एक्स्प्लोर

Elon Musk: इलॉन मस्क आता ट्विटरची 'चिमणी' बदलणार... नव्या रंगात आणि नव्या लोगोसह Twitter येणार यूजर्सच्या भेटीला

Twitter Rebranding News: इलॉन मस्कच्या सर्व कंपन्यांच्या लोगोत X आहे, त्यामुळे ट्विटरच्या नव्या लोगोमध्येही त्याचा समावेश असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

Elon Musk Twitter Latest News: सातत्याने काहीतरी नवीन करायचा छंद असलेल्या इलॉन मस्क यांने आता ट्विटरचे रंगरूप बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ट्विटरचा लोगो असलेली चिमणी आता बदलणार असून त्यासोबत त्याचा निळा रंगही बदलण्यात येणार आहे. 

इलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यापासून कंपनीत सतत काहीना काही बदल करत आहेत. त्यामुळे त्याचे कौतुक आणि टीकाही झाली. आता इलॉन मस्क ट्विटरची ओळख बदलणार आहे. वास्तविक इलॉन मस्क ट्विटरचा लोगो म्हणजेच बर्ड हटवण्याच्या तयारीत आहे. त्याने ट्विट (Elon Musk Tweet) केले की, "लवकरच आम्ही ट्विटर ब्रँडला आणि हळूहळू सर्व पक्ष्यांना हटवू."

 

दुसर्‍या ट्विटमध्ये,  इलॉन मस्क म्हणतो की, "आज रात्री एक छान X लोगो पोस्ट केला गेला तर, आम्ही तो उद्या जगभरात लाइव्ह करू." याआधीही मस्कने ट्विटरच्या धोरणात अनेकवेळा बदल केले आहेत, ज्याचा थेट परिणाम जगभरातील वापरकर्त्यांवर झाला आहे.

 

Twitter Rebranding News : X बर्डची जागा घेईल?

आता इलॉन मस्कने ट्विटरचा लोगो बदलण्याचे संकेत दिल्याने अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की, नवीन लोगो कसा असेल? असा अंदाज वर्तवला जात आहे की इलॉन मस्कने त्याच्या बहुतेक कंपन्यांच्या नावांमध्ये आणि लोगोमध्ये X या शब्दाचा समावेश केला आहे. त्यामुळे ट्विटरच्या नवीन लोगोवर देखील Xचे वर्चस्व असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अलीकडेच इलॉन मस्कने लॉन्च केलेल्या एका आर्टिफिशिअर कंपनीला xAI असे नाव देण्यात आले आहे. त्याच वेळी मस्कच्या स्पेस एक्सप्लोरेशन टेक्नॉलॉजीज कॉर्पोरेशन कंपनीचे नाव देखील स्पेसएक्स आहे. आता मस्क देखील X या शब्दाने ट्विटर बर्ड लोगो बदलण्याची तयारी करत असल्याची चर्चा आहे. त्याने ट्विटमध्ये लिहिलंय की, लोगो कसाही असेल पण त्यात X असेल.

Twitter News Update : यूजर्सनी नवीन लोगो सूचवला

इलॉन मस्कने रविवारी सकाळी 9.30 वाजता हे ट्विट केले आहे. या नव्या घोषणेनंतर त्याचे ट्विट आतापर्यंत तीन कोटीहून अधिक यूजर्सनी पाहिले आहे. या ट्विटवर अनेक यूजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आणि लोगोसंदर्भात विविध मीम्स शेअर केले.

अलीकडेच इलॉन मस्कने नवा नियम बनवला आहे, ज्याच्या अंतर्गत साइन इन न केलेले लोक ट्विट पाहू शकणार नाहीत. यापूर्वी, यूजर्सचे प्रोफाइल किंवा ट्विट पाहण्यासाठी ट्विटरवर खाते तयार करण्याची गरज नव्हती. मस्क यांनी या नियमाबाबत युक्तिवाद केला की ट्विटरमधून इतका डेटा येत आहे की सामान्य वापरकर्त्यांच्या सेवांवर नकारात्मक परिणाम होत आहे.

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
Tech-Neck Problem Health News: मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
Instagram Ban In India Fact Check: मोदी सरकार 25 ऑगस्टपासून इन्स्टाग्राम बंद करणार? व्हायरल पोस्टने खळबळ, सरकारची मोठी अपडेट
मोदी सरकार 25 ऑगस्टपासून इन्स्टाग्राम बंद करणार? व्हायरल पोस्टने खळबळ, सरकारची मोठी अपडेट
Telegram : टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली, कारवाईसाठी 15 दिवसांची मुदत, नेमकं काय घडलं?
टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली,15 दिवसांचा वेळ दिला, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget