांच्या विधानाला फारसं गांभिर्याने घेण्याची गरज नाही, असं उत्तर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिलं आहे.
देशातील दलितांवर अत्याचार होतात. यावर सर्वसहमतीनेच अॅट्रॉसिटी कायदा करण्यात आला आहे, असंही रामदास आठवलेंनी नमूद केलं. तसंच अॅट्रॉसिटी कायदा आम्ही रद्द होऊ देणार नाही, असंही आठवलेंनी स्पष्ट केलं.
बलात्काऱ्यांचे हातपाय तोडा, राज ठाकरे कोपर्डीत
राज ठाकरेंच्या म्हणण्याला अर्थ नाही. ते म्हणाले कायदा रद्द होणार असं नाही. राज ठाकरेंची भूमिका दलितविरोधी आहे. ज्या मुलीवर बलात्कार झाला, तिच्या आरोपींना पकडून कडक शिक्षा करण्याची मागणी आम्ही केली आहे. पीडित कुटुंबीयांच्या भेटीसाठी मी जाणार होतो. मात्र त्या कुटुंबावर दबाव टाकून मला त्यांची भेट घेण्यापासून परावृत्त केलं. काय म्हणाले होते राज ठाकरे? कोपर्डीत झालेल्या बलात्कारानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्यानंतर बलात्कारासारखे गुन्हे रोखण्यासाठी शरीयतसारखा कायदा देशात लागू करण्याची गरज असल्याचं म्हटलं होतं. तसंच जर अॅट्रोसिटी कायद्याचा गैरवापर होत असेल तर त्याला पर्याय शोधला पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले होते.राज ठाकरेंविरोधात पोलिसात तक्रार
राज ठाकरेंविरोधात भारिपची तक्रार दरम्यान, या विधानानंतर भारिप बहुजन महासंघाने राज ठाकरेंविरोधात जालन्यात तक्रार दाखल केली आहे. "राज ठाकरे हे लोकशाहीविरोधी असून, त्यांना संविधान मान्य नसल्याचं दिसतंय. त्यांनी मागासवर्गीय समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळेच राज ठाकरेंवर अॅट्रॉसिटी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करा"असं भारिपने तक्रारीत म्हटलं आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
ठाणे
Advertisement