एक्स्प्लोर

9th June In History: जननायक बिरसा मुंडा यांचे निधन, रोमन सम्राट नीरोची आत्महत्या, मकबूल फिदा हुसैन यांचे निधन; आज इतिहासात

9th June In History: सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रावर परिणाम करणाऱ्या घटना आजच्या दिवशी झाल्या. जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी

9th June In History: आज इतिहासात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रावर परिणाम करणाऱ्या घटना आजच्या दिवशी झाल्या. जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी

इसवी सन 68:  रोमन सम्राट नीरोने आत्महत्या केली 

निरो हा रोमचा 5वा सम्राट होता आणि रोमच्या पहिल्या राजवंशातील शेवटचा, ज्युलिओ-क्लॉडियन्स, ज्याची स्थापना ऑगस्टस (ज्युलियस सीझरचा दत्तक मुलगा) यांनी केली होती. नीरो रोमच्या सर्वात कुप्रसिद्ध शासकांपैकी एक म्हणून ओळखला जातो. काहींच्या मते नीरोच्या काही चांगल्या बाजू समोर आणल्या गेल्या नाहीत. 

रोमच्या शासनात नीरोचे व्यावहारिक योगदान मुत्सद्दीपणा, व्यापार आणि संस्कृतीवर केंद्रित होते. त्यांनी अॅम्फीथिएटर बांधण्याचे आदेश दिले आणि ऍथलेटिक खेळ, स्पर्धांना प्रोत्साहन दिले. क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रमांना उच्चभ्रू वर्गाच्या बंधनातून मुक्त करत सामान्य, समाजातील खालच्या घटकात पोहचवले. त्यातून तत्कालीन सधन वर्ग दुखावला गेला असल्याचे म्हटले जाते. 

नीरोच्या जुलूमशाहीमुळे रोमचे लोक आधीच त्रस्त होते, पण त्याच्या क्रूरतेची आणि असंवेदनशीलतेची परिसीमा एका घटनेने ओलांडली.  जेव्हा रोम शहर जळत होते तेव्हा नीरो आपल्या राजवाड्यात बासरी वाजवत होता. काहींच्या मते, शहरातील या आगीच्या घटनेमागे नीरोचा हात होता. यामुळे रोमचे सिनेट इतके संतप्त झाले की त्यांनी नीरोला शत्रू घोषित केले. 

स्पेनच्या रोमन गव्हर्नरने आपल्या सैन्यासह रोमवर हल्ला केला तेव्हा नीरोचे स्वतःचे अंगरक्षक त्याला सामील झाले. यामुळे निरोला पळून जावे लागले. बंडाच्या वेळी, रोमन सिनेटने त्याला फाशी देण्याचे आदेशही जारी केले, परंतु अटक आणि फाशीची भीती टाळण्यासाठी नीरोने आत्महत्या केली असल्याचे म्हटले जाते. 

1900: जननायक बिरसा मुंडा यांचे निधन 

बिरसा मुंडा हे भारतीय आदिवासी स्वातंत्र्य सेनानी आणि आदिवासींचे नेते होते. ब्रिटिश राजवटीत 19व्या शतकाच्या उत्तरार्धात बंगाल प्रेसिडेन्सी (आता झारखंड) येथे झालेल्या आदिवासी धार्मिक सहस्त्राब्दी चळवळीचे त्यांनी नेतृत्व केले, ज्यामुळे ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले. भारतातील आदिवासी त्यांना देव मानतात आणि 'धरती आबा' म्हणूनही ओळखले जातात.

1858-94 च्या सरदारी चळवळीने बिरसा मुंडा उठावाचा आधार बनवला, जो भूमिज-मुंडा सरदारांच्या नेतृत्वाखाली लढला गेला. 1894 मधील सरदारी लढाई मजबूत नेतृत्वाअभावी यशस्वी झाली नाही, त्यानंतर आदिवासी बिरसा मुंडा यांच्या बंडात सामील झाले. 

1 ऑक्टोबर, 1894 रोजी बिरसा मुंडा यांनी सर्व मुंडांना एकत्र केले आणि ब्रिटिशांकडून कर माफीसाठी एक चळवळ आयोजित केली, ज्याला 'मुंडा बंड' किंवा 'उलगुलन' असे म्हणतात. 1895 मध्ये त्यांना अटक करण्यात आली. हजारीबाग मध्यवर्ती कारागृहात त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती. 1897 ते 1900 या काळात मुंडा आणि ब्रिटिश सैनिक यांच्यात युद्धे झाली आणि बिरसा आणि त्यांच्या समर्थकांनी इंग्रजांना अडचणीत आणले. ऑगस्ट 1897 मध्ये, बिरसा आणि त्याच्या चारशे सैनिकांनी, बाण आणि धनुष्यांसह, खुंटी पोलिस स्टेशनवर हल्ला केला. 1898 मध्ये, तांगा नदीच्या काठावर मुंडांची ब्रिटीश सैन्याशी चकमक झाली, ज्यामध्ये ब्रिटिश सैन्याचा प्रथम पराभव झाला परंतु नंतर त्या भागातील अनेक आदिवासी नेत्यांना अटक करण्यात आली.

जानेवारी 1900 मध्ये डोंबारी टेकडीवर आणखी एक संघर्ष झाला ज्यामध्ये अनेक महिला आणि मुले मारली गेली. त्या ठिकाणी बिरसा आपल्या जाहीर सभेला संबोधित करत होते. नंतर बिरसांच्या काही शिष्यांना अटकही झाली. शेवटी, स्वतः बिरसा यांनाही चक्रधरपूरच्या जामकोपई जंगलातून 3 फेब्रुवारी 1900 रोजी इंग्रजांनी अटक केली. ब्रिटिशांच्या कैदेत असताना 9 जून 1900 रोजी त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. 

1964: लाल बहादूर शास्त्री यांनी पंतप्रधानपदाती सूत्रे हाती घेतली

लाल बहादूर शास्त्री यांनी 9 जून 1964 रोजी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. काळजीवाहून पंतप्रधान गुलजारी लाल नंदा यांच्याकडून त्यांनी पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतली.  लाल बहादूर शास्त्री यांच्या नेतृत्वात भारताने पाकिस्तानविरोधातील 1965 चे युद्ध जिंकले. देशाला अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण, आत्मनिर्भर करणारी हरीत क्रांतीदेखील  लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्यकाळात झाली. 

2011: चित्रकार व दिग्दर्शक मकबूल फिदा हुसेन यांचे निधन 

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय चित्रकार मकबूल फिदा हुसेन अर्थात मकबूल फिदा हुसेन यांचे आजच्या दिवशी निधन झाले. एम एफ हुसेन यांचा जन्म पंढरपूर येथे झाला. त्यांचे शिक्षण सर जे.जे.स्कूल ऑफ आर्टमध्ये झाले. त्यांची चित्रकार, लेखक, फिल्ममेकर ही ओळख आहे. त्यांनी केलेले मिनाक्षी ए टेल ऑफ थ्री सिटीज या पेंटिंगने ते जगप्रसिद्ध झाले. सुरुवातीच्या काळात हे सिनेमाच्या जाहिरातीचे पेंटिंग काढीत असत. अधिक पैसे कमविण्यासाठी त्या काळात ते खेळण्याच्या कारखान्यात खेळणी तयार करून तसेच त्यांचे आराखडे करून देण्याचे काम करीत असत. कधी कधी गुजरातमध्ये जाऊन निसर्गचित्रे रेखाटत. 

भारतातील आधुनिक चित्रकलेच्या क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करणाऱ्या कलावंतांमध्ये हुसेन गणले जातात.1940  च्या दशकापासून चित्रकार म्हणून नावारूपास येऊ लागले होते. फ्रान्सिस न्यूटन सूझा याने मुंबईत स्थापलेल्या प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रुप या समूहात हुसेन 1947 साली दाखल झाले. तत्कालीन भारतीय कलाक्षेत्रात बंगाल स्कूल म्हणून ओळखल्या गेलेल्या कलापरंपरेतील राष्ट्रवादी मर्यादा उल्लंघून आंतरराष्ट्रीय कलाक्षेत्रातील प्रवाहांशी संवाद साधू पाहणाऱ्या कलाकारांचा या समूहात समावेश होता.1952 साली झुरिच येथे एम.एफ.हुसेन यांचे पहिले एकल चित्रप्रदर्शन भरले. काही वर्षांतच युरोप व अमेरिकेतही त्याच्या कलेची ख्याती पसरली. 1955 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले.

1970 मध्ये एम एफ हुसेन यांनी काढलेल्या काही चित्रांवर हिंदुत्ववादी संघटनांनी 1990 मध्ये आक्षेप घेतला. त्यांना सातत्याने विरोध होऊ लागला. 1998 मध्ये त्यांच्या घरावर काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. त्यानंतरच्या काळात हिंदुत्वावाद्यांकडून हुसेन यांना विरोध वाढत गेला. अखेर नाईलाजाने त्यांना देश सोडावा लागला. त्यांना 2010 मध्ये कतारचे नागरिकत्व स्वीकारले. दोहा येथील संग्रहालयात लिखाणाचे काम करत असताना त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 

इतर महत्वाच्या घटना :

1672 : रशियाचा झार पीटर द ग्रेट (पहिला) यांचा जन्म

1906: स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे लंडनला प्रयाण.

