Jaipur Express Firing : जयपूर एक्स्प्रेसमध्ये RPF कॉन्स्टेबलकडून गोळीबार, चार जणांचा मृत्यू
Jaipur Express Firing : जयपूर एक्स्प्रेसमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. जयपूर एक्स्प्रेस ट्रेनमध्ये पहाटे पाचच्या सुमारास गोळीबार झाला. यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला. आरपीएफ कॉन्स्टेबलनेच गोळीबार केला असून त्याला ताब्यात घेतलं आहे.
Jaipur Express Firing : जयपूर एक्स्प्रेसमध्ये (Jaipur Express) धक्कादायक घटना घडली आहे. जयपूर एक्स्प्रेस ट्रेनमध्ये पहाटे पाचच्या सुमारास गोळीबार (Firing) झाला. यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला. आरपीएफ कॉन्स्टेबलनेच गोळीबार केला असून त्याला ताब्यात घेतलं आहे. मृतांमध्ये आरपीएफच्या अधिकारी आणि तीन प्रवाशांचा समावेश आहे. चेतन सिंह असं आरोपी आरपीएफ कॉन्स्टेबलचं नाव आहे.
ही ट्रेन राजस्थानमधून महाराष्ट्रातील पालघरमध्ये (Palghar) दाखल होताच या ट्रेनमध्ये गोळीबार झाला. या गोळीबारात चार जण जागीच गतप्राण झाले. तर काही प्रवासी जखमी झाल्याचं प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळतात जीआरपी पोलीस आणि आरपीएफ पोलीस घटनास्थळावर दाखल होऊन अधिक तपास करत आहेत. गोळीबारानंतर पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतलं आहे. सध्या ही मुंबई सेंट्रल इथे दाखल झाली आहे.
An RPF constable opened fire inside a moving Jaipur Express Train after it crossed Palghar Station. He shot one RPF ASI and three other passengers and jumped out of the train near Dahisar Station. The accused constable has been detained along with his weapon. More details…
— ANI (@ANI) July 31, 2023
आरपीएफ कॉन्स्टेबलकडून गोळीबार, चौघांचा मृत्यू
राजस्थान ते मुंबई सेंट्रल या जयपूर एक्स्प्रेसमध्ये आज पहाटे पाचच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. ट्रेन पालघरमध्ये पोहोचताच B-5 डब्यात अचानक गोळीबाराचा आवाज झाला. आरपीएफ जवानानेच सहकाऱ्यासह प्रवाशांवर गोळीबार केला. यात चार जणांचा मृत्यू झाला. गोळीबाराच्या आवाजाने डब्यात बसलेल्या प्रवाशांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.
गोळीबाराचं कारण काय?
आरपीएफ हवालदार चेतन सिंहचा ट्रेनच्या डब्यातील काही प्रवाशांसोबत वाद झाला होता. यावेळी संतापलेल्या चेतन सिंहने प्रवाशांचे दिशेने बंदूक उगारली. मात्र सहकाऱ्याने त्याला थांबवण्याचा आणि शांत राहण्यास सांगितलं. परंतु रागात असलेला चेतन सिंह कोणालाही जुमानला नाही. त्याला थांबवणाऱ्या आरपीएफच्या कर्मचाऱ्यासह तीन प्रवाशांवर त्याने गोळीबार केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात
वापीहून बोरीवली, मीरा रोड स्टेशनदरम्यान गोळीबाराची घटना घडली. यानंतर जीआरपीच्या जवानांनी गोळीबार करणाऱ्या आरपीएफ कॉन्स्टेबलला ताब्यात घेऊन बोरीवलीला आणलं आहे. तर चार जणांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. मानसिक तणावातून आरपीएफ कॉन्स्टेबलने गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
VIDEO : Jaipur Express Firing News : जयपूर मुंबई एक्स्प्रेसमध्ये गोळीबार, पालघरजवळ घडली घटना