Rain Alert : राज्यात चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता, हवामानाचा अंदाज काय सांगतो? वाचा सविस्तर
IMD Weather Forecast : देशात एकीकडे पाऊस तर दुसरीकडे उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. उद्यापासून पुढील चार दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई : देशात आज वातावरण कोरडं राहणार असून उद्यापासून पुढील चार दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. देशात एकीकडे पाऊस तर दुसरीकडे उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. 4 आणि 5 एप्रिलदरम्यान उत्तर कर्नाटकातील वेगवेगळ्या ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. 5 ते 7 एप्रिल दरम्यान पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये वेगळ्या ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. 4 ते 6 एप्रिल दरम्यान झारखंड, तेलंगणा आणि रायलसीमा येथे वेगळ्या ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यासोबतच आंध्र प्रदेशमध्ये वेगवेगळ्या ठिकाणीही उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात पावसाची शक्यता
4 ते 6 एप्रिल दरम्यान आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) झारखंड, तेलंगणा आणि रायलसीमाच्या काही भागात उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे. 4 ते 7 एप्रिल दरम्यान पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या काही भागात उष्णतेच्या लाटेची स्थितीची शक्यता आहे. शुक्रवारपासून महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये ताशी 30 ते 40 किमी वेगाने तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाचा अंदाज
आयएमडीकडून (IMD) एप्रिल महिन्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर पश्चिम, मध्य भारत, आणि पूर्व भारतातील अनेक भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यापासून, पूर्व आणि पूर्व भारतातील काही भाग आणि उत्तरेकडील भारतातील काही भागांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पुढील आठवड्यापासून तापमान वाढ
पुढील आठवड्यापासून बहुतेक भागात तापमान वाढ होण्याचा अंदाज आहे. देशातील बहुतेक भागांमध्ये सामान्यपेक्षा जास्त असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. एप्रिल ते जून दरम्यान उन्हाळ्याच्या हंगामात पूर्वोत्तर आणि उत्तर भारतातील काही उत्तरेकडील बहुतांश भाग वगळता, देशाच्या बहुतेक भागांमध्ये सामान्य किंवा सामान्यपेक्षा जास्त तापमान दिसून येईल. पूर्वोत्तर आणि उत्तर भारतातील काही उत्तरेकडील भागात सामान्य किंवा सामान्यपेक्षा कमी तापमान राहण्याची शक्यता आहे.
मुंबईत हवामान कसं असेल?
पुढील 24 तासांसाठी मुंबईत हवामान कसं असेल याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांसाठीचा अंदाज पाहता हवामान कोरडे राहण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. शहर आणि उपनगरात आकाश निरभ्र राहील. मुंबईसह उपनगरात कमाल 34°C आणि किमान तापमान 23°C च्या आसपास राहिल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.