एक्स्प्लोर

Horoscope Today 05 July 2023 : मेष, तूळ, कुंभसह या राशीच्या लोकांना सावधानतेचा इशारा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

Horoscope Today 05 July 2023 : आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष ते मीन राशीसाठी दिवस कसा असेल? राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 05 July 2023 : आज बुधवार हा महत्त्वाचा दिवस आहे. रविवारी मेष आणि वृषभ राशीच्या लोकांच्या रखडलेल्या योजना पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. कर्क, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी खास असणार आहे. त्याच वेळी, काही राशीच्या लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. मेष ते मीन राशीसाठी बुधवार कसा राहील, काय सांगतात तुमचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. 

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज आपल्या व्यवसायात अधिक गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. आज तुम्हाला तुमच्या क्षमतेनुसार लाभ मिळू शकतात. आज मेष राशीचे लोक कौटुंबिक धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकतात. आज तुमची अधिक धावपळ होईल. सर्व कामात मित्रांची मदत मिळेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. आज आरोग्याच्या बाबतीत चढ-उतार राहतील. थोडा संघर्ष होऊ शकतो, परंतु या सर्व अडचणींमध्ये तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्तेतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. शिक्षकांचेही सहकार्य मिळेल. 

वृषभ 

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसाय करणारे लोक त्यांचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतील, ज्यामध्ये तुमचे मित्रही तुम्हाला मदत करतील. आज व्यवसायासाठी थोडा संघर्ष आहे. नवीन व्यावसायिक संबंध दृढ होतील. तुम्हाला स्वतःसाठी काही खास करायचं असेल तर उद्याचा काळ उत्तम आहे. नोकरदार लोक नोकरीत बढतीच्या दिशेने वाटचाल करतील. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल आणि पोस्टमध्ये वाढ होईल.

मिथुन 

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जे नोकरी करत आहेत, त्यांना नोकरीत बढतीची संधी मिळेल. अधिकारी सहकार्य करतील. आज तुम्हाला अनेक आमंत्रणं येतील. तसेच तुम्हाला एखादी अपघाती भेट देखील घडू शकते. जोडीदाराबरोबर एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या बोलण्यात गोडवा ठेवावा लागेल, अन्यथा नात्यात दुरावा येईल. ज्येष्ठ सदस्यांच्या चरणस्पर्श करून आशीर्वाद घ्या.

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसाय करणारे लोक व्यवसायाला पुढे नेण्यासाठी नवीन पद्धतींचा अवलंब करतील. खेळ खेळणे आणि मैदानी खेळांमुळे तुम्हाला ऊर्जा मिळेल. तुमच्या वडिलांच्या सल्ल्याने तुम्हाला कामाच्या ठिकाणी पैसे मिळू शकतात. कुटुंबातील कोणत्याही महिला सदस्याचे आरोग्य तुमच्या चिंतेचे कारण बनू शकते. आजचा दिवस तुमचा चांगला असेल पण काहीसा तणावाचा देखील असेल. व्यवसाय करणारे लोक व्यवसायाला पुढे नेण्यासाठी मित्रांची मदत घेतील. वडील तुमच्या व्यवसायात काही पैसे खर्च करतील. जे लोक समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढेल.

सिंह 

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जे काही दिर्घकालीन आजाराने त्रस्त होते, त्यांच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा दिसेल. व्यवसायासाठी आजचा दिवस चांगला राहील. आज तुम्ही नवीन लोकांच्या संपर्कात याल ज्याद्वारे तुम्हाला नफा मिळून तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. मित्रांच्या मदतीने आर्थिक अडचणी दूर होतील. दूर राहणारे काही नातेवाईक आज तुमच्याशी संपर्क साधू शकतात. तुमच्या कोणत्याही वाईट सवयीमुळे तुमच्या प्रियकराला वाईट वाटू शकते आणि तो तुमच्यावर रागावू शकतो. आपल्या प्रियजनांची काळजी घेणे ही चांगली गोष्ट आहे, परंतु त्यांची काळजी घेत असताना, आपल्या आरोग्याची देखील काळजी घ्या. नोकरदार लोक नोकरीत दिलेली कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. 

