एक्स्प्लोर

Morning Headlines 5th May: मॉर्निंग न्यूजमध्ये वाचा देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या

देश विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील

देश विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... 

1. उत्तराखंड जोशीमठजवळ दरड कोसळली, बद्रीनाथ महामार्ग पूर्णपणे ठप्प; बद्रीनाथमधले हजारो पर्यटक अडकले

Char Dham Yatra: उत्तराखंडमधील (Uttarakhand) जोशीमठजवळ (Joshimath) काल (गुरुवार) दरड कोसळली आहे. यामुळे बद्रीनाथ महामार्ग (Badrinath Highway) पूर्णपणे ठप्प झाला आहे. दोन्ही बाजूचे हजारो पर्यटक अडकले आहेत. जोशीमठजवळील हेलंग खोऱ्यात एनटीपीसीच्या जलविद्युत प्रकल्पाचं काम सुरू आहे. त्यासाठी जमिनीखाली सुरूंग लावले जात आहेत. काल अशाच एका सुरुंगामुळे दरड कोसळली असावी, असा अंदाज स्थानिक रहिवासी व्यक्त करत आहेत. वाचा सविस्तर 

2. Manipur violence: मणिपूरमध्ये हिंसाचारानंतर संचारबंदी, दिसताक्षणीच गोळ्या घालण्याचे आदेश! पाच दिवसांसाठी मोबाईल इंटरनेट सेवा बंद

Manipur violence:  मणिपूरमध्ये ऑल ट्रायबल स्टुडंट्स युनियनकडून (All Tribal Students Union of Manipur) काढलेल्या 'आदिवासी एकता मार्चला' हिंसक वळण लागले आहे. त्यानंतर मणिपूरमधील (Manipur) परिस्थिती बिघडत आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कर आणि आसाम रायफल्सचे जवान तैनात करण्यात आले आहेत.  दरम्यान, परिस्थिती बिघडत चालल्यामुळं राज्य सरकारनं गुरुवारी शूट एंड साइट चे (shoot at sight) आदेश जारी केले आहेत. वाचा सविस्तर 

3. Youtuber Agastya Chauhan Death: उत्तराखंडचा YouTuber अगस्त्य चौहानचा अपघाती मृत्यू; 300 किमी प्रतितास वेगानं चालवत होता बाईक

PRO RIDER 1000 Youtuber Agastya Chauhan Accident Death: अलिगडमधील टप्पल पोलीस स्टेशन परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर बुधवारी हृदयद्रावक अपघात झाला. यमुना एक्स्प्रेस वेवर झालेल्या या अपघातात उत्तराखंडचा यूट्यूबर अगस्त्य चौहान याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अगस्त्य चौहान (25) हा त्याच्या स्पोर्ट्स बाईकवरून आग्र्याहून दिल्लीला येत होता. दरम्यान, यमुना द्रुतगती मार्गावर 47 मैलांवर त्याचं दुचाकीवरील नियंत्रण सुटलं आणि तो दुभाजकावर आदळला. या भीषण अपघातात त्याचा मृत्यू झाला. वाचा सविस्तर 

4. CA,CS ची चिंता वाढली, अर्थ मंत्रालयाची नवी अधिसूचना; 'हे' रेकॉर्ड ठेवणं अनिवार्य, अन्यथा कारवाई अटळ

CA CS and ICWA In PMLA Act: आता CA, CS, ICWA यांनी त्यांच्या क्लायंटसाठी आर्थिक व्यवहार केले तर ते मनी लॉन्ड्रिग प्रतिबंध कायद्याच्या कक्षेत येणार आहेत. 3 मे रोजी अर्थ मंत्रालयाच्या अधिसूचनेत, मनी लाँडरिंग विरोधी कायद्याची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या PMLA अधिसूचनेनुसार, CA, CS, ICWA जर त्यांनी एखाद्या क्लायंटसाठी निवडक आर्थिक व्यवहार केले तर ते मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (PMLA) कक्षेत येतील. महत्त्वाचं म्हणजे, कंपन्या, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप किंवा ट्रस्ट सुरू करणं, चालवल्यावर या प्रोफेशनल्स  PMLA च्या कक्षेत येतील. वाचा सविस्तर 

5. Cognizant Layoff : आयटी कंपन्या मंदीच्या वाटेवर, कॉग्निझंट 3,500 कर्मचाऱ्यांना काढणार

Cognizant : दिग्गज आयटी कंपनी कॉग्निझंटने (Cognizant) 3,500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय खर्च कमी करण्यासाठी कंपनी आपली काही कार्यालयेही बंद करणार आहे. तसेच कंपनीमध्ये कॉस्ट कटिंगची प्रक्रिया सुरू झाली असून जवळपास 80 हजार कर्मचारी काम करु शकतील अशी एक कोटी 10 लाख स्क्वेअर फूट जागा कमी वापरात आणण्याचा निर्णय कंपनीने घेतल्याची माहिती आहे. वाचा सविस्तर 

7. 5th May In History: भांडवलशाहीला धडकी भरवणाऱ्या कार्ल मार्क्सचा जन्म; आज इतिहासात

5th May In History:  प्रत्येक दिवसाचे एक महत्त्व असते. त्या-त्या दिवशी घडलेल्या घटनांचा परिणाम इतिहासातील कालखंडावर नव्हे तर पुढील काळावरही होत असतो. आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. शोषण मुक्त समाजाचा कृतीशील विचार मांडणाऱ्या कार्ल मार्क्सचा आज जन्म दिवस आहे. तर, मराठीतील निसर्गकवी, बालकवी अशी ओळख असणारे त्र्यंबक बापूजी ठोमरे अवघ्या 28 व्या वर्षी जगाचा निरोप आजच्या दिवशी घेतला. वाचा सविस्तर 

8. Horoscope Today 5 May 2023 : मेष, मकरसह 'या' राशींवर पडणार चंद्रग्रहणाचा प्रभाव; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 5 May 2023 : आज शुक्रवार हा महत्त्वाचा दिवस आहे. मेष राशीचे लोक त्यांच्या गोड बोलण्यामुळे त्यांची सर्व कामे पूर्ण करू शकतील. तर, वृश्चिक राशीला नवीन वाहनाचा आनंद मिळेल. मेष ते मीन राशीसाठी कसा असेल आजचा दिवस? काय सांगतात तुमच्या नशिबाचे तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Malad Bridge Inauguration : उद्घाटनाचा मुद्दा; काँग्रेस भाजपात राडाSambhajiraje Chhatrapati : दिसेना स्मारक,राजे आक्रमक; छत्रपती संभाजीराजांचे सरकारला सवालDevendra Fadnavis Sambhajiraje Chhatrapati :स्मारकासाठी कोर्टातून स्थगिती मिळवणाऱ्या वकिलांना शोधावंABP Majha Headlines :  5 PM : 6 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Amol Kolhe on Ajit Pawar : गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
Mumbai fire: रॉकेलचा कॅन अन् पेटत्या दिव्यामुळे गुप्ता कुटुंबीयांचा घात झाला, आग झटक्यात पसरली अन् 7 जण मृत्युमुखी
पेटत्या दिव्यामुळे गुप्ता कुटुंबीयांचा घात झाला, आग झटक्यात घरभर पसरली अन् 7 जण मृत्युमुखी
Embed widget