एक्स्प्लोर

Horoscope Today : मेष, कर्क आणि तुळ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस खास, जाणून घ्या आजचं राशीभविष्य

आज बुधुवार दिनांक 10 मे 2023. आजचा दिवस काही राशींच्या लोकांसाठी खास असणार आहे.

Horoscope Today 10 May 2023: आज बुधुवार दिनांक 10 मे 2023. आजचा दिवस काही राशींच्या लोकांसाठी खास असणार आहे. आजचा दिवस मेष, कर्क आणि तुळ राशींच्या लोकांसाठी विशेष असणार आहे. आज तुमच्या राशीबाबत नेमकं काय भाकित केलं आहे? याबाबतची माहिती आपण पाहणार आहोत. जाणून घेऊयात सविस्तर आजचं राशीभविष्य (Rashibhavishya).


मेष

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. नोकरदारांना दिलेली कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील. तुमच्या कामाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक होईल. बेरोजगार लोकांना मित्राच्या मदतीनं चांगला रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. 

वृषभ 

वृषभ राशींच्या लोकांना आज महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. ज्यामुळं तुम्हाला तणाव आणि अस्वस्थतेचा सामना करावा लागू शकतो. आज तुम्ही अनावश्यकपणे पैसे खर्च करण्यापासून स्वत:ला थांबवावे, अन्यथा गरजेच्या वेळी तुमच्याकडे पैशांची कमतरता भासू शकते. त्यामुळं खर्चावर नियंत्रण ठेवावे. 

मिथुन
 
मिथुन राशीचे जे लोक व्यवसाय करत आहेत त्यांना आज अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मित्रांच्या मदतीनं तुम्ही व्यवसायातील अडचणी दूर करु शकाल. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा आज सन्मान होईल. 

कर्क 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. नोकरीत प्रगतीच्या संधी मिळतील. तुम्ही केलेल्या कामाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक होईल. वडिलोपार्जित व्यवसायात तुम्ही काही बदल कराल. आज तुम्ही काही महत्त्वाच्या योजना राबवाल, त्यातून तुम्हाला चांगला आर्थिक नफा मिळेल.

सिंह 

सिंह राशीच्या लोकांना व्यवसायात येणाऱ्या काही समस्या तुमच्या मित्रांकडून सोडवल्या जातील. कुटुंबातील काही जबाबदाऱ्या वरिष्ठांकडून तुमच्यावर सोपवण्यात येतील. ज्या तुम्ही निश्चितपणे पार पाडाल. तुम्ही आज कुटुंबाच्या कल्याणासाठी काम कराल. 

कन्या 

कन्या राशींच्या लोकांना शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. मित्रांच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाचे काही नवीन स्रोत मिळतील. कुटुंबीयांसह तुम्ही एखाद्या नातेवाईकाच्या घरी मेजवानीसाठी जाल. आज तुमचे आरोग्य चांगले राहील. 

तुळ 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. व्यवसायाला पुढे नेण्यासाठी तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांमध्ये तुम्हाला यश मिळेल. मित्रांच्या मदतीने तुम्हाला नवीन संपर्क मिळतील. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर तेही तुम्ही वेळेवर परत कराल. तुमच्या खास व्यक्तीच्या मदतीने रखडलेले पैसे मिळतील.

वृश्चिक

वृश्चिक राशीचे जे लोक समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढेल. त्यांना कुटुंबाचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत कुठेतरी जाण्याची योजना कराल. सर्वजण खूप आनंदी दिसतील. बहिणीच्या लग्नाच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होईल. घरोघरी मांगलिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. 


धनु

धनु राशीच्या नोकरदार लोकांना दिलेली कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या सर्व लोकांशी विचारपूर्वक बोलावे लागेल. काही लोक तुमच्या शब्दांचा चुकीचा अर्थ लावू शकतात, ज्यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. व्यवसायात तुम्ही नवीन योजना सुरू करू शकाल, ज्यामुळे तुम्ही तुमचा व्यवसाय पुढे जाईल.

मकर 

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी जाईल. तुम्हाला आज प्रत्येक कामात कुटुंबाचे सहकार्य मिळेल. काही नवीन वस्तूंची खरेदी करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. कारण त्या वस्तूंची किंमत भविष्यात वाढू शकते. 

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांना कौटुंबिक सहकार्य मिळेल. कुटुंबियांसोबत वेळ घालवाल. बाहेर फिरायला जाण्याचा योग आहे. वडील तुमच्या व्यवसायात पैसे खर्च करतील. तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसह काही धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. ज्यामुळं तुमच्या मनाला शांती मिळेल.

मीन 

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असेल. तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत काही बदल कराल, ज्यामुळे तुम्हाला खूप उत्साही वाटेल. आज तुम्ही खेळांमध्ये भाग घेऊ शकता, ज्यामुळं तुम्ही फिट राहाल. मुलांच्या शिक्षणावर खूप पैसे खर्च करावे लागतील.

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 14 ऑगस्टचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! देवी लक्ष्मीच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी 'ही' गोष्ट आवर्जून करा
14 ऑगस्टचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! देवी लक्ष्मीच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी 'ही' गोष्ट आवर्जून करा
Shravan 2026 : श्रावणात उपवास का करतात? श्रावणी सोमवारचं महत्त्व नेमकं काय? वाचा A to Z माहिती...
श्रावणात उपवास का करतात? श्रावणी सोमवारचं महत्त्व नेमकं काय? वाचा A to Z माहिती...
Chandra Grahan 2026: सूर्यग्रहणानंतर आता रक्षाबंधनच्या दिवशी 'चंद्रग्रहणाचं' सावट? कधी सुरू होणार ग्रहण? सूतक काळ लागू असेल? धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
सूर्यग्रहणानंतर आता रक्षाबंधनच्या दिवशी 'चंद्रग्रहणाचं' सावट? कधी सुरू होणार ग्रहण? सूतक काळ लागू असेल? धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Shravan 2026: यंदा पहिला श्रावणी सोमवार - नागपंचमी एकत्रच! आधी शिवपूजा की नागपंचमी पूजा? उपवास कधी सोडावा? पूजेचा शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व..
यंदा पहिला श्रावणी सोमवार - नागपंचमी एकत्रच! आधी शिवपूजा की नागपंचमी पूजा? उपवास कधी सोडावा? पूजेचा शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व..

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Embed widget