एक्स्प्लोर

Morning Headlines 4th April : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

Sharad Pawar NCP Second List : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज दुसरी यादी जाहीर होणार; माढा, बीड, साताऱ्यातून कोणाला संधी?

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर सध्या राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अजूनही सत्ताधारी महायुती (Mahayuti) आणि विरोधी बाकावरील महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) यांच्यातील जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. राज्यातील सर्वच पक्षांनी आपल्या काही जागांवर उमेदवार जाहीर केले असले तरी काही जागांवर एकापेक्षा अधिक नेते निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे काही जागांचा वाद सोडवताना पक्षाच्या नेतृत्त्वाची दमछाक होत आहे. दरम्यान, महाविकास आघाडीतर्फे सातारा, माढा, बीड (Satara, Madha, Beed) या महत्त्वाच्या जागांवर कोणाला संधी दिली जाणार असे विचारले जात आहे. याच पार्श्वभूमीवर या जागांसाठी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून (NCP) आज (4 एप्रिल) उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली जाऊ शकते. वाचा सविस्तर...

नवनीत राणांना लोकसभेचं तिकीट मिळालं, पण आज होणार खरा फैसला! जात प्रमाणपत्राविषयी काही क्षणांत 'सुप्रीम' निर्णय

दिल्ली : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या जात प्रमाणपत्राविषयी आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) निकाल देण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांपासून या प्रकरणावर वेगवेगळ्या न्यायालयांत सुनावणी चालू होती. मात्र आता ही सुनावणी पूर्ण झाली असून सर्वोच्च न्यायालय आज (4 एप्रिल) आपला निर्णय जाहीर करणार आहे. वाचा सविस्तर...

Rain Alert : राज्यात चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता, हवामानाचा अंदाज काय सांगतो? वाचा सविस्तर

मुंबई : देशात आज वातावरण कोरडं राहणा असून उद्यापासून पुढील चार दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. देशात एकीकडे पाऊस तर दुसरीकडे उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. 4 आणि 5 एप्रिलदरम्यान उत्तर कर्नाटकातील वेगवेगळ्या ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. 5 ते 7 एप्रिल दरम्यान पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये वेगळ्या ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शुक्रवारपासून महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. वाचा सविस्तर...

Sanjay Nirupam Resigns :संजय निरुपम यांचा मोठा निर्णय! दिला काँग्रेसचा राजीनामा, लवकरच राजकीय भूमिका स्पष्ट करणार

मुंबई : काँग्रेसचे नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam Resignation) यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसने (Congress) याआधी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले होते. त्यानंतर आता निरुपम यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनाम दिला आहे. सकाळी 11.30 वाजता ते पुढची राजकीय भूमिका जाहीर करणार आहेत. वाचा सविस्तर...

'रोहित शर्माकडून ही गोष्ट शिकायला हवी...'; वीरेंद्र सेहवागने हार्दिक पांड्याला दिला मोलाचा सल्ला

Virendra Sehwag Hardik Pandya: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) सलग तिसरा पराभव झाला. हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) कर्णधार बनवल्यानंतर मुंबई इंडियन्सला एकही सामना जिंकता आलेला नाही. वाचा सविस्तर...

Bharti Hexacom : एअरटेल कंपनीचा IPO खुला, गुंतवणूक करण्यासाठी फक्त दोन दिवस शिल्लक

Bharti Airtel Hexacom IPO : नवीन आर्थिक वर्षात (Financial Year 2024-25) तुम्ही गुंतवणूक करण्याचा प्लॅन करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. नवीन आर्थिक वर्षाचा पहिला आयपीओ खुला झाला असून त्यात गुंतवणूक करण्याची उत्तम संधी चालून आली आहे. 2024-25 आर्थिक वर्षातील पहिला आयपीओ बुधवारी खुला झाला आहे.  भारती एअरटेलच्या हेक्साकॉम कंपनीचा आयपीओ 3 एप्रिलपासून खुला झाला आहे. भारती एअरटेल कंपनीची सहाय्यक कंपनी हेक्साकॉमने आयपीओ बाजारात आणला असून याची किंमत 542 ते 570 दरम्यान आहे. वाचा सविस्तर...

Horoscope 3rd April: बुधवारी 'या' राशीचे नशीब पालटणार, मिळणार फायदेशीर संधी; वाचा तुमचे राशीभविष्य!

Horoscope 3rd April 2024:  आजचं माझं  भविष्य काय? आज  काय होणार?  किंवा आजचा  आपला दिवस कसा असणार प्रत्येक जण कधी ना कधी हा विचार करतच असतो. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच  भविष्यात काय होणार हे जाणून घेण्याची प्रबळ इच्छा असते. यासाठीच  आपल्या राशी आपल्याला मदत करतात. आज मेष ते मीन राशीमध्ये काय लिहिले आहे. कोणासाठी  आजचा दिवस कोणासाठी शुभ किंवा  अशुभ कोणासाठी हे  समजण्यासाठी आजचे राशीभविष्य वाचा सविस्तर...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget