एक्स्प्लोर
Advertisement
10 वर्षीय चिमुरडीच्या प्रेग्नन्सीबाबत मुंबईकर तरुणाचा आचरटपणा
दहा वर्षांच्या चिमुरडीच्या योनीवर मी वीर्यस्खलन केल्यामुळे ती गरोदर होऊ शकते का? असा आचरट प्रश्न ऑनलाईन पोर्टलवर विचारुन मुंबईकर तरुणाने खळबळ उडवली
मुंबई : दिल्लीच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. श्वेता सिंग यांना 'प्रॅक्टो' या ऑनलाईन हेल्थकेअर पोर्टलवर दहा दिवसांपूर्वी आलेल्या प्रश्नामुळे खळबळ उडाली होती. दहा वर्षांच्या चिमुरडीच्या योनीवर वीर्यस्खलन केल्यामुळे ती गरोदर होऊ शकते का? असा प्रश्न विचारला होता. अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याच्या भीतीने डॉक्टरांचे धाबे दणाणले.
नोएडा आणि बंगळुरुतील पोलिस स्टेशनमध्ये दहा दिवसांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर बंगळुरु पोलिसांनी सिद्धार्थ करंथ या 34 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलं. सिद्धार्थने मुंबईतील घाटकोपरमध्ये राहणाऱ्या त्याच्या आई-वडिलांच्या घरातून पुण्याच्या आयपी अॅड्रेसवरुन हा प्रश्न विचारला होता. 'बंगळुरु मिरर'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
बंगळुरु पोलिसांनी युद्धपातळीवर या तरुणाचा शोध घेतला. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालय, संरक्षण आणि बाल अधिकार राष्ट्रीय आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली होती. मुंबई पोलिसांकडे हे प्रकरण नंतर सोपवण्यात आलं. मात्र सिद्धार्थने कोणताही गुन्हा न केल्यामुळे त्याची निर्दोष मुक्तता होण्याची शक्यता आहे.
केवळ डॉक्टरांना चकित करण्यासाठी आपण हा प्रश्न पोस्ट केला होता. त्याचे इतके गंभीर परिणाम होतील, याची आपल्याला पुसटशीही कल्पना नव्हती, असा दावा सिद्धार्थने केला आहे. पोलिसांच्या तपासात सिद्धार्थने असा कोणताच गुन्हा केला नसल्याचं समोर आलं, त्यामुळे ही केस ते बंद करणार आहेत.
डॉ. सिंग यांना सिद्धार्थचा युक्तिवाद पटलेला नाही. तो केवळ टाईमपास करणार असता, तर त्याने स्वतःचं खरं वय सांगितलं नसतं. कदाचित त्याच्या नजरेत एखादी मुलगी असेल, जिला तो सावज करु शकतो, अशी भीतीही डॉक्टरांनी व्यक्त केली.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भंडारा
निवडणूक
ट्रेडिंग न्यूज
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion