Share Market Update : शेअर मार्केटमध्ये ट्रेंड बदलला, सेन्सेक्स अन् निफ्टीमध्ये तेजी, अदानींच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये उसळी
Share Market : शेअर मार्केटमध्ये आज 700 अकांची तेजी पाहायला मिळाली. यामुळं गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीच्या निर्देशांकात वाढ दिसून आली.
मुंबई : शेअर बाजार बंद होताना गुरुवारी 1190 अंकांनी कोसळून बंद झाला होता. आज सकाळी 12.20 पर्यंत शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स 700 अंकांनी वधारला. यामध्ये सिप्ला, सन फार्मा, भारती एअरटेल, महिंद्रा अँड महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपन्यांच्या जोरावर निफ्टीनं 24 हजारांचा टप्पा पार केला. निफ्टी निर्देशांक 24124 अकांवर गेला असून सेन्सेक्स 700 अकांनी वधारुन 79785 अंकांवर पोहोचा आहे.
विशेष बाब म्हणजे अदानी ग्रुपच्या शेअरमध्ये देखील तेजी पाहायला मिळाली. अदानी ग्रीन एनर्जी, अदानी एनर्जी सोल्यूशन्स, अदानी टोटल गॅसमध्ये 14 टक्क्यांपर्यंत तेजी पाहायला मिळाली. अदानी ग्रुपच्या या तीन शेअरला एनएसईवर प्यूचर्स अँड ऑप्शन्स सेगमेंटमध्ये समाविष्ट करुन घेण्यात आलं आहे. त्यामुळं या कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली.
अदानी ग्रीनच्या शेअरमध्ये सर्वाधिक वाढ झाल्याचा फायदा गुंतवणूकदारांना होत असल्याचं पाहायला मिालं. आज या कंपनीच्या शेअरमध्ये 14 टक्के तेजी पाहायला मिळाली. अदानी एनर्जी सोल्यूशन्समध्ये 12 टक्के, अदानी टोटल गॅसमध्ये 6 टक्के वाढ झाली.
लार्ज कॅपमध्ये अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअरमध्ये 133 रुपयांची वाढ आजच्या दिवशी पाहायला मिळाली.अदानी एनर्जी सोल्यूशन 66.40 रुपये, भारती एअरटेल 60, सिप्लाच्या शेअरमध्ये 53 रुपयांची तेजी पाहायला मिळाली. याशिवाय एलआयसी, टोरेंट फार्मा, दिवीज लॅब्स, सन फार्मा, श्री सिमेंट, अंबुजा सिमेंट, यूनाएटेड स्पिरिटस ,एलअँड टी, झायडस, महिंद्रा अँड महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज टाटा कन्झ्यूमरच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली.
मिडकॅपमध्ये फर्ट अँड केम ट्रॅवन,एपीएळ अपोलो ट्यूब्स, अल्केम लॅबरोटरीज,सुप्रीम इंडस्ट्रीज, ल्यूपिन, माझगाव डॉक शिप, अरुबिंदो फार्माच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली.
स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये पिरॅमल फार्मा, झी एंटरटेनमेंट, आधार हाऊसिंग फायनान्स, फर्स्ट सोर्स सोल्यूशन, रॅमको सिमेंटस,एस्टर हेल्थकेअर यासह इतर कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली.
कोणत्या कंपन्याचे शेअर घसरले?
लार्ज कॅप स्टॉक्सपैकी एनएचपीसी, कोरोमंडल इनवेस्ट, आयआरएफसी,झोमॅटो, पीएनबी यासह इतर कंपन्यांचे शेअर घसरले. मिड कॅप आणि स्मॉल कॅपमधील काही कंपन्यांच्या शेअरमध्ये देखील घसरण पाहायला मिळाली.
इतर बातम्या :
EPFO 3.0 Update लवकरच येणार, पीएफचे पैसे ATM वरुन काढता येणार, मोठी अपडेट समोर
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)