Morning Headlines 26th June : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
![Morning Headlines 26th June : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज morning headlines breaking national state news live headlines bulletin morning today 26 june 2023 marathi news Morning Headlines 26th June : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/26/2a6205b37f530f3c7887a83386a9df8b168775009974589_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
मुख्यमंत्री केसीआर यांना मोठा झटका, तेलंगणातील बीआरएसच्या दीड डझन नेत्यांचा पक्षाला रामराम
महाराष्ट्रात पक्षविस्तारासाठी जोर लावलेल्या मुख्यमंत्री केसीआर यांना राज्यातच मोठा झटका बसलाय. तेलंगणातील BRS चे जवळपास दीड डझन नेते आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. BRS चे माजी खासदार पी.एस. रेड्डी, माजी मंत्री कृष्णा राव आदी नेते आज दिल्लीत मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. (वाचा सविस्तर)
हिमाचल प्रदेशात ढगफुटी, उत्तराखंडमध्ये भूस्खलन; मुंबईसह दिल्लीत ठिकठिकाणी साचलं पाणी, पर्वतीय भागात अलर्ट जारी
देशात गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेला मान्सून (Monsoon) पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. डोंगराळ भागात लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) काही ठिकाणी भूस्खलनाच्या (Landslide) घटना समोर आल्या आहेत. तर हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) शिमल्यात (Shimala) ढगफुटी झाली आहे (वाचा सविस्तर)
अमेरिका आणि भारताच्या संबंधांमुळे चीन अस्वस्थ, अमेरिकेपासून दूर राहण्याचा भारताला दिला इशारा
चीन (China) सरकारच्या ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्रामध्ये एक लेख छापण्यात आला आहे. या लेखामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अमेरिकेच्या (America) दौऱ्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. तसेच या लेखामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करत भारताला इशारा देखील देण्यात आला आहे. (वाचा सविस्तर)
आता दिवसा आणि रात्रीचं वीज बिल वेगळं, केंद्र सरकार नवा TOD नियम लागू करणार; तुमच्यावर खिशावर कसा परिणाम होईल? जाणून घ्या
केंद्र सरकारकडून वीज वापरकर्त्यांसाठी नवा नियम लागू करण्यात येणार आहे. यानुसार विज उपभोक्यांना दिवसा आणि रात्रीसाठी वेगवेगळं बिल आकारण्यात येईल. केंद्र सरकार वीज वापरकर्त्यांसाठी नवीन टाइम ऑफ डे (TOD) वीज टॅरिफ लागू करणार आहे. यानुसार ग्राहकांसाठी दिवसा आणि रात्रीचा वेगळा वीज दर आकारण्यात येईल. (वाचा सविस्तर)
पशुपतीनाथ मंदिरातून 10 किलो सोने गायब,नेपाळ सरकारच्या सीआयएकडून सोन्याचा तपास सुरू
नेपाळच्या पशुपतीनाथ मंदिरातून तब्बल 10 किलो सोनं गायब झालंय.यानंतर चोरीच्या तपासासाठी भ्रष्टाचारविरोधी संस्थेने मंदिर परिसराचा ताबा घेतला. त्यामुळे रविवारी पशुपतीनाथाचं मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आलं होतं. (वाचा सविस्तर)
Russia Wagner Conflict : रशियामध्ये पुतिन यांच्याविरोधातील वॅनगर ग्रुपचं बंड थंडावलं, पुतीन यांना देशांतर्गत बंड मोडण्यात यश
रशियामध्ये (Russia) तणाव होता. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची सत्ता जाणार? त्यांच्या जागी नवा राष्ट्राध्यक्ष होणार अशा चर्चा होत्या.. रशियाचं खासगी सैन्य असलेल्या वॅगनर ग्रुपनं बंड केलं. मात्र, राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना देशांतर्गत बंड मोडण्यात यश आले आहे. (वाचा सविस्तर)
कर्क, वृश्चिक, मकरसह 'या' राशीच्या लोकांना आज आर्थिक लाभ होईल; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य
आज सोमवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार मेष राशीचे लोक आज व्यवसाय वाढवण्यात यशस्वी होतील. कन्या राशीच्या लोकांना नोकरीत बढतीची संधी मिळेल. मेष ते मीन राशीसाठी आजचा सोमवार कसा असेल? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? (जाणून घ्या आजचं राशीभविष्य)
दात घासण्याच्या ब्रशचं पेटंट चीनच्या राजाकडे, सामाजिक क्रांतीचे प्रणेते शाहू महाराजांचा जन्म; आज इतिहासात
देशाच्या समाजसुधारणेच्या इतिहासात आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. सामाजिक क्रांतीचे प्रणेते अशी ओळख असलेले राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला. शाहू महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. (वाचा सविस्तर)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)