Weather Updates : सावधान! देशात उन्हाचा चटका वाढणार, पारा 42 अंशावर जाण्याची शक्यता; वाचा हवामान विभागाचा अंदाज
सध्या देशात अनेक भागात अवकाळी पाऊस पडत आहे. अशातच येत्या काही दिवसात देशातील तापमानात वाढ होणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे.
Weather Updates : देशातील वातावरणात सातत्यानं बदल (Climete change) होत आहे. कधी उन्हाचा चटका तर कधी अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) पडत आहे. या बदलत्या वातावरणाचा शेती पिकांसह (Agriculture Crop) मानवी आरोग्यावरही परिणाम होत आहे. सध्या देशात अनेक भागात अवकाळी पाऊस पडत आहे. अशातच येत्या काही दिवसात देशातील तापमानात वाढ होणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. देशातील अनेक भागात कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसची वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय काही भागात तापमानाचा पारा 42 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे.
राष्ट्रीय राजधानीसह देशाच्या बहुतांश भागात अवकाळी पावसामुळं वातावरण आल्हाददायक होते. पावसामुळं गेल्या काही दिवसांपासून बहुतांश भागातील कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा कमी नोंदवले जात होते. मात्र, सुरुवातीच्या काही दिवस दिलासा मिळाल्यानंतर पुन्हा एकदा कडाक्याचे ऊन पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसची वाढ होण्याचा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे.
13 मे रोजी पाऊस पडण्याची शक्यता
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार या संपूर्ण आठवड्यात देशातील बहुतांश राज्यांमध्ये हवामान स्वच्छ राहील. तसेच 13 मे रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, त्यामुळं तापमानात घट होणार नसल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. आज (10 मे) राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 21 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. तसेच हवामान स्वच्छ राहील. राजस्थानमध्येही येत्या काही दिवसांत कोरडे हवामान राहणार आहे. तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअस वाढ होण्याची दाट शक्यता आहे. आज राज्याच्या काही भागात कमाल तापमान 42 ते 44 अंशांपर्यंत नोंदवले जाऊ शकते.
महाराष्ट्रातही तापमानाचा पारा वाढणार
विदर्भातील अनेक जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढत आहे. नागपूरसह विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात 5 ते 7अंशांची वाढ होऊन पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. नागपूरसह (Nagpur News) शहराच्या तापमानात देखील वाढ होत आहे. या तापमानामुळे उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संपूर्ण एप्रिल महिना आणि मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसाने जोरदार उपस्थिती लावत उन्हाळ्यावर मात केली होती. आता मात्र खऱ्या विदर्भाच्या उन्हाळ्याला सुरुवात होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Heat Wave: मे महिन्यात नागपूरसह विदर्भ तापणार; पुढील चार ते पाच दिवसात तापमान 43 अंशावर जाणार, हवामान विभागाचा अंदाज