Morning Headlines 24th July: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस, मणिपूरच्या मुद्द्यावर दोन्ही सभागृहांमध्ये घमासान होण्याची शक्यता
संसदेच्या (Parliament) पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. त्याच पार्श्वभूमीवर संसदेत विरोधी पक्षांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ मणिपूरच्या दौऱ्याला पाठवण्याच्या विषयावर चर्चा होऊ शकते. तर दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षांकडून पंतप्रधानांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण देण्याची मागणी जोर धरु शकते. (वाचा सविस्तर)
उत्तर प्रदेश-राजस्थानमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, वाचा हवामान विभागाचा अंदाज
देशभरातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. या पावसामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (वाचा सविस्तर)
मणिपूर पोलिसांना पुराव्यांसह मिळाला 'तो' मोबाईल; ज्यात रेकॉर्ड करण्यात आला विवस्त्र धिंडीचा व्हिडीओ
मणिपूरमध्ये 4 मे रोजी दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्याप्रकरणी (Manipur Violence) मणिपूर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सहा आरोपींना अटक केली आहे. कारवाईदरम्यान एका आरोपीकडून मोबाईल फोन जप्त करण्यात आला असून, या फोनचा वापर घटनेचा व्हिडीओ बनवण्यासाठी करण्यात आल्याचा पोलिसांचा अंदाज आहे (वाचा सविस्तर)
पहिल्या पत्नीचा इन्स्टाग्राम रील पाहणे पडलं महागात, दुसऱ्या पत्नीने ब्लेडने कापला पतीचा...
आधी एका पत्नीला घटस्फोट द्यायचा, मग दुसरं लग्न करायचं... त्यानंतरही परत उपरती आली की पहिल्या पत्नीच्या मागे लागायचं किंवा तिसरीकडेच लफडं करायचं असं कृत्य अनेकजण करतात. हे समोर आल्यानंतर काहीजण निभावून नेतात, पण काही जणांना जन्माची अद्दल घडते. पण असं काहीही न करता फक्त पहिल्या पत्नीचा इन्स्टाग्राम रील पाहल्यानंतर पहिली पत्नी त्याला काय शिक्षा देईल असं वाटतं? आंध्र प्रदेशमध्ये अशीच काहीशी घटना घडली (वाचा सविस्तर)
महाराष्ट्रासह गुजरातमध्ये पावसाचा कहर, अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत
महाराष्ट्रापाठोपाठ आता गुजरातमध्येही पावसानं हाहाकार माजवलाय. गुजरातमधल्या अनेक शहरात पूरस्थिती (Flood) निर्माण झालीये. त्यामुळे जनजिवन विस्कळीत झालंय. जुनागडमध्ये पुराच्या पाण्यात काहीजण अडकले होते. त्यांना एनडीआरफच्या मदतीने बाहेर काढण्यात आलंय. नवसारी शहरातही पाणी शिरलंय. (वाचा सविस्तर)
इलॉन मस्क आता ट्विटरची 'चिमणी' बदलणार... नव्या रंगात आणि नव्या लोगोसह Twitter येणार यूजर्सच्या भेटीला
सातत्याने काहीतरी नवीन करायचा छंद असलेल्या इलॉन मस्क यांने आता ट्विटरचे रंगरूप बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ट्विटरचा लोगो असलेली चिमणी आता बदलणार असून त्यासोबत त्याचा निळा रंगही बदलण्यात येणार आहे. (वाचा सविस्तर)
Opposition Party Meeting : विरोधी पक्षांच्या एकजूटीचं नाव INDIA ठेवणं योग्य आहे का? सर्वेक्षणातून अहवाल समोर
आगामी लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांकडून भाजपविरोधात एकजूट करण्यात आली आहे. यामध्ये 26 पक्षांनी सहभाग घेतला आहे. विरोधी पक्षांच्या या एकजूटीला इंडिया असं नाव देण्यात आलं आहे.(वाचा सविस्तर)
मेष, सिंह, तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य
आज सोमवार हा एक महत्त्वाचा दिवस आहे. वृषभ राशीच्या लोकांच्या नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. तर तूळ राशीच्या बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याची चिन्हे आहेत. आज कुंभ राशीला सावध राहण्याची गरज आहे. मेष ते मीन राशीसाठी आजचा सोमवार कसा राहील? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. (वाचा सविस्तर)