Electricity Bill : आता दिवसा आणि रात्रीचं वीज बिल वेगळं, केंद्र सरकार नवा TOD नियम लागू करणार; तुमच्यावर खिशावर कसा परिणाम होईल? जाणून घ्या
TOD Tariff on Electricity : केंद्र सरकार टाइम ऑफ डे (TOD) दर प्रणाली लागू करणार आहे. त्यामुळे दिवसा आणि रात्री वेगवेगळी वीज दर आकारला जाणार आहे. याचा फायदा आहे की नुकसान ते जाणून घ्या.
Electricity Bill New Rule : केंद्र सरकारकडून वीज वापरकर्त्यांसाठी नवा नियम लागू करण्यात येणार आहे. यानुसार विज उपभोक्यांना दिवसा आणि रात्रीसाठी वेगवेगळं बिल आकारण्यात येईल. केंद्र सरकार वीज वापरकर्त्यांसाठी नवीन टाइम ऑफ डे (TOD) वीज टॅरिफ लागू करणार आहे. यानुसार ग्राहकांसाठी दिवसा आणि रात्रीचा वेगळा वीज दर आकारण्यात येईल. केंद्र सरकार लवकरच वीज ग्राहकांचे हक्क नियम 2020 मध्ये सुधारणा करणार आहे. या नवीन दर धोरणाची अंमलबजावणी झाल्यानंतर ग्राहकांना दिवसा आणि रात्रीचे वेगवेगळे वीज बिल भरावे लागणार आहे.
आता दिवसा आणि रात्रीचं वीज बिल वेगळं
नवीन टाइम ऑफ डे (TOD) वीज टॅरिफ लागू झाल्यानंतर ग्राहकांना दिवसा आणि रात्रीसाठी वेगवेगळं वीज बिल द्यावं लागेल. दिवसा वीज बिलात ग्राहकांची 20 टक्के बचत होऊ शकते, पण रात्री वीज बिल 10 ते 20 टक्क्यांनी महागणार आहे. म्हणजे दिवसाच्या तुलनेत रात्री 10 ते 20 टक्के जास्त बिल भरावे लागणार आहे. एकीकडे कोळशावर आधारित थर्मल पॉवर प्लांट्समधून उत्पादित होणारी वीज महाग होत आहे, तर दुसरीकडे सरकारने हरित ऊर्जेचा प्रचार करून ग्राहकांना सौरऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी प्रवृत्त करावे, यासाठी केंद्र सरकार नवीन नियम लागू करण्याच्या विचारात आहे.
दिवसा आणि रात्री वेगळा दर का?
दिवसा सौर उर्जेवर वीज पुरवठा केला जाईल, यामुळे दिवसा वीज दर कमी असेल. तर रात्रीच्या वेळेत कोळशावर तयार झालेला वीजपुरवठा करण्यात येईल त्यामुळे दर जास्त असेल. यामुळे कोळशावर आधारित वीजनिर्मिती केंद्रांपासून बनवलेल्या विजेची मागणी कमी होईल. सौर तासांमधील वीज नियोजन करून ग्राहक बिलांमध्ये 20 टक्क्यांपर्यंत बचत करू शकतात. मात्र रात्रीच्या वेळी जास्त वीज वापरल्यास सामान्यपेक्षा जास्त वीज मोजावी लागेल. कारण पीक अवर्समध्ये (Peak Hours) टॅरिफ 10-20 टक्के जास्त असेल.
याबाबत अधिक माहिती समजून घ्या...
- 24 तास एकाच दराने वीज बिल भरण्याऐवजी ग्राहक दिवसातील वेगवेगळ्या वेळेनुसार वेगवेगळी वीजबिल भरतील. अशा प्रकारे ते त्यांचा वीज वापराचं व्यवस्थापन करू शकतात.
- टीओडी लागू केल्यामुळे, ग्राहक विजेच्या सर्वाधिक वापराच्या वेळेत कपडे धुणे आणि स्वयंपाक करणे यासारखी अधिक वीज वापरणारी कामे टाळतील. याद्वारे ते विजेची बचत करू शकतात. पण रात्रीच्या वेळी एसी आणि इतर इलेक्ट्रिक उपकरणे वापरल्यास वीज बिल जास्त भरावे लागेल.
- सौर उर्जेवर होणाऱ्या वीज पुरवठ्यावेळी ग्राहक वीज बिलांमध्ये 20 टक्क्यांपर्यंत बचत करू शकतात.
- रात्रीच्या वेळी जास्त वीज वापरल्यास ग्राहकांना सामान्यपेक्षा जास्त वीज बिल भरावं लागेल, कारण पीक अवरमध्ये वीज दर 10 ते 20 टक्के जास्त असेल.