एक्स्प्लोर

Morning Headlines 2nd October: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... 

iPhone15 Heating Issue: आयफोन 15 ओव्हरहिटींग इश्यू, युजर्सचा गोंधळ; सोशल मीडियावर अनेक दावे, पण अॅपल म्हणतंय...

iPhone15 Heating Issue: Apple ची नव्यानं लाँच झालेली आयफोन 15 सीरिजची चर्चा सध्या संपूर्ण जगभरात आहे. नवी आयफोन सीरिज बाजारात आली की, ती खरेदी करण्यासाठी बाजारात झुंबड उडते. सीरिजची घोषणा झाल्यापासूनच आयफोन आणि आयफोन बनवणारी कंपनी अॅपल चर्चेत असते. पण, सध्या आयफोनच्या नव्याकोऱ्या सीरिजची चर्चा रंगली आहे ती, हीटिंगच्या तक्रारींमुळे. iPhone 15 मध्ये हीटिंगच्या समस्या उद्भवत असून त्याबाबत अनेक युजर्सनी तक्रारीही केल्या आहेत. Apple iPhone 15 वापरल्यानंतर काही काळानं आयफोन ओव्हर हिट होत असल्याचं युजर्सचं म्हणणं आहे. आता यावर कंपनीकडूनही भाष्य करण्यात आलं आहे. वाचा सविस्तर 

गल्लीतील दादा, भाईंना राजकरणात 'नो एन्ट्री'; गुन्हेगारांचा राजकारणातील प्रवेश रोखण्यासाठी निवडणूक आयोगाची नवीन नियमावली

Chief Election Commissioner Update:  राजस्थानमध्ये (Rajasthan Assembly Election 2023) आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. या पार्श्वभुमीवर निवडणूक आयोगही (Election Commission) सज्ज झालं आहे. गुन्हेगारांचा राजकारणातील प्रवेश रोखण्यासाठी निवडणुक आयोगान पाऊल उचलले आहे. नव्या नियमानुसार गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला तिकीट का दिलं, याचं स्पष्टीकरण राजकीय पक्षांना वृत्तपत्रातून द्यावं लागणार आहे. त्याचबरोबर उमेदरवांनाही वर्तमानपत्रात जाहिराती देऊन गुन्हेगारी रेकॉर्डची माहिती द्यावी लागणार आहे. वाचा सविस्तर 

सप्टेंबरमध्ये1.63 लाख कोटी GST कलेक्शन; गेल्या वर्षीपेक्षा 10.2 टक्के जास्त, महाराष्ट्रातून सर्वाधिक महसूल

GST Collection in September 2023: सप्टेंबरमध्ये 1.63 लाख कोटी जीएसटी कलेक्शन (GST Collection) करण्यात आलं आहे. गेल्यावर्षीपेक्षा यंदा 10.2 टक्के जास्त जीएसटी (GST) कलेक्शन करण्यात आलं आहे. तर, यंदा महाराष्ट्रातून सर्वाधिक 25 हजार 137 कोटी रुपयांचं कलेक्शन करण्यात आलं आहे. दरम्यान, सप्टेंबर 2023 मध्ये जीएसटी संकलनाच्या बाबतीत महाराष्ट्र टॉप-5 राज्यांमध्ये अव्वल आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत महाराष्ट्रात जीएसटी संकलन 17 टक्क्यांनी वाढून 25,137 कोटी रुपये झाले आहे. वाचा सविस्तर 

Manipur Violence: मणिपूर हिंसाचारामागे दहशतवादी संघटनांचा हात? एनआयएच्या तपासात धक्कादायक माहिती समोर

Manipur Violence News : हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये (Manipur Violence)  चार महिन्यांनंतरही अशांत आहे. त्यातच मणिपूरमधील या हिंसाचाराबाबत एनआयएच्या (NIA)  तपासातून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. मणिपूरमध्ये हिंसाचार भडकवण्यामागे म्यानमारमधील काही प्रतिबंधित दहशतवादी संघटनांचा हात असल्याचं एनआयएच्या तपासातून समोर आलं आहे.  या प्रकरणी एका संशयीत व्यक्तीला एएनआयने अटक केली आहे. वाचा सविस्तर 

ABP C Voter Survey: 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांनी पंतप्रधानांच्या उमेदवाराची घोषणा करावी? सर्वेक्षणात लोकांनी म्हटलंय...

