एक्स्प्लोर

Morning Headlines 31 July: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

1. Monsoon Session: संसदेत आज सादर होऊ शकतं दिल्ली सेवा विधेयक; 'INDIA' च्या खासदारांची रणनिती काय? सभागृहात पुन्हा गदारोळाची शक्यता

Parliament Monsoon Session 2023: 20 जुलैपासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनात (Monsoon Session of Parliament) संसदेचा बराचसा वेळ गदारोळात वाया गेला. त्यामुळे आता सोमवारी (31 जुलै) होणाऱ्या सभागृहाच्या कामकाजाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आतापर्यंतच्या पावसाळी अधिवेशनात दोन मुद्दे सर्वाधिक गाजले आहेत. पहिला मुद्दा म्हणजे मणिपूर हिंसाचाराच्या (Manipur Violence) मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दोन्ही सभागृहात वक्तव्य करण्याची मागणी आणि दुसरं म्हणजे दिल्ली अध्यादेशाचं विधेयक. वाचा सविस्तर 

2. विरोधकांना पाठिंबा की पंतप्रधान मोदींसोबत एकाच मंचावर हजेरी? शरद पवारांच्या भूमिकेवर खिळल्यात सर्वांच्या नजरा

Maharashtra Politics: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि पंतप्रधान मोदी (PM Modi) लवकरच एका मंचावर दिसणार आहेत. शरद पवार आणि पंतप्रधान मोदी 1 ऑगस्ट रोजी पुण्यात होणाऱ्या टिळक पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादीतील (NCP) बंडखोरी आणि अजित पवार (Ajit Pawar) एनडीएमध्ये दाखल झाल्यानंतर पहिल्यांदाच मोदी आणि थोरले पवार एकत्र एकाच मंचावर दिसणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. वाचा सविस्तर 

3. NDA MPs Meeting: मिशन 2024 साठी एनडीएच्या खासदारांची आज पहिली बैठक, पंतप्रधान नरेंद्र मोदी खासदारांना देणार यशाचा कानमंत्र

NDA MPs Meeting: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार (31 जुलै) रोजी एनडीएच्या (NDA) खासदारांची बैठक पार पडणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यशाचा कानमंत्र देण्याची शक्यता आहे. एनडीएमधील खासदारांच्या बैठकीचा (Meeting) कार्यक्रम हा 11 दिवसांचा असणार आहे. वाचा सविस्तर 

4. India TV CNX Survey: सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होऊन मोदी नेहरुंची बरोबरी करणार? सर्वेक्षणाचा धक्कादायक निष्कर्ष

Lok Sabha Opinion Poll: 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. सत्ताधाऱ्यांची आघाडी एनडीए (NDA) आणि विरोधकांची आघाडी इंडिया (INDIA) नं आगामी निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. वाचा सविस्तर 

5. Sidhu Moosewala Case : सिद्धू मुसेवाला हत्याकांडाचा मास्टरमाईंड सचिन बिश्नोईला भारतात आणणार; सुरक्षा यंत्रणांचे पथक अझरबैजानला रवाना

Sidhu Moosewala Murder Case : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moosewala) हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी गँगस्टर सचिन बिश्नोईला भारतात आणण्यासाठी दिल्ली पोलिसांची स्पेशल सेल टीम अझरबैजानला रवाना झाली आहे. सचिन बिश्नोई हा कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा पुतण्या आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात मुसेवाला यांच्या हत्येनंतर तो फरार झाला होता. सचिन बिश्नोई सिद्धू मुसेवालाच्या हत्येच्या काही दिवसांपूर्वी तो बनावट पासपोर्टचा वापर करून देशातून पळून गेला होता. वाचा सविस्तर 

6. जयपूर एक्स्प्रेसमध्ये पालघरजवळ गोळीबार, चार प्रवाशांचा जागीच मृत्यू

Jaipur Express Firing : जयपूर एक्स्प्रेसमध्ये (Jaipur Express) धक्कादायक घटना घडली आहे. जयपूर एक्स्प्रेस ट्रेनमध्ये पहाटे पाचच्या सुमारास गोळीबार (Firing) झाला. वाचा सविस्तर 

