एक्स्प्लोर

NEET UG - 2021 : नीट परीक्षेचा निकाल जाहीर

सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल टेस्टिंग एजन्सी ला नीट परीक्षेचा निकाल जाहीर करण्याबाबत हिरवा कंदील दिल्यानंतर  अखेर हा निकाल आज जाहीर झाला आहे.

नवी दिल्ली :  देशभरात 12  सप्टेंबर रोजी एनटीए (नेशनल टेस्टिंग एजन्सी) द्वारे मेडिकल प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. 16 लाख विद्यार्थी ज्यांनी ही परीक्षा दिली होती ते विद्यार्थी मागील काही दिवसांपासून परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार ? याची वाट बघत होते. सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल टेस्टिंग एजन्सी ला नीट परीक्षेचा निकाल जाहीर करण्याबाबत हिरवा कंदील दिल्यानंतर  अखेर हा निकाल आज जाहीर झाला आहे.

वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश परीक्षा  NEET UG परीक्षा आता पहिल्यांदाच हिंदी, मराठी, पंजाबी, आसामी, बंगाली, उडिया, गुजराती, तेलुगु, मल्याळम, कन्नड, तामिळ, उर्दू आणि इंग्रजी अशा तेरा भाषांमध्ये आयोजित करण्यात आली.  यापूर्वी कोविड साथीच्या आजारामुळे या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर या परीक्षा 12 सप्टेंबर 2021 रोजी घेण्यात आली. 

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने विद्यार्थ्यांच्या रजिस्टर्ड ईमेल आयडीवर नीट यूजी (NEET UG)चे निकाल पाठवले आहे. अंडरग्रॅज्युएट मेडिकलच्या विद्यार्थी अनेक दिवसांपासून निकालाची वाट बघत होते. नीटचा निकाल त्याच्या अधिकृत संकेतस्थळावर  https://neet.nta.nic.in   जाहीर करण्यात आला आहे

NEET च्या निकालानंतर मेडिकल काउंसलिंग कमिटी (MCC)आणि काउंसलिंग बॉडी ऑल इंडिया कोटा आणि राज्य कोटा अंतर्गत मेडिकल प्रवेशासाठी सुरूवात होईल. या विषयी अधिक माहितीसाछी मेडिकल काउंसलिंग कमिटीच्या https://mcc.nic.in   संकेतस्थळाला भेट द्यावी. एनटीएने ऑक्टोबर महिन्यात प्रिलिमिनरी अन्सर की (preliminary answer key) जारी केली. या द्वारे विद्यार्थ्यांना आपल्या गुणांचा अंदाज लावण्यास मदत होते. 

निकालास उशीर का झाला?

उत्तरपत्रिकेत त्रुटी असल्याचं सांगत दोन विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केली होती.  हायकोर्टानं दोन विद्यार्थ्यांनी केलेल्या याचिकेनंतर नीट निकाल थांबवला होता.  त्यानंतर सुप्रीम कोर्टानं म्हटलं की, दोन विद्यार्थ्यांसाठी आम्ही निकाल थांबवू शकत नाही. 16 लाख विद्यार्थी निकालाची वाट पाहात आहेत. कोर्टानं याचिका दाखल केलेल्या दोन विद्यार्थ्यांच्या मुद्यावर NTAला नोटिस जारी केली. हा निकाल लागण्यास होत असलेल्या उशीरामुळं एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएसएमएस, बीयूएमएस आणि बीएचएमएस अशा मेडिकल पाठ्यक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला उशीर होणार आहे.  याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं की, त्यांना देण्यात आलेली टेस्ट बुकलेट आणि अन्सर बुकलेट मॅच करत नव्हती. या उमेदवारांनी तत्काळा निरीक्षकांच्या समोर हा मुद्दा मांडला. त्यावेळी त्यांचं म्हणणं ऐकूनही घेतलं नाही. कोर्टानं एनटीएला याचिकाकर्ता वैष्णवी भोपाले आणि अभिषेक कापसे यांच्यासाठी पुन्हा परीक्षा घेण्याचं सांगत दोन आठवड्यात त्यांचा निकाल घोषित करण्याचं सांगितलं होते. 

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीच्या आंदोलनाची संयुक्त राष्ट्राने घेतली दखल, आंदोलकांना तात्काळ सोडा, संयम बाळगा, अधिकाऱ्यांना सूचना
दिल्लीच्या आंदोलनाची संयुक्त राष्ट्राने घेतली दखल, आंदोलकांना तात्काळ सोडा, संयम बाळगा, अधिकाऱ्यांना सूचना
सरकार घाबरलंय, आंदोलन शक्तीशाली! 40 हजार निमलष्करी जवान तैनात करावे लागले, प्रशांत किशोरांचं मोठं वक्तव्य 
सरकार घाबरलंय, आंदोलन शक्तीशाली! 40 हजार निमलष्करी जवान तैनात करावे लागले, प्रशांत किशोरांचं मोठं वक्तव्य 
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget