एक्स्प्लोर

Karnataka Election 2023 : कर्नाटक विधानसभेसाठी आज मतदान, 5 कोटी 31 लाख मतदार बजावणार हक्क

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी (Karnataka Election 2023) आज मतदान होणार आहे.

Karnataka Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी (Karnataka Election 2023) आज मतदान होणार आहे. मतदार कर्नाटकमध्ये सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती देणार हे आज ठरवणार आहेत. आज (10 मे) सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी कर्नाटकातील 5 कोटी 31 लाख मतदार मतदान करणार असून हे मतदान राज्यातील 2,615 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. 

निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज 

कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानासाठी प्रशासन सज्ज झालं असून राज्यभरातील एकूण 58,545 मतदान केंद्रांवर मतदान करण्याची सुविधा प्राप्त करुन देण्यात येत आहे. मतदानादरम्यान एकूण 75,603 बॅलेट युनिट (BU), 70,300 कंट्रोल युनिट (CU) आणि 76,202 व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल (VVPAT) वापरण्यात येणार आहेत.

राज्यभरातील एकूण 5,31,33,054 मतदार मतदानाचा हक्क बजावू शकणार आहेत. या मतदारांमध्ये 2,67,28,053 पुरुष मतदार तर 2,64,00,074 महिला मतदार आहेत. तसेच 4,927  इतक्या संख्येने इतर मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

राज्यात 11,71,558 तरुण मतदार आहेत, तर 5,71,281 शारीरिकदृष्ट्या अपंग आहेत आणि 12,15,920 मतदार हे 80 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत.

2,615 उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद होणार 

विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 2,615 उमेदवार उभे आहेत. त्यामध्ये 2,430 पुरुष तर 184 महिला उमेदवार आणि एक तृतीयपंथीय उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांचे भवितव्य बुधवारी मतदान पेटीत बंद होणार आहे. 

कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी सुमारे महिनाभर प्रचार केल्यानंतर आता राज्यातील जनता सत्तेच्या चाव्या कुणाकडे देणार हे उद्या ठरणार आहे. भाजप सत्ता कायम ठेवणार की काँग्रेस सत्तेत येणार हे अवघ्या काही तासांमध्ये ठरणार आहे. 

सलग दोन वेळा कोणताही पक्ष सत्तेत नाही

कर्नाटक या राज्याचे वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत इथल्या जनतेने सलग दोन वेळा कोणत्याही राजकीय पक्षाकडे सत्ता सोपवली नाही. दर पाच वर्षांनी राज्यात सत्ताबदल होतोय. हा समज मोडून काढण्यासाठी भाजपने कंबर कसली असून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात प्रचारात आघाडी घेतल्याचं दिसून आलं. तर दुसरीकडे काँग्रेसच्या सिद्धरमय्या आणि डीके शिवकुमार या नेत्यांनी तोडीस तोड काम करत प्रचाराचा धडाका लावला. त्यामुळे आता जनता कुणाच्या पाठिशी राहते आणि कुणाला बाजूला सारते हे 13 मे रोजीच्या निकालावेळी समजेल. 

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांसोबतच चार राज्यांमधील काही जागांवर पोटनिवडणुकीसाठी (By Election) आज मतदान होणार आहे. ज्या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे त्यामध्ये उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh)  तांडा आणि छानबे मतदारसंघातील  ओडिशातील (Odisha) झारसुगुडा मतदारसंघ, पंजाबमधील (Punjab) जालंधर लोकसभा आणि मेघालयमधील (Meghalaya) सोहिओंग या विधानसभा मतदार संघात निवडणूक होणार आहे.  या मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदान 10 मे रोजी होणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Karnataka Election 2023: कर्नाटकासोबतच 'या' राज्यांमध्ये उद्या होणार मतदान; कशी आहेत 'या' राज्यातील समीकरण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
और एक फायनल...एक कप की और
और एक फायनल...एक कप की और
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
और एक फायनल...एक कप की और
और एक फायनल...एक कप की और
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
Embed widget