एक्स्प्लोर

NDA MPs Meeting: मिशन 2024 साठी एनडीएच्या खासदारांची आज पहिली बैठक, पंतप्रधान नरेंद्र मोदी खासदारांना देणार यशाचा कानमंत्र

NDA MPs Meeting: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एनडीच्या बैठकांचं सत्र आता सुरू होणार आहे.

NDA MPs Meeting: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार (31 जुलै) रोजी एनडीएच्या (NDA) खासदारांची बैठक पार पडणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यशाचा कानमंत्र देण्याची शक्यता आहे. एनडीएमधील खासदारांच्या बैठकीचा (Meeting) कार्यक्रम हा 11 दिवसांचा असणार आहे. 

2024 च्या लोकसभा निवडणुकांची (Loksabha Election) रणनिती आखण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या सर्व खासदारांच्या 31 जुलै ते 10 ऑगस्ट दरम्यान विविध गटांमध्ये बैठकांचं नियोजन करण्यात आलं असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. तर पक्षाने दिलेल्या माहितीनुसार, एनडीएच्या खासदारांचे एकूण 11 गट तयार करण्यात आले आहेत. या 11 गटांपैकी एका दिवसांत दोन गटांची बैठक घेण्यात येणार आहे. सोमवार (31 जुलै) रोजी संध्याकाळी 6:30  वाजता उत्तर प्रदेशच्या खासदारांसोबत पहिली बैठक सुरू होणार आहे. तर दुसरी बैठक ही सोमवार (31 जुलै) रोजी संध्याकाळी 7:30 वाजल्यापासून सुरु होणार आहे. 

एनडीएच्या खासदारांची पहिली आणि दुसरी बैठक

एनडीएच्या कानपूर, बुंदेलखंड, ब्रज (उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थान) इथल्या खासदारांसोबत होणार आहे. ही बैठक दिल्लीत महाराष्ट्र सदनात आयोजित संध्याकाळी 6:30  वाजता आयोजित करण्यात आली आहे.  या बैठकीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप नेते संजीव बल्यान आणि बीएल वर्मा उपस्थित राहणार आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी होणाऱ्या दोन्ही बैठका या वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहेत. तर प्रत्येक गटाच्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: उपस्थित राहणार आहेत. तर सोमवारी (31 जुलै) रोजी संध्याकाळी 7:30 होणाऱ्या दुसऱ्या बैठकीमध्ये पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओडिशा राज्यातील खासदार सहभागी होणार आहेत. या बैठकीमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, धर्मेंद्र प्रधान, शंतनू ठाकूर, भाजप नेते बैजयंत पांडा आणि दिलीप घोष उपस्थित राहणार आहेत. ही बैठकी संसद भवनात होणार आहे. 

आगामी लोकसभा निवडणुकांची तयारी

2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी अवघे काही महिनेच शिल्लक राहिले आहेत. त्याआधी पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भाजपच्या खासदारांच्या या बैठका महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह  तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यावर  एनडीएच्या नेत्यांशी संवाद साधण्याची  जबाबदारी देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Monsoon Session: संसदेत आज सादर होऊ शकतं दिल्ली सेवा विधेयक; 'INDIA' च्या खासदारांची रणनिती काय? सभागृहात पुन्हा गदारोळाची शक्यता

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Supporters: कराडवर लोकांचं प्रेम, परळी थांबलीय, कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतलंAjit Pawar On Walmik Karad | दोषींवर योग्य ती कारवाई केली जाणार, मुंडेंबाबत प्रश्न अजितदादा म्हणाले...ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5PM 14 January 2025Top 25 | टॉप 25 बातम्यांच्या सुपरफास्ट आढावा सुपरफास्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Walmik Karad Mcoca: हिवाळी अधिवेशनात वात पेटवली अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
हिवाळी अधिवेशनात 'आका' 'आका' बोलत रान पेटवलं, अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget