एक्स्प्लोर

Horoscope Today 5 May 2023 : मेष, मकरसह 'या' राशींवर पडणार चंद्रग्रहणाचा प्रभाव; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 5 May 2023 : आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल? राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 5 May 2023 : आज शुक्रवार हा महत्त्वाचा दिवस आहे. मेष राशीचे लोक त्यांच्या गोड बोलण्यामुळे त्यांची सर्व कामे पूर्ण करू शकतील. तर, वृश्चिक राशीला नवीन वाहनाचा आनंद मिळेल. मेष ते मीन राशीसाठी कसा असेल आजचा दिवस? काय सांगतात तुमच्या नशिबाचे तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आणि फलदायी आहे. आज नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल. जे बेरोजगार आहेत, त्यांना चांगला रोजगार मिळण्याची चिन्हे आहेत. तुम्हाला मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. व्यवसाय करणारे लोक आपला व्यवसाय वाढवण्यात व्यस्त राहतील. कामाचा ताण जास्त असेल, त्यामुळे थकवा जाणवेल. यासाठी थोडा वेळ स्वत:साठी काढून विश्रांती घ्या. तुम्हाला बरं वाटेल. बदलत्या हवामानामुळे आरोग्यात चढ-उतार दिसून येतील. तुमची व्यावसायिक स्थिती मध्यम राहील. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी काही वस्तू खरेदी करा. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर प्रेमळ क्षण घालवा. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळेल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल.

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरदार लोकांना नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. मित्रांच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाचे साधन मिळेल, ज्यातून तुम्ही नफा कमवू शकाल. तुमचे प्रेम जीवन चांगले होईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात भरपूर नफा मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. तब्येतीत चढ-उतार होऊ शकतात. प्रवासाला जाण्याचीही शक्यता आहे, जिथे तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. आज तुम्हाला तुमचा जुना मित्र भेटेल. त्याला भेटून तुमच्या जुन्या आठवणी ताज्या होतील. घरातून बाहेर पडताना ज्येष्ठांच्या चरणस्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घ्या, मग तुमची सर्व कामे पूर्ण होतील. 

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्या इतर दिवसांपेक्षा चांगला आहे. नोकरदार लोकांना नोकरीतील बदलाशी संबंधित कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्यावा लागेल. आज तुम्ही कुटुंबातील सदस्यांबरोबर थोडा वेळ घालवा. कुटुंबात परस्पर मतभेद होऊ शकतात, तुम्हाला तुमच्या बोलण्यात गोडवा ठेवावा लागेल. रागावर नियंत्रण ठेवा. शैक्षणिक कार्याचे चांगले परिणाम मिळतील.मित्राच्या मदतीने भावाच्या लग्नाच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होईल. घरात नवीन पाहुण्यांचे आगमन होईल, त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढेल. तुमचे आरोग्य चांगले राहील. सर्जनशील आणि कलात्मक क्षेत्रात वाढ होईल. तुम्ही तुमच्या पालकांबरोबर तुमचे सुख-दु:ख शेअर करू शकता. यामुळे तुमचं मन मोकळं होईल.  

कर्क 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. उद्या व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी प्रगतीचा दिवस आहे. एखादे रखडलेले काम पूर्ण होईल. कार्यक्षेत्रात वाढ होईल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. वरिष्ठांकडून शुभवार्ता ऐकायला मिळतील. वरिष्ठांशी बोलताना बोलण्यात गोडवा ठेवा. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढेल. तुम्ही केलेल्या कामामुळे सर्वजण खूप खूश होतील. तुमचे मित्र तुम्हाला भेटायला तुमच्या घरी येतील. एखाद्या मित्रांबरोबर कुठेतरी बाहेर जाण्याचा बेत करा. आज वडिलांकडून काही काम तुमच्यावर सोपवले जाईल, जे तुम्ही पूर्ण केले पाहिजे. मित्रांच्या मदतीने बेरोजगारांना चांगला रोजगार मिळू शकेल. अविवाहित लोकांना लवकरच शुभवार्ता ऐकायला मिळेल.  

