एक्स्प्लोर

Morning Headlines 9th June : मॉर्निंग न्यूजमध्ये वाचा, देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

1. Diabetes Patient In India: भारतात मधुमेहाचे 10 कोटी रुग्ण, गेल्या 4 वर्षांत रुग्णांमध्ये 44 टक्के वाढ; ICMR च्या संशोधन अहवालातून खुलासा

Diabetes Patient In India: मधुमेहाबद्दल (Diabetes) अत्यंत महत्त्वाची बातमी. भारतात आताच्या घडीला 10 कोटीहून अधिक मधुमेहाचे रुग्ण (Diabetes Patient) आहेत. 2019 मध्ये ही संख्या 7 कोटी होती. म्हणजेच, केवळ चार वर्षांत 4 कोटी भारतीयांना मधुमेहाची लागण झाली आहे. टक्केवारी पाहिली तर ही वाढ 44 टक्के इतकी आहे. अधिक धक्कादायक म्हणजे, साडेतेरा कोटी नागरिक हे प्री-डायबेटिक (Prediabetes) आहेत. म्हणजेच, त्यातील एक तृतीयांश लोकांना कधीही मधुमेह होऊ शकतो. वाचा सविस्तर 

2. Cyclone Biparjoy : चक्रीवादळाचा जोर वाढला! मुंबई, रायगडसह 'या' किनारपट्टी भागात धोक्याचा इशारा

Cyclone Biporjoy Update : देशाच्या किनारपट्टीला 'बिपरजॉय' चक्रीवादळाचा (Biparjoy Cyclone) धोका आहे. बिपरजॉय चक्रीवादळ येत्या 48 तासांत आणखी तीव्र होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या चक्रीवादळामुळे भारताच्या किनारपट्टी भागातही परिणाम होणार आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, येत्या तीन दिवसांत 'बिपरजॉय' (Cyclone Biparjoy) तीव्र चक्रीवादळात रूपांतर होऊ शकतं. या चक्रीवादळाचा परिणाम तीन दिवस दिसू शकतो. देशाच्या किनारपट्टी भागातील आपत्ती व्यवस्थापन पथकांना आधीच सतर्क करण्यात आलं आहे. वाचा सविस्तर 

3. Monsoon Update : केरळमध्ये मान्सून 7 दिवस उशिराने, महाराष्ट्रात पाऊस कधी पडणार? हवामान विभागाने वर्तवला अंदाज

Weather Forecast : मान्सून अखेर केरळमध्ये दाखल (Monsoon Update in Kerala) झाला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात पाऊस (Maharashtra Rain Update) कधी दाखल होणार याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. वादळी वाऱ्यांमुळे मान्सून केरळमध्ये यंदा उशिराने दाखल झाला आहे, त्यामुळे महाराष्ट्रालाही पावसासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे. सर्वजण उन्हाच्या तडाख्यापासून सुटका मिळण्याची वाट पाहत आहेत. एकीकडे केरळमध्ये पाऊस पोहोचला आहे. पण, मुंबईसह राज्यातील काही भागांत अजूनही उन्हाचा फटका बसत आहे. त्यामुळे सर्वजण पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. महाराष्ट्रात पावसाच्या अंदाजाबाबत हवामान विभागाने माहिती दिली आहे. वाचा सविस्तर 

4. El Nino : एल निनोचं आगमन, अमेरीकेच्या हवामान संस्थेकडून जाहीर; नैऋत्य मान्सूनला फटका बसण्याची शक्यता

El Nino : अमेरिकेच्या हवामान अभ्यासक संस्थेनं एल निनोचे (El Nino) आगमन झाल्याचं जाहीर केलं आहे. यामुळं नैऋत्य मान्सूनला फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दर महिन्याच्या नऊ तारखेला एल निनोची नेमकी परिस्थिती काय? यासंदर्भात अमेरीकेच्या नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशननं (NOAA)संस्थेकडून माहिती देण्यात आली आहे. वाचा सविस्तर 

5. Wrestlers Protest: बृजभूषण यांच्याविरोधात सूड भावनेनं खोटी तक्रार; अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांची माध्यमांसमोर कबुली

Wrestlers Protest: केंद्र सरकार (Central Government) आणि कुस्तीपटूंमधील (Wrestler Protest) चर्चेत कारवाईचं आश्वासन मिळाल्यानंतर कुस्तीपटूंनी आंदोलन मागे घेतलं. कुस्तीपटूंनी आंदोलन मागे घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी गुरुवारी (8 जून) या प्रकरणात नवा आणि खळबळजनक खुलासा झाला. पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ज्या अल्पवयीन कुस्तीपटूनी बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती, तिच्या वडिलांनी सांगितलं की, त्यांनी भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात लैंगिक छळाची खोटी तक्रार दाखल केली होती. दरम्यान, बृजभूषण सिंह यांनीही अल्पवयीन मुलीच्या वडिलांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर 

6. Odisha Train Accident : मृतदेह ठेवलेल्या शाळेत जाण्यास विद्यार्थांचा नकार, भीतीचं वातावरण; सरकारला इमारत पाडण्याचं आवाहन

Odisha Train Accident : ओडिशामधील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 288 जणांचा मृत्यू झाला आणि अनेक लोक जखमी झाले होते. या दुर्दैवी ट्रेन अपघातातील मृतांचा आकडा एवढा होता की, मृतदेह ठेवण्यासाठी शवगृहांमध्येही जागा शिल्लक नव्हती. यामुळे अपघातग्रस्तांचे मृतदेह इतर ठिकाणी ठेवण्यात आले. यावेळी बालासोर येथील एका शाळेमध्ये ही मृतदेह ठेवण्यात आले होते. आता अपघातानंतर येथील परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. मात्र, मृतदेह ठेवलेल्या शाळांमध्ये जाण्यास तयार नाहीत. वाचा सविस्तर 

7. OpenAI चे सीईओ सॅम अल्टमन पंतप्रधान मोदींच्या भेटीला, भारतात ChatGPT आणि AI साठी नव्या संधी उपल्ध करण्यावर चर्चा

OpenAI ChatGPT : अलिकडे सर्वत्र आर्टिफिशन इंटेलिजेंस टेक्नॉलॉजी (AI - Artificial Intelligence) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमतेची चर्चा आहे. नुकतीच ओपन एआय (Open AI) या आर्टिफिशल इंटेलिजेंस टेक स्टार्टअप (Tech Start-Up) चे सीईओ सॅम अल्टमन (Sam Altman) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भारतात OpenAI आणि ChatGPT ला मोठा प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर सॅम अल्टमन यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. वाचा सविस्तर 

8. Nirmala Sitharaman Daughter Wedding: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या कन्येचा विवाह संपन्न; छोटेखानी सोहळ्याचा व्हिडीओ व्हायरल

Parakala Vangmayi Wedding News: अर्थमंत्री (Minister of Finance of India) निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांची कन्या परकला वांगमयीचा  (Parakala Vangmayi) विवाह गुरुवारी (8 जून) पार पडला. बंगळुरू येथील घरात छोटेखानी विवाहसोहळा पार पडला. खास लग्नसोहळ्यातील काही फोटो समोर आले आहेत. असं सांगण्यात येतंय की, परकला वांगमयीचं लग्न बंगळुरूत मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पडलं. ज्यामध्ये फक्त कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होते. वाचा सविस्तर 

9. ऑनलाईन मिटिंगमध्ये बॉसकडून ज्युनिअरला शिवीगाळ, HDFC बँकेच्या अधिकाऱ्याचं निलंबन; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई

HDFC Bank Employee Suspended: HDFC बँक (HDFC Bank) नं ऑनलाईन बैठकीत आपल्या ज्युनिअरसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप असलेल्या बँक अधिकाऱ्यावर कारवाई केली आहे. याप्रकरणी बँकेनं अधिकाऱ्याला निलंबित केलं आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं बँकेच्या मिटिंगमध्ये आपल्या ज्युनिअर एम्प्लॉईसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. या मिटिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये बँकेतील एक अधिकारी बँकिंग आणि इंश्योरन्स प्रोडक्ट्सची विक्री न झाल्यामुळे ज्युनिअरवर ओरडत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी बँकेवर जोरदार टीका केली. तसेच, बँकेला ट्रोलही करण्यात आलं. वाचा सविस्तर

10. 9th June In History: जननायक बिरसा मुंडा यांचे निधन, रोमन सम्राट नीरोची आत्महत्या, मकबूल फिदा हुसैन यांचे निधन; आज इतिहासात

9th June In History: आज इतिहासात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रावर परिणाम करणाऱ्या घटना आजच्या दिवशी झाल्या. जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी... वाचा सविस्तर

11. Horoscope Today 09 June 2023 : वृषभ, सिंह, तूळसह 'या' राशीच्या लोकांनी खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं; जाणून घ्या सर्व राशींचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 09 June 2023 : आज शुक्रवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार आज मिथुन राशीच्या लोकांना समाजाचं भलं करण्याची संधी मिळेल. तर, कुंभ राशीच्या लोकांना व्यवसायाला पुढे नेण्यात यश मिळेल. मेष ते मीन राशीसाठी आजचा शुक्रवार कसा असेल? काय सांगतात तुमच्या नशिबाचे तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacker Update : सैफवरील हल्लेखोर वरळीच्या सिल्कवर्क्स कॅफेमध्ये होता कामाला, इतर कर्मचाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यातSaif Ali Khan Attacker Update : सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचं वरळीतील कोळीवाड्यात वास्तव्य, आरोपीचे शेजारी काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 19 January 2024Anandache Paan ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाकेंशी समकाल आणि समांतर पुस्तकांच्या निमित्त खास संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Embed widget