कन्या 

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. घरबांधणीशी संबंधित काही कामे थांबली होती, ती आज पूर्ण होतील. नोकरीत वरिष्ठांकडून लाभ मिळेल. तुम्हाला उत्पन्न वाढीची शुभ बातमी मिळेल, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. एखाद्या जुन्या प्रकरणाबद्दल तुमची चिंता वाढू शकते. तुम्हाला कामात अडचणींचा सामना करावा लागू शकतो, परंतु तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. सर्व कामे वेळेवर पूर्ण करा. आपल्या पाल्याला चांगली नोकरी मिळाल्यास पालक खूप आनंदी दिसतील. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. नोकरदार लोकांना नवीन नोकरीची ऑफर मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल, परंतु जुन्या कामावर चिकटून राहणे चांगले ठरेल. घरोघरी शुभ कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. तुमचे आरोग्य चांगले राहील. 

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. तुमचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी तुम्ही तुमच्या मित्रांची मदत घेऊ शकता. एखाद्या ओळखीच्या व्यक्तीद्वारे तुम्हाला नवीन संपर्क मिळतील, त्यातून नफा मिळण्याची शक्यता आहे. तुमचं व्यक्तिमत्व सुधारण्याचा प्रयत्न करा. आज अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्याशिवाय असे कोणतेही काम करू नका, ज्यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होईल. तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली होईल आणि त्यामुळे तुम्हाला उद्या दिवसभर उत्साही वाटेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. एखाद्या खास व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला तुमचे रखडलेले पैसे मिळतील. वडिलोपार्जित संपत्तीतूनही आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. तुमच्या मनाची कोणतीही इच्छा आज पूर्ण होऊ शकते. 

वृश्चिक 

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरीत दिलेली कामे वेळेवर पूर्ण करा. तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल. अधिका-यांकडून शुभवार्ता ऐकायला मिळतील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील सदस्यांसोबत थोडा वेळ घालवा. नको असलेले विचार मनातून काढून टाका. स्वतःच्या शरीराची काळजी घ्या. शारीरिक व्यायामाला महत्त्व द्या. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या घरगुती कामांच्या बाबतीत दिवस चांगला आहे. तुमच्या जोडीदारासोबतचा आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात रोमँटिक दिवसांपैकी एक असू शकतो. 

धनु

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरीत संघर्षानंतर यश मिळेल. आज तुमचे रखडलेले पैसे येण्याची चिन्हे आहेत. नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती अनुकूल असेल. तुमच्या कुटुंबामुळे तुमच्या वैवाहिक जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. वरिष्ठांशी बोलताना बोलण्यात गोडवा ठेवा. आज कुटुंबातील सदस्यांबरोबर वेळ घालवून पैसे कसे वाचवायचे ते शिकून घ्या. जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. शेजारी राहणाऱ्या वादात पडणे टाळा. मित्रांच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाच्या काही चांगल्या संधी मिळतील. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांना आणखी काम करण्याची संधी मिळेल. 

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. बदलत्या हवामानामुळे आरोग्यात चढ-उतार होत राहील. आरोग्याबाबत काळजी घ्या. चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. आपल्या आहाराकडे लक्ष द्या. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत राहिल. नोकरी करणाऱ्या लोकांना नोकरीत बढतीची संधी मिळेल. पदात वाढ होईल, त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुम्ही तुमच्या ज्ञानाने आणि बुद्धिमत्तेने इतरांना प्रभावित कराल. प्रत्येकाला तुमचा मित्र व्हायला आवडेल. तुमच्या गोड बोलण्यामुळे तुम्ही कामे पूर्ण करु शकाल.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजच्या दिवशी तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. आज तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. तुमच्यामध्ये भरपूर आत्मविश्वास आहे याचा योग्य वापर करा. आज दिवसभर तुम्ही उत्साही राहाल. आज तुमच्याकडे पैसे उधार घ्यायला कोणीतरी येऊ शकतं पण कर्ज देण्यापूर्वी त्या व्यक्तीची विश्वासार्हता तपासा नाहीतर तुमचे पैसे रखडले जाऊ शकतात.  तुमचं वैवाहिक जीवन चांगलं राहील. आज तुमचे कुटुंबीय तुमच्याबरोबर अनेक समस्या शेअर करतील. तुम्ही त्यावर विचारपूर्वक निर्णय घ्या. गरजूंना मदत करून तुम्हाला मानसिक शांतता मिळेल तसेच प्रसन्न वाटेल. व्यवसाय करणारे लोक व्यवसायातील रखडलेल्या योजना पुन्हा सुरू करू शकतात. तुम्ही स्वतःसाठी नवीन वाहन देखील खरेदी करणार असाल तर आजचा शुभ दिवस आहे. जर तुम्ही आधी कोणतीही गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला त्याचाही पूर्ण फायदा मिळू शकतो. 

मीन

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला आहे. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. पालकांचा सहवास आणि सहकार्य मिळेल. आपल्या पाल्याला चांगली नोकरी मिळाल्यास पालक खूप आनंदी दिसतील. मुलाचा अभिमान वाटेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांनाही उत्पन्नाच्या अनेक संधी मिळतील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. वडिलोपार्जित संपत्तीतून धनलाभ होऊ शकतो. नोकरीत प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळेल. मुलाचे आरोग्य पूर्वीपेक्षा सुधारेल. दूरच्या नातेवाईकाकडून चांगली बातमी मिळेल. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. जर तुम्ही एखाद्याला पैसे दिले असतील तर तेही तुम्हाला परत केले जातील, जेणेकरून तुम्ही तुमचे रखडलेले काम पूर्ण करू शकाल. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today : मेष, कर्क, वृषभ आणि कन्या राशीच्या लोकांना होणार आर्थिक फायदा, वाचा आजचं राशीभविष्य 

महत्त्वाच्या बातम्या

Mahakumbh Mahasamvad 2026: “कुंभमेळ्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न आतापासूनच”; महाकुंभ महासंवादात तुषार भोसलेंची प्रतिक्रिया, धर्म, संस्कृती ते प्रशासनापर्यंत विचारमंथन..
“कुंभमेळ्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न आतापासूनच”; महाकुंभ महासंवादात तुषार भोसलेंची प्रतिक्रिया, धर्म, संस्कृती ते प्रशासनापर्यंत विचारमंथन..
Kumbh Mela 2027: नाशिकमध्ये एबीपी माझाचा ‘महाकुंभ महासंवाद’; धर्म, संस्कृती ते प्रशासनापर्यंत रंगणार विचारमंथन!
नाशिकमध्ये एबीपी माझाचा ‘महाकुंभ महासंवाद’; धर्म, संस्कृती ते प्रशासनापर्यंत रंगणार विचारमंथन!
Kumbh Mela 2027: गोदावरीच्या तीरावर भरणार श्रद्धेचा महासागर! 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण, 2028 पर्यंत चालणार सिंहस्थ पर्व, अमृतस्नानांचं महत्त्व, वेळापत्रक जाणून घ्या!
गोदावरीच्या तीरावर भरणार श्रद्धेचा महासागर! 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण, 2028 पर्यंत चालणार सिंहस्थ पर्व, अमृतस्नानांचं महत्त्व, वेळापत्रक जाणून घ्या!
November December 2026 Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन.. 2026 चे शेवटचे 2 महिने नोव्हेंबर-डिसेंबर गेमचेंजर! 5 राशी मालामाल.. राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन.. 2026 चे शेवटचे 2 महिने नोव्हेंबर-डिसेंबर गेमचेंजर! 5 राशी मालामाल.. राशीभविष्य

व्हिडीओ

Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
Narendra Modi Tweet: विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
...अन्यथा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किंमत मोजावी लागू शकते; राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
...अन्यथा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किंमत मोजावी लागू शकते; राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
Chhatrapati Sambhajinagar Graduates Constituency Result 2026 मराठवाडा पदवीधरमध्ये राष्ट्रवादीला 'दे धक्का'; सतीश चव्हाणांच्या पराभवाची 6 कारणे, बदलाचा मुद्दा प्रभावी ठरला
मराठवाडा पदवीधरमध्ये राष्ट्रवादीला 'दे धक्का'; सतीश चव्हाणांच्या पराभवाची 6 कारणे, बदलाचा मुद्दा प्रभावी ठरला
Praful Patel NCP : 'आजचा विधानपरिषदेचा निकाल सांगतोय, आपल्याला पक्षात सुधारणा करावी लागेल'; प्रफुल पटेलांचा राष्ट्रवादीला घरचा आहेर, नेमकं काय म्हणाले?
'आजचा विधानपरिषदेचा निकाल सांगतोय, आपल्याला पक्षात सुधारणा करावी लागेल'; प्रफुल पटेलांचा राष्ट्रवादीला घरचा आहेर, नेमकं काय म्हणाले?
Embed widget