1977 : अभिनेत्री अमिशा पटेलचा जन्म

1985 : अभिनेत्री सोनम कपूरचा जन्म

1997 : इंग्लिश खाडी पोहून जाणारे पहिले भारतीय मिहिर सेन यांचे निधन.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tamhini Ghat Bus Accident : ताम्हिणी घाटातील खासगी बसच्या अपघातातील मृतांना 5 लाखांची मदत मिळणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
ताम्हिणी घाटातील खासगी बसच्या अपघातातील मृतांना 5 लाखांची मदत मिळणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
काँग्रेस माफी मांगो, अशोक चव्हाणांचा फोटो शेअर करत आमदार जितेंद्र आव्हाडांकडून टोला
काँग्रेस माफी मांगो, अशोक चव्हाणांचा फोटो शेअर करत आमदार जितेंद्र आव्हाडांकडून टोला
बसची वाट पाहात असलेल्या मुलीला घरी सोडण्याचे अमिष दाखवत नराधमाकडून लैंगिक अत्याचार, पालघरमधील धक्कादायक प्रकार
बसची वाट पाहात असलेल्या मुलीला घरी सोडण्याचे अमिष दाखवत नराधमाकडून लैंगिक अत्याचार
अंबादास दानवे म्हणाले, वाल्मिक कराड नागपुरात मी पत्ता देतो; मंत्री धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
अंबादास दानवे म्हणाले, वाल्मिक कराड नागपुरात मी पत्ता देतो; मंत्री धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sushma Andhare on Devendra Fadnavis|फडणवीसांचं सरकार आल्यावर दलित, अल्पसंख्याकांच्या अत्याचारात वाढ?Dhananjay Munde Beed : Walmik Karad सोबत मुंडेंची जवळीक? धनंजय मुंडेंकडून भूमिका स्पष्टSudhir Mungantiwar Banner Nagpur | सर्वोत्तम कामगिरी करणारा मंत्री, नागपुरात मुनगंटीवारांचे बॅनरAkhilesh Shukla Kalyan | मराठी कुटुंबावर हात उगारण्याची हिंमत होतेच कशी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tamhini Ghat Bus Accident : ताम्हिणी घाटातील खासगी बसच्या अपघातातील मृतांना 5 लाखांची मदत मिळणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
ताम्हिणी घाटातील खासगी बसच्या अपघातातील मृतांना 5 लाखांची मदत मिळणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
काँग्रेस माफी मांगो, अशोक चव्हाणांचा फोटो शेअर करत आमदार जितेंद्र आव्हाडांकडून टोला
काँग्रेस माफी मांगो, अशोक चव्हाणांचा फोटो शेअर करत आमदार जितेंद्र आव्हाडांकडून टोला
बसची वाट पाहात असलेल्या मुलीला घरी सोडण्याचे अमिष दाखवत नराधमाकडून लैंगिक अत्याचार, पालघरमधील धक्कादायक प्रकार
बसची वाट पाहात असलेल्या मुलीला घरी सोडण्याचे अमिष दाखवत नराधमाकडून लैंगिक अत्याचार
अंबादास दानवे म्हणाले, वाल्मिक कराड नागपुरात मी पत्ता देतो; मंत्री धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
अंबादास दानवे म्हणाले, वाल्मिक कराड नागपुरात मी पत्ता देतो; मंत्री धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
नाथाभाऊ अन् मंत्री गिरीश महाजनांमध्ये जुंपली; पीआयच्या मृत्यू प्रकरणावरुन विधानपरिषदेतच नेत्यांची खडाजंगी
नाथाभाऊ अन् मंत्री गिरीश महाजनांमध्ये जुंपली; पीआयच्या मृत्यू प्रकरणावरुन विधानपरिषदेतच नेत्यांची खडाजंगी
जंगलात कार, कारमध्ये मोठं घबाड; 52 किलो सोनं अन् 10 कोटींची रोकड जप्त, अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या
जंगलात कार, कारमध्ये मोठं घबाड; 52 किलो सोनं अन् 10 कोटींची रोकड जप्त, अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या
शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन आमदार रोहित पाटील मुख्यमंत्र्यांना भेटले; आर.आर. आबांच्या आठवणींने कंठ दाटले
शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन आमदार रोहित पाटील मुख्यमंत्र्यांना भेटले; आर.आर. आबांच्या आठवणींने कंठ दाटले
राष्ट्रवादी पुन्हा... शरद पवार अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाढली जवळीक; आमदारांच्या गाठीभेटी चर्चेत
राष्ट्रवादी पुन्हा... शरद पवार अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाढली जवळीक; आमदारांच्या गाठीभेटी चर्चेत
Embed widget