(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nirmala Sitharaman Daughter Wedding: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या कन्येचा विवाह संपन्न; छोटेखानी सोहळ्याचा व्हिडीओ व्हायरल
Parakala Vangmayi Wedding: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांची मुलगी परकला वांगमयी (Parakala Vangmayi) हिचा विवाह गुरुवारी त्यांच्या बंगळुरू येथील घरी पार पडला.
Parakala Vangmayi Wedding News: अर्थमंत्री (Minister of Finance of India) निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांची कन्या परकला वांगमयीचा (Parakala Vangmayi) विवाह गुरुवारी (8 जून) पार पडला. बंगळुरू येथील घरात छोटेखानी विवाहसोहळा पार पडला. खास लग्नसोहळ्यातील काही फोटो समोर आले आहेत. असं सांगण्यात येतंय की, परकला वांगमयीचं लग्न बंगळुरूत मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पडलं. ज्यामध्ये फक्त कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होते.
बंगळुरूतील विवाह सोहळ्यात राजकीय नेतेमंडळी मात्र दिसल्या नाहीत. निर्मला सीतारामण यांची कन्या परकला वांगमयीच्या पतीचं नाव प्रतीक आहे. अर्थमंत्र्यांच्या मुलीचा विवाह ब्राह्मण परंपरेनुसार आणि उडुपी अदमारू मठाच्या संतांच्या आशीर्वादानं पार पडला.
🎊 Union Finance Minister Nirmala Sitharaman's daughter got married in Bangalore yesterday. 🎉🎉 The news was not on TV or on print media. An example of simple living and working with nation first principles. 🙏🙏🙏 pic.twitter.com/r818unikZP
— Deepak Kumar. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💪 (@DipakKumar1970) June 8, 2023
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या कन्येच्या विवाहसोहळ्याचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. व्हिडीओमध्ये वैदिक मंत्रोच्चार ऐकू येत आहेत. तसेच, वधू वराजवळ निर्मला सीतारणही दिसत आहेत. काही युजर्स निर्मला सीतारमण यांचं कौतुकही करत आहेत.
छोटेखानी विवाहसोहळ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर निर्मला सीतारमण यांच्या साधेपणाचं कौतुक करत आहेत. केंद्रीय अर्थमंत्री सीतारमण यांच्या कनेचा विवाहसोहळा असूनही या सोहळ्यात कोणताही बडेजाव दिसला नाही, तसेच, या सोहळ्यात व्हीआयपींची मांदियाळीही दिसली नाही. कुटुंबातील व्यक्ती, जवळचे नातेवाईक आणि काही मित्रमंडळी यांच्या उपस्थितीत बंगळुरूतील एका घरात हा विवाहसोहळा पार पडल्याची माहिती मिळत आहे.
दीपक कुमार नावाच्या एका युजरनं ट्वीट केलं की, "केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या कन्येचं काल बंगळुरूमध्ये लग्न झालं. ही बातमी टीव्ही किंवा प्रिंट मीडियावर अजिबात नव्हती. साधं राहणीमान आणि राष्ट्र प्रथम तत्त्वांनुसार काम करण्याचं हे उत्तम उदाहरण आहे."
निर्मला सीतारमण यांच्या कन्या परकला वांगमयी पत्रकार
परकला वांगमयी या व्यवसायानं मल्टीमीडिया पत्रकार आहेत. त्यांनी नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी, बोस्टन, मॅसॅच्युसेट्स येथून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात बीएम आणि एमए केलं आहे. आतापर्यंत त्यांनी लाइव्ह मिंट, द व्हॉईस ऑफ फॅशन आणि द हिंदू सारख्या संस्थांसोबत काम केलं आहे.