एक्स्प्लोर

iPhone15 Heating Issue: आयफोन 15 ओव्हरहिटींग इश्यू, युजर्सचा गोंधळ; सोशल मीडियावर अनेक दावे, पण अॅपल म्हणतंय...

आयफोन 15 प्रोमध्ये ओव्हर हिटींगच्या समस्येनं युजर्स त्रस्त झाले असून ओव्हर हिटींगच्या समस्येमुळ युजर्सचा पुरता गोंधळ उडाला आहे.

iPhone15 Heating Issue: Apple ची नव्यानं लाँच झालेली आयफोन 15 सीरिजची चर्चा सध्या संपूर्ण जगभरात आहे. नवी आयफोन सीरिज बाजारात आली की, ती खरेदी करण्यासाठी बाजारात झुंबड उडते. सीरिजची घोषणा झाल्यापासूनच आयफोन आणि आयफोन बनवणारी कंपनी अॅपल चर्चेत असते. पण, सध्या आयफोनच्या नव्याकोऱ्या सीरिजची चर्चा रंगली आहे ती, हीटिंगच्या तक्रारींमुळे. iPhone 15 मध्ये हीटिंगच्या समस्या उद्भवत असून त्याबाबत अनेक युजर्सनी तक्रारीही केल्या आहेत. Apple iPhone 15 वापरल्यानंतर काही काळानं आयफोन ओव्हर हिट होत असल्याचं युजर्सचं म्हणणं आहे. आता यावर कंपनीकडूनही भाष्य करण्यात आलं आहे. 

अॅपलनं नुकताच लॉंच केलेल्या आयफोन 15 च्या आता यपजर्सकडून तक्रारी येऊ लागल्या आहेत. अनेक युजर्सनी आयफोन 15 प्रो वापरत असताना ओव्हरहिटींगच्या समस्या येत असल्याची तक्रार केली आहे. कंपनीनं या समस्येचं निराकरण करण्यासाठी काम करत असल्याचं सांगण्यात आलं आहे. डिव्हाइस सेट अप केल्यानंतर किंवा पुन्हा रिस्टार्ट केल्यानंतर पहिल्या काही दिवसांमध्ये डिव्हाइस गरम होऊ शकतो, असंही कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. एवढंच नाहीतर सोशल मीडियावर काही रिपोर्ट्सही आलेत, त्यामधून असा दावा करण्यात आला आहे की, Android टाइप सी चार्जिंग केबल वापरल्यामुळे आयफोन 15 मध्ये हीटिंग समस्या येत आहेत. काही अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की हे थर्मल डिझाइनमुळे होत आहे. परंतु अॅपलने ही समस्या सॉफ्टवेअर अपडेटद्वारे सोडवली जाईल असं सांगितलं आहे.

अॅपलकडून स्पष्टीकरण

अॅपलनं अलीकडेच लाँच केलेल्या iPhone 15 मॉडेल्समध्ये ओव्हरहाटिंगची समस्या उद्भवत असून त्याबाबत अनेक युजर्सनी तक्रार केली आहे. युजर्सकडून सातत्यानं केल्या जाणाऱ्या तक्रारींची दखल अॅपलनं घेतली असून ती मान्यही केली आहे. अनेक युजर्सनी प्रो मॉडेल वापरताना फोन गरम होत असल्याची तक्रार केली आहे. कंपनीनं या समस्येचं निराकरण करण्यासाठी काम करत असल्याचं सांगितलं आहे. तसेच, क्यूपर्टिनो, यूएस-आधारित कंपनीनं iOS 17 मधील बगमुळे हे झालं असल्याचं म्हटलं आहे. सॉफ्टवेअर अपडेटद्वारे ही समस्या दूर होऊ शकते, तसेच इतर काही अॅप आहेत, त्यामुळेही ओव्हरहिटिंग होत असल्याचं अॅपलचं म्हणणं आहे. 

ओव्हरहिटिंगचं कारण शोधताना आम्ही केलेल्या तपासात काही बाबी समोर आल्या आहेत. ज्यामुळे आयफोन ओव्हरहिट होऊ शकतो असं निदर्शनास आलं. डिव्हाइस सेटअप केल्यानंतर किंवा पुन्हा रिस्टार्ट केल्यानंतर पहिल्या काही दिवसांमध्ये डिव्हाइस गरम होऊ शकतो, असं अॅपलचं म्हणणं आहे. 

"आम्हाला iOS 17 मध्ये एक बग देखील सापडला आहे ज्यामुळे काही युजर्सच्या डिव्हाइसमध्ये ओव्हरहिटिंगची समस्या निर्माण होत आहे. सॉफ्टवेअर अपडेटमध्ये याचा मार्ग सापडेल आणि ही समस्या दूर होईल. तर, काही डिव्हाइसमध्ये थर्ड पार्टी अॅप्सच्या काही बाबींमुळे आयफोन ओव्हरहिट आहेत. ज्यामुळे ते सिस्टम ओव्हरलोड करत आहेत. आम्ही या अॅप डेव्हलपर्ससोबत इश्यू रोलआऊट करण्याच्या प्रक्रियेत असलेल्या समस्यांवर तोडगा काढण्याचं काम करत आहोत.", असं अॅपलकडून सांगण्यात आलं आहे. 

अॅपलनं फेटाळले इतर दावे 

आयफोन 15 मध्ये जास्त गरम होण्याच्या समस्या वाढत आहेत. टायटॅनियम बॉडीमुळे आयफोन 15 प्रो आणि आयफोन 15 प्रो मॅक्समध्ये हीटिंग समस्या उद्भवू शकते, असं बोललं जात आहे. मात्र, अॅपलनं या चर्चांना फेटाळून लावलं आहे. याशिवाय अॅपलनं सी-टाईप चार्जिंग पोर्टमुळे ओव्हरहिट होत असल्याच्या शक्यताही फेटाळून लावल्या आहेत.  फोर्ब्सच्या अहवालात असं म्हटलं आहे की, इंस्टाग्रामनं 27 सप्टेंबर रोजी हीटिंग समस्येचं निराकरण करण्यासाठी एक अपडेट आणलं होतं. तर Apple इतर विकासकांसोबत हीटिंग समस्येचं निराकरण करण्यासाठी काम करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

PM Kisan : पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
Kiren Rijiju vs Naseeruddin Shah : शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
Ambajogai Cataract Surgery : बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Satej Patil: तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय
तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय

व्हिडीओ

Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं
Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Kisan : पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
Kiren Rijiju vs Naseeruddin Shah : शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
Ambajogai Cataract Surgery : बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Satej Patil: तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय
तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय
Pune Graduate And Teachers Election Result 2026: पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का? राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार
अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का? राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार
Abdul Sattar : युती टिकवायची की तोडायची भाजपने ठरवावं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका झाल्या, आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं : अब्दुल सत्तार
युती टिकवायची की तोडायची भाजपने ठरवावं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका झाल्या, आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं : अब्दुल सत्तार
Sunetra Pawar: पदवीधर, शिक्षक निकालानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'आम्ही आत्मपरीक्षण करू; सुधारण्याचा प्रयत्न करू...'
पदवीधर, शिक्षक निकालानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'आम्ही आत्मपरीक्षण करू; सुधारण्याचा प्रयत्न करू...'
Embed widget