एक्स्प्लोर
India TV CNX Survey: सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होऊन मोदी नेहरुंची बरोबरी करणार? सर्वेक्षणाचा धक्कादायक निष्कर्ष
Lok Sabha Opinion Poll: 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. सत्ताधाऱ्यांची आघाडी एनडीए (NDA) आणि विरोधकांची आघाडी इंडिया (INDIA) नं आगामी निवडणुकांसाठी कंबर कसली आहे.

Lok Sabha Opinion Poll
1/9

अशातच, एका नव्या सर्वेक्षणाचे आकडे समोर आले आहेत, जनतेचा नेमका कौल कोणाच्या बाजूने आहे, ते जाणून घेऊयात...
2/9

इंडिया टीव्ही CNX नं 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी एक सर्वेक्षण केलं आहे. विरोधी आघाडी इंडियाच्या स्थापनेनंतरच्या या सर्वेक्षणाचे निष्कर्ष आश्चर्यकारक आहेत.
3/9

सर्वेक्षणानुसार, आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएला सर्वाधिक पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. सर्वेक्षणात सत्ताधाऱ्यांची युती असलेला एनडीए 318 जागा जिंकू शकतो, असा निष्कर्ष आला आहे.
4/9

सर्वेक्षणातून समोर आलेल्या निष्कर्षानुसार, नरेंद्र मोदी जर पुन्हा पंतप्रधान झाले तर तो एक विक्रम ठरेल. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी विराजमान होणारे मोदी हे दुसरे पंतप्रधान असतील.
5/9

सर्वेक्षणानुसार, विरोधी आघाडी 'इंडिया' बहुमताच्या आकड्यापासून दूर आहे. लोकसभेच्या एकूण 543 पैकी 175 जागा इंडियाला मिळण्याचा अंदाज आहे. तर इतरांना 50 जागा मिळू शकतात.
6/9

मात्र, सर्वेक्षणात काँग्रेसच्या जागा वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. इंडियासोबतच्या युतीचा फायदा काँग्रेसला होताना दिसत आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला 52 जागांच्या तुलनेत यावेळी 66 जागा मिळण्याची अपेक्षा आहे.
7/9

2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला एकहाती 290 जागांवर विजय मिळण्याची अपेक्षा आहे. तर त्यांची भागीदार शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) गटाला प्रत्येकी दोन जागा मिळू शकतात.
8/9

सर्वेक्षणातून अरविंद केजरीवाल यांच्या 'आप'ला 10 जागा मिळण्याची शक्यता समोर आली आहे. तर ममता बॅनर्जी यांचा पक्ष टीएमसीला आधीपेक्षा जास्त जागा मिळू शकतात. पक्षाला 29 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
9/9

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या बीजेडी पक्षाला 13 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला 11 जागा मिळू शकतात. राष्ट्रवादी (शरद पवार) गटाला 4 जागा मिळण्याची शक्यता आहे.
Published at : 31 Jul 2023 07:54 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
कोल्हापूर
क्राईम
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