सिंह 

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. आज तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. तुमची रखडलेली कामेही पूर्ण होतील. तुमचे काही कायदेशीर काम चालू असेल तर ते संपेल. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तींबरोबर आजचा दिवस तुमचा फार आनंदी जाईल. नवीन गोष्टी शिकायला मिळतील. सासरच्या मंडळींकडूनही काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. जे विदेशातून आयात-निर्यातीचे काम करतात, त्यांना चांगली संधी मिळेल. व्यवसाय करणारे लोक व्यवसायातील रखडलेल्या योजना पुन्हा सुरू करू शकतील. कष्टकरी लोकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात दिलेली कामे वेळेत पूर्ण करावी लागतील. नोकरीत नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती होईल. तुमचे प्रेम जीवन पूर्वीपेक्षा चांगले होईल. 

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. नोकरदार लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल. आज तुम्हाला आर्थिक लाभ संभवतो. आरोग्याची काळजी घ्या. बदलत्या हवामानामुळे तब्येतीत चढ-उतार दिसून येतील. आज तुमच्यावर काही कौटुंबिक जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात, ज्या तुम्ही नक्कीच पूर्ण कराल. उत्पन्नात घट आणि खर्चाचे प्रमाण वाढेल. मित्रांच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाच्या संधी देखील मिळतील, ज्यातून तुम्ही नफा कमवू शकाल. तुमच्या पैशाची आवक वाढेल. तुमच्या व्यवसायाची स्थिती ठीक राहील. प्रवासाला जाण्याची शक्यता आहे, पण हा प्रवास तुमच्यासाठी संमिश्र असेल. आज कामाच्या ठिकाणी कोणाच्याही प्रभावाखाली आल्यावर कोणाला वाईट शब्द बोलू नका. राजकारणात यश मिळेल. नेत्यांना भेटण्याचीही संधी मिळेल. ज्येष्ठ सदस्यांच्या चरणस्पर्श करून आशीर्वाद घ्या. जीवनसाथीचा पूर्ण पाठिंबा मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. 

तूळ 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात भरपूर नफा मिळेल. नवीन संपर्क देखील वाढतील. वरिष्ठांचा आशीर्वाद तुमच्यावर राहील. तुमचे आरोग्य चांगले राहील. शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरीबद्दल तुम्ही समाधानी असाल. पण आज तुमच्यात आत्मविश्वासाची कमतरता राहील. नकारात्मकतेचा परिणाम होऊ शकतो. जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण करा. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर तेही तुम्ही परत करा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. जोडीदाराबरोबर कुठेतरी बाहेर जाण्याचा बेत आखा. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. कोणतेही नवीन काम करण्यासाठी कर्ज घ्यायचे असेल तर ते तुम्हाला सहज मिळेल. नवीन वाहनाचा आनंदही मिळेल. राजकारणात यश मिळेल. भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल. सासरच्या मंडळींकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचारही करू शकता. उत्पन्नाचे नवीन मार्ग प्राप्त होतील.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. वैवाहिक जीवनावर विश्वास ठेवा. दुसऱ्याच्या बोलण्यावर सहज विश्वास ठेवू नका. आज तुम्हाला कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वाहन खरेदीचे संकेत आहेत. तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले पैसे तुम्हाला मिळतील. तुम्हाला आजचे काम आजच करावे लागेल ते उद्यावर ढकलू नका. नोकरीत प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. तुमची कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील. तुमच्या आरोग्याबाबत गंभीर व्हा. जे लोक घरबसल्या ऑनलाईन काम करतात, त्यांना खूप फायदा होईल. वडिलोपार्जित व्यवसाय करणारे मूळ लोक व्यवसायातील बदलासाठी त्यांच्या वरिष्ठांशी बोलतील. वडील तुमच्या व्यवसायात काही पैसे खर्च करतील. आईचा सहवास मिळेल. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. भावाच्या लग्नावर प्रस्तावावर शिक्कामोर्तब होईल. घरात शुभ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

धनु 

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. आज शिक्षणात संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. तुमचा वेळ वाया घालवणाऱ्या तुमच्या मित्रांपासून दूर राहा. व्यवसायासाठी परदेश दौऱ्यावर जाण्याचा योग लवकरच येऊ शकतो. व्यवसायात बदलाबाबत चांगली बातमी मिळेल. सहलीला जाण्याचीही शक्यता आहे. हा प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. प्रवासा दरम्यान, नवीन लोकांशी संपर्क होईल, ज्यामुळे तुम्ही तुमचा व्यवसाय पुढे नेण्यास सक्षम असाल. प्रेमात मतभेद टाळा. अहंकारात बोलू नका. मुलाच्या आरोग्याकडे लक्ष द्या. तुमचा व्यवसाय चांगला होईल. आई-वडिलांचे सहकार्य मिळेल. राजकारणात यश मिळेल. तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. 

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. आज तुम्ही कुटुंबातील सदस्यांबरोबर वेळ घालवा आणि काही महत्त्वाचे काम पूर्ण करा. आज तुमच्या स्वभावात चिडचिड दिसून येईल. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र काही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होतील, जिथे तुम्ही काही पैसे खर्च कराल. वास्तूचा आनंद वाढेल. तुमच्या जीवनात नकारात्मक उर्जेचा संचार होईल. प्रेम जीवन जगणारे लोक त्यांच्या प्रियकराची त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी ओळख करून देऊ शकतात. व्यवसाय करणारे लोक व्यवसायातील रखडलेल्या योजना पुन्हा सुरू करतील. जे लोक भागीदारीत व्यवसाय करतात त्यांना भरपूर नफा मिळेल. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आज तुमचे विचार तुमच्या पालकांबरोबर शेअर करा. वरिष्ठांशी बोलताना बोलण्यात गोडवा ठेवा. दुसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. जर तुम्ही याआधी कोणतीही गुंतवणूक केली असेल, तर तुम्हाला त्याचा पूर्ण फायदाही मिळेल. आपल्या पाल्याला चांगली नोकरी मिळाल्यास पालक खूप आनंदी दिसतील. तुम्हाला तुमच्या मुलाचा अभिमान वाटेल. उच्च शिक्षणासाठी वेळ उत्तम आहे. 

कुंभ 

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. कष्टकरी लोकांना कार्यक्षेत्रात दिलेली कामे वेळेत पूर्ण करावी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आज तुमचे शत्रू तुमचे नुकसान करण्याचा वारंवार प्रयत्न करतील, परंतु तुम्ही हुशारीने त्यांचा पराभव करू शकाल. आज तुम्हाला पैशाचे महत्त्व कळेल. नोकरीशी संबंधित कोणताही निर्णय घेण्यास विलंब होऊ शकतो. वैवाहिक जीवन सुखकर राहील. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळेल, त्यामुळे ते खूप आनंदी दिसतील. कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही काही वस्तू खरेदी कराल. घराच्या दुरुस्तीसाठी खूप पैसा खर्च होतील. ज्येष्ठ सदस्यांच्या तब्येतीत चढ-उतार जाणवतील. 

मीन

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. विद्यार्थ्यांच्या करिअरमध्ये यश मिळण्याची चिन्हे आहेत. कौटुंबिक जीवन आनंदात जाईल. नोकरदार लोकांना कार्यालयीन कामामुळे प्रवासाला जावे लागेल, त्यांच्यासाठी प्रवास सुखकर होईल. घरोघरी शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. कुटुंबातील सर्व सदस्य मिळून काही महत्त्वाच्या निर्णयावर चर्चा करतील, जिथे तुम्हाला तुमच्या बोलण्यात गोडवा ठेवावा लागेल. भाऊ-बहिणीतील कलह संपुष्टात येईल. सत्ताधारी प्रशासनाकडून मदत केली जाईल. तुमच्या आरोग्यावर परिणाम होईल, पण व्यवसाय ठीक राहील. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण अधिक राहील. वरिष्ठांशी बोलताना वाणीतील गोडवा राखलात तर बरे होईल. आज तुम्ही कोणाच्याही सल्ल्यानुसार कोणतीही गुंतवणूक करू नका, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 4 May 2023 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशीसाठी आजचा दिवस खूप चांगला; जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacker Update : सैफवरील हल्लेखोर वरळीच्या सिल्कवर्क्स कॅफेमध्ये होता कामाला, इतर कर्मचाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यातSaif Ali Khan Attacker Update : सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचं वरळीतील कोळीवाड्यात वास्तव्य, आरोपीचे शेजारी काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 19 January 2024Anandache Paan ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाकेंशी समकाल आणि समांतर पुस्तकांच्या निमित्त खास संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Embed widget