ABP C Voter Survey: नितीश कुमार I.N.D.I.A. आघाडीवर नाराज? जनताही संभ्रमात, NDA मध्ये सामील होण्याच्या चर्चांवर लोकांची धक्कादायक उत्तरं
ABP News C Voter Survey: नितीश कुमार पुन्हा NDA मध्ये सामील होणाच्या शक्यतांवर एबीपी न्यूजसाठी सी-व्होटरनं सर्वेक्षण केलं आहे.
![ABP C Voter Survey: नितीश कुमार I.N.D.I.A. आघाडीवर नाराज? जनताही संभ्रमात, NDA मध्ये सामील होण्याच्या चर्चांवर लोकांची धक्कादायक उत्तरं Abp news c voter survey will nitish kumar join nda again before lok sabha election 2024 INDIA Alliance Know details ABP C Voter Survey: नितीश कुमार I.N.D.I.A. आघाडीवर नाराज? जनताही संभ्रमात, NDA मध्ये सामील होण्याच्या चर्चांवर लोकांची धक्कादायक उत्तरं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/29/f2525dbad3b26911e3e20a7a70a509971693302003632124_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
ABP C Voter Survey: अलीकडेच इंडियन नॅशनल लोकदलाच्या (Indian National Lok Dal) कार्यक्रमाला न जाता नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. तेव्हापासून त्यांच्या एनडीएमध्ये प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले आहेत. मात्र, जेडीयू (JDU) प्रमुख नितीश कुमार यांनी सर्व तर्कवितर्काच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.
याबाबत सी व्होटरनं एबीपी न्यूजसाठी ऑल इंडिया सर्वेक्षण केलं आहे. I.N.D.I.A आघाडीवर नाराज असून नितीश कुमार पुन्हा NDA मध्ये सामील होऊ शकतात, अशा चर्चांना उधाण आलं आहे. त्याबाबत लोकांचं म्हणणं काय? हे जाणून घेण्यासाठी एबीपी न्यूजसाठी सी-व्होटरनं सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणात लोकांना काही प्रश्न विचारण्यात आले. नितीश कुमार इंडिया आघाडीवर नाराज आहेत आणि त्यामुळे ते पुन्हा एनडीएसोबत जाणार का? असा प्रश्न विचारुन याबाबत लोकांचं म्हणणं जाणून घेण्यात आलं.
सर्वेक्षणाचा धक्कादायक निष्कर्ष
सर्वेक्षणाच्या निष्कर्षात धक्कादायक उत्तर समोर आलं. सर्वेक्षणात 32 टक्के लोकांनी हो असं उत्तर दिलं आहे. तसेच, 30 टक्के लोकांनी नाही असं म्हटलं आहे. तर 38 टक्के लोकांनी आपण याबाबत काहीच बोलू शकत नाही, असं म्हटलं आहे. म्हणजेच, सर्वेक्षणाच्या या निष्कर्षावरुन लोकंही संभ्रमात असल्याचं दिसून येत आहे.
नितीश कुमार 'I.N.D.I.A' आघाडीत नाराज असून लवकरच NDA चा हात पकडणार?
हो : 32 टक्के
नाही : 30 टक्के
काहीच सांगू शकत नाही : 38 टक्के
यापूर्वीही नितीश कुमार नाराज असल्याच्या चर्चा
यापूर्वी बंगळुरूमध्ये झालेल्या 26 विरोधी पक्षांच्या संयुक्त बैठकीनंतर नितीश कुमार नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. युतीचे नाव इंडिया असं ठेवल्यानं आणि युतीसाठी समन्वयक जाहीर न केल्यानं बिहारचे मुख्यमंत्री नाराज असल्याचं बोललं जात होतं.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीला 2024 लोकसभेची सेमीफायनल म्हटलं जात आहे. निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. एबीपी न्यूजसाठी सी व्होटरनं या मुद्द्यावर अखिल भारतीय सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणात 2 हजार 686 लोकांची मतं जाणून घेण्यात आली आहेत. शनिवारपासून आज (12 ऑक्टोबर) दुपारपर्यंत हे सर्वेक्षण करण्यात आलं. सर्वेक्षणातील मार्जिन ऑफ एरर प्लस मायनस 3 ते प्लस मायनस 5 टक्के आहे. सर्वेक्षणाचा निष्कर्ष पूर्णपणे लोकांशी साधलेला संवाद आणि त्यांनी व्यक्त केलेली मत यावर आधारीत आहे. याला एबीपी न्यूज जबाबदार नाही.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)