Morning Headlines 10th May: मॉर्निंग न्यूजमध्ये वाचा, देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
देश विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
1. Karnataka Election 2023 : कर्नाटक विधानसभेसाठी आज मतदान, 5 कोटी 31 लाख मतदार बजावणार हक्क
Karnataka Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी (Karnataka Election 2023) आज मतदान होणार आहे. मतदार कर्नाटकमध्ये सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती देणार हे आज ठरवणार आहेत. आज (10 मे) सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी कर्नाटकातील 5 कोटी 31 लाख मतदार मतदान करणार असून हे मतदान राज्यातील 2,615 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. वाचा सविस्तर
2. Weather Updates : सावधान! देशात उन्हाचा चटका वाढणार, पारा 42 अंशावर जाण्याची शक्यता; वाचा हवामान विभागाचा अंदाज
Weather Updates : देशातील वातावरणात सातत्यानं बदल (Climete change) होत आहे. कधी उन्हाचा चटका तर कधी अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) पडत आहे. या बदलत्या वातावरणाचा शेती पिकांसह (Agriculture Crop) मानवी आरोग्यावरही परिणाम होत आहे. सध्या देशात अनेक भागात अवकाळी पाऊस पडत आहे. अशातच येत्या काही दिवसात देशातील तापमानात वाढ होणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. देशातील अनेक भागात कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसची वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय काही भागात तापमानाचा पारा 42 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे. वाचा सविस्तर
3. DU Notice Rahul Gandhi : दिल्ली युनिव्हर्सिटी राहुल गांधींना नोटीस पाठवणार, भविष्यात परवानगीशिवाय कॅम्पस भेटीवर बंदी मनाई
DU Notice Rahul Gandhi : दिल्ली विद्यापीठ (DU) राहुल गांधींना (Rahul Gandhi) नोटीस बजावणार आहे. न कळवता विद्यापीठाच्या कॅम्पसला भेट दिल्याबद्दल ही नोटीस बजावण्यात येणार आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. याबाबत विद्यापीठाचे कुलसचिव विकास गुप्ता म्हणाले की, "अशा भेटीमुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात येते आणि अशा कोणत्याही संवादासाठी योग्य प्रोटोकॉलचे पालन करणे आवश्यक आहे, असं विद्यापीठकडून राहुल गांधी यांना नोटीसच्या माध्यमातून सांगण्यात येईल." वाचा सविस्तर
4. इस्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; भारताचा महासत्ता म्हणून उल्लेख, 'या' मुद्द्यांवर विस्तृत चर्चा
India-Israel Bilateral Relations: भारताचा (India) मित्र देश इस्रायलचे (Israel) परराष्ट्र मंत्री एली कोहेन भारत दौऱ्यावर आहेत. त्यांनी मंगळवारी (09 मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी ट्वीट करून भारताला जागतिक महासत्ता असं संबोधलं आहे. वाचा सविस्तर
5. IT मंत्री अश्विनी वैष्णव अन् Google CEO सुंदर पिचाई यांची भेट; डिजिटल ट्रांसफॉरमेशनवर चर्चा
India Digital Transformation: माहिती तंत्रज्ञान आणि दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव (IT Minister Ashwini Vaishnaw) यांनी गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांची अमेरिकास्थित मुख्यालयात भेट घेतली. दोघांनी 'मेक इन इंडिया' (Make in India) कार्यक्रमावर चर्चा केली. वाचा सविस्तर
6. Startups in India: भारतीय स्टार्टअप्सकडे गुंतवणुकदारांची पाठ; 9 वर्षांतील सर्वात कमी फंडिंग एप्रिलमध्ये
Indian Startup Funding: भारतीय स्टार्टअप्ससाठी (Indian Startups) मिळणाऱ्या फंडिंगमध्ये (Funding) मोठी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. एप्रिलमध्ये फंडिंग आणि डील्सची संख्या नऊ वर्षांतील सर्वात निच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. त्यामुळे भारतातील स्टार्टअप कंपन्यांपुढे मोठं आव्हान उभं राहिलं आहे. भारतीय स्टार्टअप्समधील एंजल गुंतवणूक आणि वेंचर कॅपिटल फंडिंग एप्रिलमध्ये 58 डील्समध्ये 381 मिलियन डॉलर इतकं होतं. वाचा सविस्तर
7. US: राष्ट्राध्यक्ष निवडणुकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का; लैंगिक शोषण प्रकरणी न्यायालयानं ठरवलं दोषी, ठोठावला 50 लाख डॉलर्सचा दंड
Donald Trump News: देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील न्यायालयाकडून जबरदस्त झटका बसला आहे. लैंगिक शोषण प्रकरणी न्यायालयानं ट्रम्प यांना दोषी ठरवलं आहे. लैंगिक छळ आणि बदनामी केल्याबद्दल त्याला 5 लाख डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला आहे. वाचा सविस्तर
8. 10th May In History: पानिपतचे पहिले युद्ध जिंकून बाबर आग्र्यामध्ये आला, 1857 च्या उठावाला मेरठमधून सुरुवात; आज इतिहासात
On This Day In History: आजचा दिवस भारताच्या आणि जगाच्या इतिहासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्याच दिवशी म्हणजे 10 मे 1526 रोजी पानिपतची लढाई जिंकल्यानंतर बाबरने देशाची तत्कालीन राजधानी आग्रा येथे पाऊल ठेवले आणि मुघल राजवट स्थापन करून आपल्या देशाचा इतिहास आणि भूगोल बदलून टाकला. जगात दररोज काही ना काही विक्रम केले जातात आणि मोडले जातात, परंतु प्रथम यश मिळवणाऱ्याचे नाव नेहमीच लक्षात राहते. हरियाणाच्या संतोष यादवने 10 मे 1993 रोजी सलग दुसऱ्यांदा जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट सर केले आणि असे करणारी ती जगातील पहिली महिला गिर्यारोहक ठरली. वाचा सविस्तर
9. Horoscope Today : मेष, कर्क आणि तुळ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस खास, जाणून घ्या आजचं राशीभविष्य
Horoscope Today 10 May 2023: आज बुधुवार दिनांक 10 मे 2023. आजचा दिवस काही राशींच्या लोकांसाठी खास असणार आहे. आजचा दिवस मेष, कर्क आणि तुळ राशींच्या लोकांसाठी विशेष असणार आहे. आज तुमच्या राशीबाबत नेमकं काय भाकित केलं आहे? याबाबतची माहिती आपण पाहणार आहोत. जाणून घेऊयात सविस्तर आजचं राशीभविष्य (Rashibhavishya). वाचा सविस्तर