एक्स्प्लोर

Wrestlers Protest: बृजभूषण यांच्याविरोधात सूड भावनेनं खोटी तक्रार; अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांची माध्यमांसमोर कबुली

Wrestlers Protest: WFI अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप करणाऱ्या अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांनी म्हटलंय की, त्यांनी बृजभूषण यांच्याविरोधात सूड भावनेनं खोटी तक्रार दाखल केली.

Wrestlers Protest: केंद्र सरकार (Central Government) आणि कुस्तीपटूंमधील (Wrestler Protest) चर्चेत कारवाईचं आश्वासन मिळाल्यानंतर कुस्तीपटूंनी आंदोलन मागे घेतलं. कुस्तीपटूंनी आंदोलन मागे घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी गुरुवारी (8 जून) या प्रकरणात नवा आणि खळबळजनक खुलासा झाला. पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ज्या अल्पवयीन कुस्तीपटूनी बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती, तिच्या वडिलांनी सांगितलं की, त्यांनी भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात लैंगिक छळाची खोटी तक्रार दाखल केली होती. दरम्यान, बृजभूषण सिंह यांनीही अल्पवयीन मुलीच्या वडिलांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

"सूड भावनेनं खोटी तक्रार"

अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं की, "सूडाच्या भावनेनं त्यांनी WFI प्रमुख बृजभूषण सिंह यांच्याविरोधात खोटी तक्रार दाखल केली, पण त्यांना आता स्वतःची चूक सुधारायची आहे." आता सत्य बाहेर यावं अशी त्यांची इच्छा असल्याचंही मुलीच्या वडिलांनी सांगितलं. 

तक्रारदार कुस्तीपटूच्या वडिलांनी पीटीआयला सांगितलं की, सरकारनं गेल्या वर्षी झालेल्या चाचणीत त्यांच्या मुलीच्या पराभवाची निष्पक्ष चौकशी करण्याचं आश्वासन दिलं आहे, म्हणूनच त्यांनी सत्य बोलण्याचा निर्णय घेतला आहे. बृजभूषण यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याचा निर्णय त्यांच्या मुलीच्या नसून त्यांचा होता, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. ते म्हणाले की, "हा माझा निर्णय होता. मी बाप आहे आणि तिच्यावर रागावलो होतो. मी घडत असलेल्या घडामोडी तिला सांगितल्या, पण त्यानंतर माझ्या मुलीनं "बाबा, तुम्हीच पाहा.", असं मला सांगितलं. 

अल्पवयीन मुलीच्या वडिलांनीही त्यांच्या आणि त्यांच्या मुलीनं बृजभूषण सिंह यांच्या विरोधात केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली. याची सुरुवात 2022 मध्ये लखनौ येथे झालेल्या आशियाई अंडर-17 चॅम्पियनशिपच्या चाचणीनं झाली, ज्यामध्ये अंतिम फेरीत पराभूत झाल्यानंतर अल्पवयीन मुलगी भारतीय संघात प्रवेश करू शकली नाही. त्यावेळी मुलीच्या वडिलांनी रेफ्रींच्या निर्णयासाठी त्यांनी बृजभूषण यांना जबाबदार धरलं होतं. ते म्हणाले की, "मी सूडाच्या भावनेनं भरून गेलो होतो, कारण माझ्या मुलीची एक वर्षाची मेहनत पंचाच्या चुकीच्या निर्णयानं व्यर्थ गेली. त्यामुळेच मी बदला घेण्याचं ठरवलं"

बृजभूषण काय म्हणाले? 

दुसरीकडे, अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांच्या वक्तव्यावर बृजभूषण शरण सिंह म्हणाले की, "त्यांच्या मनात कोणासाठीही वाईट भावना नाहीत. माझ्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी अल्वयीन मुलीची दिशाभूल केली, त्यामुळे तिच्या हातून एवढी मोठी चूक घडली. माझ्या मनात तक्रारदार कुस्तीपटू किंवा तिच्या कुटुंबाबद्दल कोणतीही वाईट भावना नाही. त्याच्या कुटुंबावर कारवाई करण्याची माझी मागणी नाही. पण यातून मला बदनाम करण्याचा हा कट असल्याचं सिद्ध झालं आहे."

दरम्यान, बुधवारीच केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आंदोलक कुस्तीपटू साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासोबत बैठक घेतली होती. यानंतर पैलवानांनी बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधातील आंदोलन 15 जूनपर्यंत स्थगित केलं होतं. 

बैठकीनंतर कुस्तीपटू आणि सरकारच्या वतीनं काय सांगण्यात आलं?

आंदोलक कुस्तीपटूंसोबतची सहा तास चाललेली बैठक सकारात्मक असल्याचं क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी बुधवारी (7 जून) सांगितलं. ते म्हणाले की, बृजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध 15 जूनपर्यंत आरोपपत्र दाखल केलं जाईल.

ऑलिम्पिक पदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी बैठकीनंतर सांगितलं की, त्यांचं आंदोलन अद्याप संपलेलं नाही आणि त्यांनी केवळ सरकारच्या विनंतीवरून त्यांचं आंदोलन 15 जूनपर्यंत स्थगित केलं आहे.

साक्षी मलिक सरकारसोबतच्या बैठकीनंतर म्हणाली की, 15 जूनपर्यंत पोलीस तपास पूर्ण होईल, असं आम्हाला सांगण्यात आलं आहे. तसेच, दिल्ली पोलिसांकडून 28 मे रोजी कुस्तीपटूंवर दाखल केलेला एफआयआरही मागे घेतला जाईल, असंही सरकारच्या वतीनं सांगण्यात आल्याचं साक्षी मलिक म्हणाली. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी

व्हिडीओ

Navneet Rana Amravati : मी भाजपसाठी काम करते, ठाकरेंची दुकान आता बंद, नवनीत राणांचा घणाघात
CM Devendra Fadnavis : मुंबईत भाजपच मोठा पक्ष, मुख्यमंत्र्यांचा विजयी नगरसेवकांसोबत संवाद
Special Report Asaduddin Owaisi 29 पैकी 13 महापालिकांत MIM ची बाजी,ओवैसींचे फासे, एमआयएमचे सव्वाशे
Ganesh Naik Navi Mumbai : नवी मुंबईत भाजपच्या विजयानंतर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया
Special Report Vasai Virar Malegaon स्थानिक पक्ष सत्तेत; भाजपची चांगली कामगिरी, पण सत्तेपासून दूरच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
Embed widget