ABP News C Voter Survey: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Elections 2024) मध्ये भाजपच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) विरुद्ध लढण्यासाठी 25 हून अधिक पक्षांनी एकत्र येत 'इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स' (I.N.D.I.A.) ची स्थापना केली. परंतु, विरोधकांनी त्यांच्या पंतप्रधान पदाचा चेहरा अद्याप जाहीर केलेला नाही. पंतप्रधान पदासाठी विरोधकांमधील अनेक नावं चर्चेत आहेत. परंतु, अद्याप नावांवर एकमत होत नसल्याचं दिसून येत आहे. वाचा सविस्तर 

ABP C Voter Survey: नितीश कुमार I.N.D.I.A. आघाडीवर नाराज? जनताही संभ्रमात, NDA मध्ये सामील होण्याच्या चर्चांवर लोकांची धक्कादायक उत्तरं

ABP C Voter Survey: अलीकडेच इंडियन नॅशनल लोकदलाच्या (Indian National Lok Dal) कार्यक्रमाला न जाता नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. तेव्हापासून त्यांच्या एनडीएमध्ये प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले आहेत. मात्र, जेडीयू (JDU) प्रमुख नितीश कुमार यांनी सर्व तर्कवितर्काच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. वाचा सविस्तर 

Gandhi Jayanti 2023 : 150 वर्षांनंतरही जगाला 'बापूं'ची गरज, राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त वाचा त्यांचे विचार

Mahatma Gandhi Birth Anniversary : आज 2 ऑक्टोबर रोजी, राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची जयंती आहे. यंदा बापूंची 154 वी जयंती (Gandhi Jayanti 2023) साजरी केली जात आहे. संपूर्ण देशात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून गांधी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. देशभरात स्वच्छता अभियानही राबवलं जात आहे. 'अहिंसा परमो धर्म:' आत्मसात करून बापूंनी आपल्या हयातीतच या विचाराची ताकद जगाला जाणवून दिली. अहिंसक सत्याग्रहाच्या माध्यमातून स्वातंत्र्य चळवळीत मोलाचं योगदान देऊन बापूंनी देशाला आणि जगाला अहिंसेचा विचार पटवून दिला. देशांतील अशांतता आणि युद्धाच्या उंबरठ्यावर असलेल्या जगात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांची खूप जास्त गरज आहे. साधी राहणी, उच्च विचार आणि सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालणारी त्यांची तत्वे आजही जगाला शांततेचा मार्ग दाखवत आहेत. वाचा सविस्तर 

2nd october In History : भारताचे दोन महान रत्ने महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांचा जन्म, देशात स्वच्छ भारत अभियानाला सुरूवात; आज इतिहास

मुंबई: आजचा दिवस भारताच्या इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्या दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि स्वातंत्र्यसैनिक आणि देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म झाला होता. तसेच आजच्याच दिवशी मद्रासच्या पेरांबूरमध्ये रेल्वेचा पहिला कोच तयार करण्यात आला. यासह इतर महत्त्वाच्या बातम्या खालीलप्रमाणे, वाचा सविस्तर 

Weekly Horoscope 2-8 Oct: आजपासून सुरू होणारा नवीन आठवडा 'या' राशींसाठी चांगली बातमी घेऊन येणार, जाणून घ्या

Weekly Horoscope 2-8 Oct : महिन्याचा पहिला आठवडा आजपासून म्हणजेच 2 ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. काही राशींसाठी हा आठवडा खूप फलदायी असणार आहे. काही राशींना या आठवड्यात खूप चांगली बातमी मिळेल. साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या... वाचा सविस्तर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget