एक्स्प्लोर

Manipur Violence: मणिपूर पोलिसांना पुराव्यांसह मिळाला 'तो' मोबाईल; ज्यात रेकॉर्ड करण्यात आला विवस्त्र धिंडीचा व्हिडीओ

Manipur Violence Video: महिलांची विवस्त्र धिंड काढल्याप्रकरणी मणिपूर पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीसह एकूण सहा आरोपींना अटक केली आहे.

Manipur Viral Video: मणिपूरमध्ये 4 मे रोजी दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्याप्रकरणी (Manipur Violence) मणिपूर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सहा आरोपींना अटक केली आहे. कारवाईदरम्यान एका आरोपीकडून मोबाईल फोन जप्त करण्यात आला असून, या फोनचा वापर घटनेचा व्हिडीओ बनवण्यासाठी करण्यात आल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिस तपासात जप्त करण्यात आलेला मोबाईल फोन हा महत्त्वाचा दुवा ठरू शकतो.

आरोपींना 11 दिवसांची पोलीस कोठडी

मणिपूर पोलिसांनी रविवारी (23 जुलै) रात्री ट्विट केलं आहे, अटक करण्यात आलेल्या आरोपींना 11 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचं त्यांनी म्हंटलं. अन्य संशयितांचा शोध सुरू असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

सायबर सेलकडे पाठवण्यात आला फोन

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, एका पोलीस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली आहे. या अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, मणिपूर अत्याचाराच्या प्रकरणात एक फोन जप्त करण्यात आला असून तो सायबर सेलकडे पाठवण्यात आला आहे. आम्हाला खात्री आहे की हा तोच फोन आहे ज्यावरून व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला होता, असंही पोलीस अधिकाऱ्याने म्हटलं आहे.

मणिपूर प्रकरणाचा अधिक तपास सुरू

या घटनेत सहभागी असलेल्या इतरांची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी अटक केलेल्या सहा आरोपींची चौकशी केली जात आहे. 4 मे रोजी कांगपोकपी जिल्ह्यात जमावाने दोन महिलांची विवस्त्र धिंड काढली होती. या घटनेचा व्हिडिओ दोन महिन्यांहून अधिक कालावधीनंतर 19 जुलै रोजी व्हायरल झाला, ज्यामुळे देशभरात संताप पसरला आणि त्याविरोधात निदर्शनं झाली. यानंतर 20 जुलै रोजी पोलिसांनी या प्रकरणात पहिली अटक केली.

अधिकारी म्हणाले - अफवांमुळे हिंसाचार वाढला

मणिपूरमध्ये 3 मे पासून सुरू झालेल्या जातीय हिंसाचारात 160 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. पीटीआयच्या म्हणण्यानुसार, राज्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवणाऱ्या विविध सुरक्षा एजन्सींच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, अफवा आणि खोट्या बातम्यांमुळे हिंसाचार मोठ्या प्रमाणात वाढला.

अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, 4 मे रोजी दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आलेल्या भयानक घटनेमागे अफवाच कारणीभूत होती, जी सोशल मीडियावर एका महिलेचे पॉलिथिनमध्ये गुंडाळलेले मृत फोटो समोर आल्यानंतर घडली होती. हे फोटो समोर आल्यानंतर चुरचंदपूर येथील आदिवासींकडून पीडितेची हत्या केल्याचा खोटा दावा करण्यात आला. या संदर्भात एका अधिकाऱ्याने सांगितलं की, हे फोटो देशाच्या राजधानीत एका महिलेची हत्या झाल्याचे आहेत हे नंतर समजलं, पण तोपर्यंत चुरचंदपूर खोऱ्यात हिंसाचार उसळला होता आणि दुसऱ्या दिवशी जे काही घडलं ते मानवतेला लाज वाटेल असं होतं.

हेही वाचा:

Manipur Violence : मणिपूर हिंसाचार प्रकरणात सहाव्या आरोपीला अटक; अन्य आरोपींचा शोध सुरू

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : देशात आर्थिक संकटाचं वादळ येणार, सर्वसामान्य भरडले जाणार; पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर राहुल गांधींचा इशारा
देशात आर्थिक संकटाचं वादळ येणार, सर्वसामान्य भरडले जाणार; पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर राहुल गांधींचा इशारा
Dubare Elephant Attack : दोन हत्तींची झुंज लागली; लेकीला कडेवर घेऊन पत्नीसाठी लढला, चिमुरडीच्या डोळ्यादेखत आईचा चिरडून मृत्यू, घटनेनं डोळे पाणावले
दोन हत्तींची झुंज लागली; लेकीला कडेवर घेऊन पत्नीसाठी लढला, चिमुरडीच्या डोळ्यादेखत आईचा चिरडून मृत्यू, घटनेनं डोळे पाणावले
CM Vijay TVK Tamil Nadu: तामिळनाडूत कोणत्याही क्षणी निवडणुका लागू शकतात, विजय सरकार कधीही कोसळू शकतं; एम.के. स्टॅलिन यांच्या वक्तव्याने खळबळ
तामिळनाडूत कोणत्याही क्षणी निवडणुका लागू शकतात, विजय सरकार कधीही कोसळू शकतं; एम.के. स्टॅलिन यांच्या वक्तव्याने खळबळ
Stray Dogs Case Verdict: ‘गंभीर आजारी आणि धोकादायक कुत्र्यांना मारण्यावर विचार व्हावा’; भटक्या कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचे मोठे निर्देश
‘गंभीर आजारी आणि धोकादायक कुत्र्यांना मारण्यावर विचार व्हावा’; भटक्या कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचे मोठे निर्देश

व्हिडीओ

Bandra Slum Home Demolition : बांद्रा पूर्वेला स्टेशन परिसरात अनधिकृत घरांवर बुलढोझर
Sudhir Mungantiwar Nanded : मंत्रीपद सर्वकाही नाही; मी जनतेचा आवाज - मुनगंटीवार
Sanjay Raut : पंतप्रधान मोदींनी गौतम अदानींविरोधातील खटला काढून घेतला, खासदार संजय राऊतांची टीका
Sudhir Mungantiwar Nanded : मंत्रीपद माझ्यासाठी सर्वकाही नाही, मी जनतेचा आवाज उठवणारा! | ABP Majha
Silver Chappal Special Report : कोल्हापूरकरांचा नादच खुळा, सोन्यासारखा जावयाला चांदीचा जोडा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : देशात आर्थिक संकटाचं वादळ येणार, सर्वसामान्य भरडले जाणार; पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर राहुल गांधींचा इशारा
देशात आर्थिक संकटाचं वादळ येणार, सर्वसामान्य भरडले जाणार; पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर राहुल गांधींचा इशारा
Maharashtra Goverment Cabinet Decision: देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक; आजच्या संपूर्ण बैठकीत 1 धडाकेबाज निर्णय
देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक; आजच्या संपूर्ण बैठकीत 1 धडाकेबाज निर्णय
Shivraj Motegaonkar NEET Exam 2026 Paper Leak: डॉक्टर नसलेल्या शिवराज मोटेगावकरला टाकायचे होते मेडिकल कॉलेज; NEET देणाऱ्या स्वत:च्या मुलासाठी पेपर फोडला
डॉक्टर नसलेल्या शिवराज मोटेगावकरला टाकायचे होते मेडिकल कॉलेज; NEET देणाऱ्या स्वत:च्या मुलासाठी पेपर फोडला
Manisha Mandhare NEET Exam Paper Leak: प्रश्न ना लिहून ठेवले, ना मोबाईलमध्ये Save केले, पुरावाच मिळेना...मनीषा मांढरेने वापरली ट्रिक, तपास यंत्रणाही चक्रावली!
प्रश्न ना लिहून ठेवले, ना मोबाईलमध्ये Save केले, पुरावाच मिळेना...मनीषा मांढरेने वापरली ट्रिक, तपास यंत्रणाही चक्रावली!
Palghar Accident: 12 मृतदेह अंत्यदर्शनासाठी एका रांगेत ठेवले, बायकांचा हृदय विदीर्ण करणारा टाहो, पालघरच्या बापूगावमधील डोळे पाणावणारं दृश्य
12 मृतदेह अंत्यदर्शनासाठी एका रांगेत ठेवले, बायकांचा हृदय विदीर्ण करणारा टाहो, पालघरच्या बापूगावमधील डोळे पाणावणारं दृश्य
Pandharpur News : पंढरपूरातील विठ्ठल मंदिरात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ; युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षच्या व्हीआयपी दर्शनासाठी गेटवर धक्काबुक्की,
पंढरपूरातील विठ्ठल मंदिरात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ; युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षच्या व्हीआयपी दर्शनासाठी गेटवर धक्काबुक्की
Vidhan Parishad Election 2026 : विधान परिषदेच्या 17 जागांसाठी रणसंग्राम; संख्याबळामुळे महायुतीचे पारडे जड! अंबादास दानवे, बावनकुळे, धस यांच्यासह 'या' आमदारांच्या जागांवर होणार लढत
विधान परिषदेच्या 17 जागांसाठी रणसंग्राम; संख्याबळामुळे महायुतीचे पारडे जड! अंबादास दानवे, बावनकुळे, धस यांच्यासह 'या' आमदारांच्या जागांवर होणार लढत
IPL 2026 Playoffs Qualification Scenarios: जागा 1, पण 5 संघ शर्यतीत; IPL च्या प्लेऑफच्या पात्रतेसाठी चक्रावून टाकणारे समीकरणे
जागा 1, पण 5 संघ शर्यतीत; IPL च्या प्लेऑफच्या पात्रतेसाठी चक्रावून टाकणारे समीकरणे
Embed widget