एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

Pik Vima : प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी अर्ज करा, कृषी आयुक्त सुनिल चव्हाणांचे शेतकऱ्यांना आवाहन

शेतकऱ्यांनी 31 जुलै 2023 पर्यंत प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या लाभासाठी अर्ज करावेत, असे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केलं आहे.

Pradhan Mantri Pik Vima Scheme : चालू खरीप हंगामामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. इच्छूक शेतकऱ्यांनी 31 जुलै 2023 पर्यंत प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या लाभासाठी अर्ज करावेत, असे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केलं आहे. या योजनेमध्ये कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होता येणार असल्याचे चव्हाण म्हणाले.

खरीप हंगामातील 14 पिकांसाठी शेतकऱ्यांना सहभाग घेता येणार 

खरीप हंगामातील भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका, भुईमूग, कारळे, तीळ, सोयाबीन, कापूस आणि खरीप कांदा अशा एकूण 14 अधिसूचित पिकांसाठी, अधिसूचित महसूल, मंडळ, क्षेत्रात शेतकऱ्यांना सहभाग घेता येईल. सन 2023-24 पासून ‘सर्वसमावेशक पिक विमा योजना’ राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार शेतकरी हिस्स्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरुन पीक विमा पोर्टलवर नोंदणी करता येणार असल्याचे आयुक्त सुनिल चव्हाण म्हणाले.

शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा संरक्षण मिळण्यासाठी विहित मुदतीपूर्वी संबंधित बँक, http://pmfby.gov.in व आपले सरकार सेवा केंद्र यांच्यामार्फत विमा अर्ज करता येईल.  कर्जदार शेतकऱ्यांना कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेमार्फत योजनेत सहभागी होण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज देणे आवश्यक आहे. कर्जदार योजनेत सहभागी होण्यास इच्छूक नसल्यास तसे विहित मुदतीत बँकेला लेखी कळवणे आवश्यक असल्याचे आयुक्त म्हणाले.  

कोणत्या जिल्ह्यासाठी कोणती कंपनी

अहमदनगर, नाशिक, सोलापूर, जळगाव, सातारा जिल्ह्यासाठी ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लि., परभणी, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यासाठी आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि., जालना, गोंदिया व कोल्हापूर जिल्ह्यासाठी युनिव्हर्सल सोम्पो जनरल कंपनी लि., नांदेड, ठाणे, रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यासाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि., औरंगाबाद, भंडारा, पालघर व रायगड जिल्ह्यासाठी चोलामंडलम एम.एस. जनरल इं.कंपनी लि., वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदूरबार व बीड जिल्ह्यासाठी भारतीय कृषि विमा कंपनी, हिंगोली,अकोला, धुळे, पुणे व उस्मानाबाद जिल्ह्यासाठी एचडीएफसी जनरल इन्शुरन्स.कं.लि., यवतमाळ, अमरावती व गडचिरोली जिल्ह्यासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स आणि लातूर जिल्ह्यासाठी एस.बी.आय. जनरल इन्शुरन्स या कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. योजनेतील सहभागासंदर्भात शेतकऱ्यांना काही अडचण आल्यास तालुका संबंधित पीक विमा कंपनीचे कार्यालय तसेच तालुका कृषी अधिकारी, नजिकची बँक किंवा आपले सरकार सेवा केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहनही आयुक्तांनी केलं आहे. 

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे उद्देश

  • शेतकऱ्यांच्या पिकांचे अतिवृष्टी, गारपीट, चक्रीवादळ, दुष्काळ, अवकाळी पाऊस, कीटकांचा प्रादुर्भाव तसेच इतर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या पिकांच्या नुकसानीसाठी आर्थिक सहाय्य करणे हा प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास त्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध व्हावे या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  • आर्थिक सहाय्य करून शेतकऱ्यांची शेतीमध्ये रुची कायम ठेवण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री पीक विमा योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  • शेताचे नुकसान झाल्यावर शेतकरी आत्महत्या करतात त्यापासून बचाव करण्यासाठी या योजनेची सरुवात करण्यात आली आहे.
  • शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहित करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

NAMO Shetkari Yojana: पीएम किसानच्या धर्तीवर राज्यात नमो शेतकरी योजना, शेतकऱ्यांच्या खात्यावर सहा हजार रुपये, एका रुपयात पीक विमा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : जेव्हा मतदानाचा टक्का वाढतो तेव्हा भाजपला फायदा होतो:फडणवीस ABP MAJHAMaharashtra Politics Rada | नेत्यांचे 'राडे' राजकीय संस्कृतीचे 'धिंडवडे'Sharad Koli on Praniti Shinde : प्रणिती शिंदे तुला काय तुझ्याबापाला सुद्धा भीत नाही...Maharashtra Exit Poll | झीएआयच्या सर्वेनुसार मराठवाड्यात मविआला 24-29 जागा मिळण्याची शक्यताABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Maharashtra Exit Polls Result : राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
Embed widget