एक्स्प्लोर

Russia Wagner Conflict : रशियामध्ये पुतिन यांच्याविरोधातील वॅनगर ग्रुपचं बंड थंडावलं, पुतीन यांना देशांतर्गत बंड मोडण्यात यश

Wagner Rebel: प्रिगॉजीन यांनी जवानांना माघार घेण्याचे आदेश दिले आणि रशियातलं गृहयुद्ध टळलं.

Russia Wagner Conflict Update: रशियामध्ये (Russia) तणाव होता. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची सत्ता जाणार? त्यांच्या जागी नवा राष्ट्राध्यक्ष होणार अशा चर्चा होत्या.. रशियाचं खासगी सैन्य असलेल्या वॅगनर ग्रुपनं बंड केलं. मात्र, राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना देशांतर्गत बंड मोडण्यात यश आले आहे.  

युक्रेनसोबत गेल्या दीड वर्षांपासून रशिया युद्ध करत आहे. जगातील बलाढ्य देशांनीही रशियावर नको तितके निर्बंध आणले. व्लादिमीर पुतिन मागे हटले नाही. फेब्रुवारी 2022 मध्ये पुतिन यांनी युक्रेनवर सशस्त्र हल्ला करण्याचे आदेश दिले. बलाढ्य युक्रेनचा टिकाव होणार का? असा सवाल फेब्रुवारी 2022 मध्ये अनेकांनी उपस्थित केला. अनेकांनी तर दावेही केले की युक्रेन काही महिन्यांमध्ये हार मानणार. युक्रेनचा पराभव होईल. मात्र, आज दीड वर्षानंतरही युद्धामध्ये युक्रेनचं आव्हान कायम आहे.इतकंच नाही युक्रेननं रशियाच्या ताब्यातून आपले अनेक प्रदेश परत मिळवले. अनेक ठिकाणांहून रशियन फौजांना माघार घ्यावी लागली आहे. 

हे सगळं होत असतानाच रशियाची खाजगी सैन्य तुकडी वॅगनर ग्रुपनं आपल्या सैन्यविरोधात उठाव करत युक्रेन सीमेवरच्या रोस्तव ऑन डॉन शहरावर ताबा मिळवला. शहरातल्या प्रत्येक चौकात वॅगनरचे जवान दिसू लागले. त्यांचे रणगाडे रस्त्यांवर परेड करु लागले आणि याचं नेतृत्व करत होते. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचेच मित्र आणि वॅगनरचे प्रमुख येवगेनी प्रिगॉजीन आहेत 

कोण आहे येवगेनी प्रिगॉजीन?

येवगेनी प्रिगॉजीन यांचा  जन्म 1961 साली झाला. पुतीन आणि येवगेनी एकाच शहरातले वयाच्या 18 व्या वर्षी दरोडा प्रकरणात तुरुगांत गेला. 20 वर्षांचा असताना पुन्ही 13 वर्षांची शिक्षा झाली. तुरुगांतून सुटल्यानंतर काही महिन्यात एका हॉटेलाचा मालक बनलाय पुढे देशात त्यांच्या हॉटेल्सची संख्या वाढली. काही वर्षांनी त्यांना राष्ट्रपती पुतीन यांच्या निवासस्थानी अन्न पुरवण्याचे कंत्राट मिळालेय. पुतीन यांना अन्न पुरणावारा म्हणून त्यांना 'पुतीनचा शेफ' अशी ओळख मिळाली

 गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या प्रिगॉजीनकडे पुतिन यांनीच खाजगी सैन्य तुकडी वॅगनरची जबाबदारी दिली. अनेक लष्करी कारवायांचं नेतृत्वही प्रिगॉजीन यांनीचं केलं आणि 2022 साली याच ग्रुपला अधिकृत मान्यताही मिळाल. आता याच वॅगनर ग्रुपनं उठाव केला. 

राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यावर गंभीर आरोप करत बंडखोरीला सुरुवात केली. आता तो ग्रुप पुतीन यांच्याविरोधात झाला. म्हणून पुतीन यांनी तातडीनं बैठक आयोजित केली आणि माध्यमांसमोर येत वॅगनरला मोठा इशारा दिला. पुतीन म्हणाले,  वॅगनर ग्रुपनं रशियाच्या पाठीत खंजीर खुपसलाय याचबंडखोरांपासून आम्ही देशाला वाचवू. वॅगनरनं थेट रशियाला आव्हान दिले आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत नागरिकांचे रक्षण करू. रशियाचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी वाटेल ते करणार. बंडखोरांविरोधात प्रत्येकानं एकजूट व्हा, आपआपसातले गैरसमज दूर करा. मतभेद असतील तर तेही दूर करा. देशाशी गद्दारी करणाऱ्यांना सजा मिळेलय देशद्रोह्यांना रोखण्यासाठी लष्कराला पूर्णपणे स्वातंत्र्य दिलंय. लवकरात लवकर वॅगनरला उत्तर मिळेल. 

रशियातील तणाव वाढत होता. बेलारुस आणि युक्रेनमध्ये हालचालीला वेग येत होता.पुतीन यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बेलारुसचे राष्ट्रपती अलेक्झांडर लुकाशेन्को यांच्याशी चर्चा केली आणि वॅगनरचं बंड मोडित काढण्यासाठी  प्लॅन बी अॅक्टिव्ह केला. मॉस्कोमध्ये क्रेमलिनसमोर लष्कराच्या तुकड्या तैनात केल्या. वॅगनरचे जवान मास्कोत शिरले तर त्यांना रोखण्यासाठी संपूर्ण तयारी सुरु झाली.दुसरीकडे रोस्तोवमधून निघालेले वॅगनर्सचे जवान मॉस्कोपासून दोन तास अंतरावर पोहोचले स्थिती चिघळत होती..

पुतिन यांच्या प्लॅन बीमध्ये दुसरा पार्ट होता. अटी शर्थींसह वॅगनर्सची माघार त्यासाठी बेलारुसचे राष्ट्रपती अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी वॅगनरचे प्रमुख प्रिगॉजीन यांच्याशी फोन वरुन चर्चा केली. वॅगनर्सवरचे सर्व गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन मिळाले. प्रिगॉजीन यांनी जवानांना माघार घेण्याचे आदेश दिले आणि रशियातलं गृहयुद्ध टळलं. खरंतर, वॅगनर्सच्या निर्णयावर पुतिन यांचं अधिकृत वक्तव्य आलेलं नाहीय. पण,सध्या तरी रशियातील तणाव निवळलाय.मात्र, 48 तासांमधील सगळ्या घडामोडींनी राष्ट्राधयक्ष पुतिन यांच्यासमोरची  आव्हानं मात्र नक्कीच वाढवली आहेत.

हे ही वाचा :

Russia: वॅगनर म्हणजे आहेत तरी कोण? पुतीनच्या इशाऱ्यावर काम करणारे आज त्यांच्यावर उलटले!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्काAssembly Election Result 2024 : निकालाआधी सत्तेची जुळवाजुळव सुरु? अपक्षाची भूमिका महत्वाची?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
Embed widget