7. 31 July In History: आधुनिक मुंबईचे शिल्पकार नाना शंकर शेठ, पार्श्वगायक मोहम्मद रफी यांचे निधन

31 July In History: 31 जुलैचा दिवस हा भारतासाठी महत्त्वाचा आहे. मुंबईला आज एक आधुनिक शहर म्हणून ओळखले जाते. मात्र, त्याचा पाया रचण्यामध्ये मोलाचे योगदान असणारे नाना शंकर शेठ यांचे निधन आजच्या दिवशी झाले. तर, मागील अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर जादूई आवाजाने अधिराज्य गाजवणारे पार्श्वगायक मोहम्मद रफी यांचे निधनही आजच्या दिवशी झाले. उपन्यास सम्राट मुन्शी प्रेमचंद यांचा आज जन्मदिवस आहे. वाचा सविस्तर 

8. Horoscope Today 31 July 2023 : महिन्यातला शेवटचा दिवस 'या' राशींच्या लोकांसाठी आहे खूप खास; वाचा सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

Horoscope Today 31 July 2023 : आज सोमवार हा एक महत्त्वाचा दिवस आहे. आज मेष, सिंह, तूळ राशीच्या लोकांना चांगली बातमी ऐकायला मिळणार आहे. तर, कन्या, मकर राशीसाठी आजचा दिवस तितका लाभदायक नसणार आहे. मेष ते मीन राशीसाठी कसा असेल सोमवारचा दिवस? काय सांगतात तुमच्या नशीबाचे तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
Beed Vidhan Sabha : निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
kannad vidhan sabha: सगळं सहन केलं, माझ्या जागेवर दुसरीला आणलं, दानवेंची लेक ढसाढसा रडली, भर सभेत नवऱ्याचं सगळं सांगितलं!
लेकीचा बाप होता म्हणून सगळं सहन केलं, रावसाहेब दानवेंची कन्या भरसभेत रडली, नवऱ्याबद्दल सगळं सांगून टाकलं
Jayant Patil: भाजपचा प्लॅन आधीपासूनच ठरलाय, एकनाथ शिंदे-अजित पवारांचा पत्ता कट होणार, फडणवीसच मुख्यमंत्री होतील: जयंत पाटील
शिंदे-अजितदादांचा पत्ता कट होणार, भाजपचं देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं ठरलंय: जयंत पाटील
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 18 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 8 AM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सWaris Pathan Cried in Bhiwandi : सगळे हात धुवून मागे लागलेत, वारिस पठाण ढसाढसा रडले!Santaji Ghorpade attack : कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर जीवघेणा हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
Beed Vidhan Sabha : निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
kannad vidhan sabha: सगळं सहन केलं, माझ्या जागेवर दुसरीला आणलं, दानवेंची लेक ढसाढसा रडली, भर सभेत नवऱ्याचं सगळं सांगितलं!
लेकीचा बाप होता म्हणून सगळं सहन केलं, रावसाहेब दानवेंची कन्या भरसभेत रडली, नवऱ्याबद्दल सगळं सांगून टाकलं
Jayant Patil: भाजपचा प्लॅन आधीपासूनच ठरलाय, एकनाथ शिंदे-अजित पवारांचा पत्ता कट होणार, फडणवीसच मुख्यमंत्री होतील: जयंत पाटील
शिंदे-अजितदादांचा पत्ता कट होणार, भाजपचं देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं ठरलंय: जयंत पाटील
आधी शरद पवार म्हणाले थोरातांकडे नेतृत्त्व, आता जयंत पाटीलही रेसमध्ये, मुख्यमंत्रिपदावर बोलताना थेट म्हणाले; इच्छा तर...
आधी शरद पवार म्हणाले थोरातांकडे नेतृत्त्व, आता जयंत पाटीलही रेसमध्ये, मुख्यमंत्रिपदावर बोलताना थेट म्हणाले; इच्छा तर...
Santaji Ghorpade attack: मोठी बातमी: कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
Horoscope Today 18 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget