एक्स्प्लोर

सोन्या चांदीला पुन्हा झळाळी, सलग दुसऱ्या दिवशी दरात झाली वाढ, 10 ग्रॅम सोन्यासाठी किती द्यावे लागतात पैसे? 

देशात सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. या काळात सोन्या-चांदीची (Gold Silver) मोठी खरेदी होते. मात्र, सध्या सोन्या चांदीच्या दरात (Gold Silver Price) मोठी वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे.

Gold Silver Price: देशात सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. या काळात सोन्या-चांदीची (Gold Silver) मोठी खरेदी होते. मात्र, सध्या सोन्या चांदीच्या दरात (Gold Silver Price) मोठी वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढीमुळं देशांतर्गत बाजारात देखील सोन्या-चांदीच्या दरात वाढ सुरु आहे. जाणून घेऊयात सोन्या चांदीच्या दराबाबत सविस्तर माहिती.

आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरात वाढ 

एमसीएक्सवर चांदीची किंमत सध्या 91329 रुपये प्रति किलो आहे. ती पुन्हा उच्च पातळीवर जाऊ लागली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदीच्या मार्च फ्युचर्सने 1.32 टक्क्यांची वाढ दर्शवत 1200 रुपयांची (रु. 1194) झेप घेतली आहे. सकाळी चांदीचा व्यवहार 1000 रुपयांहून अधिक वाढीसह सुरू झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या किमती वाढत आहेत आणि त्यामुळे सराफा बाजार असो की कमोडिटी मार्केट, देशांतर्गत बाजारातही चांदीला जोर मिळत आहे.

सोन्याच्या दरातही वाढ

सोन्याच्या दरातील वाढीचा कल कायम असून तो 77 हजार रुपयांच्या पुढे गेला आहे. MCX वर सोन्याचा दर हा 77130 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. पुन्हा एकदा सोन्याच्या सार्वकालिक उच्चांकाकडे वाटचाल होताना दिसत आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीची किंमत

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ होताना दिसत आहे.  आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात 0.98 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात 1.62 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सोन्या चांदीचे दर वाढण्याचे कारण काय?

सोन्या चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तज्ज्ञांच्या मते औद्योगिक मागणीत वाढ, चीनचे आर्थिक मदत पॅकेज, यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कपात केल्याने सोन्या चांदीच्या दरात वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या मते, मध्यम ते दीर्घ मुदतीसाठी सोन्यामध्ये आणि चांदीमध्य केलेली गुंतवणूक जास्त परतावा देऊ शकते. त्यामुळं लोकांचा मोठ्या प्रमाणा सोन्या चांदीमध्ये गुंतवणूक करण्याकडे कल आहे. 12 ते 15 महिन्यांत, चांदी MCX वर 1.25 लाख रुपये प्रति किलो जाण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसापासून सोन्या चांदीच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. या वाढीमुळं सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ सोसावी लागत आहे. अशातच पुन्हा चांदीच्या दरात वाढ होण्याची शक्यता असल्यानं सामान्य लोकांना चांदीची खरेदी करणं परवडणार नाही. 

महत्वाच्या बातम्या:

चांदीला झळाळी येणार! प्रति किलो चांदी 1 लाख 25 हजार रुपयापर्यंत जाणार, सध्या चांदीची दर काय? 

महत्त्वाच्या बातम्या

Inflation Essential Commodities: 42 पैकी 41 जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती धडाधड वाढल्या; कांद्याच्या दरात 113 टक्क्यांनी वाढ, काय काय महागलं?
42 पैकी 41 जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती धडाधड वाढल्या; कांद्याच्या दरात 113 टक्क्यांनी वाढ, काय काय महागलं?
Gold Silver Rate : सोन्याच्या दरात मोठी वाढ; भाव दीड लाखांच्या पुढे, तर चांदीचे दर घसरले, वर्षाच्या अखेरीस दरात 'इतक्या' हजारांंची वाढ होण्याची शक्यता, तज्ज्ञांनी दिली माहिती
सोन्याच्या दरात मोठी वाढ; भाव दीड लाखांच्या पुढे, तर चांदीचे दर घसरले, वर्षाच्या अखेरीस दरात 'इतक्या' हजारांंची वाढ होण्याची शक्यता, तज्ज्ञांनी दिली माहिती
सणांपूर्वीच घरघुती बजेट कोलमडलं! 53 टक्के कुटुंब आर्थिक संकटात, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर 
सणांपूर्वीच घरघुती बजेट कोलमडलं! 53 टक्के कुटुंब आर्थिक संकटात, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर 
कमी पगारातून सुरुवात, आज 75 लाखांची संपत्ती, 26 वर्षाच्या तरुणाची आदर्शवत कामगिरी, नेमकं कसं केलं नियोजन?  
कमी पगारातून सुरुवात, आज 75 लाखांची संपत्ती, 26 वर्षाच्या तरुणाची आदर्शवत कामगिरी, नेमकं कसं केलं नियोजन?  

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti: ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
Soybean Rates Today: दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?
दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?
Gokul Election: जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
Abhijeet Dipke Post Sonakshi Sinha Comment: अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
Thane Crime Pradeep Purnekar: प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
Delhi CJP protest Jean Dreze: दिल्लीतील सरकारविरोधी आंदोलनातील 'तो' परदेशी व्यक्ती कोणी सोम्यागोम्या नव्हे तर आहे विख्यात अर्थतज्ज्ञ, कोण आहेत ज्यां द्रेज?
दिल्लीतील सरकारविरोधी आंदोलनातील 'तो' परदेशी व्यक्ती कोणी सोम्यागोम्या नव्हे तर आहे विख्यात अर्थतज्ज्ञ, कोण आहेत ज्यां द्रेज?
Sara Tendulkar birthday: सचिन तेंडुलकरांच्या लाडक्या लेकीचा वाढदिवस; वहिनी सानिया चंडोकसोबतचा VIDEO व्हायरल
सचिन तेंडुलकरांच्या लाडक्या लेकीचा वाढदिवस; वहिनी सानिया चंडोकसोबतचा VIDEO व्हायरल
Nagpur Crime : आधी स्वतः तलाक दिला, मग पूर्वाश्रमीच्या बायकोनं दुसरं लग्न केल्याचा राग अनावर, नमाज पठणासाठी गेलेल्या वसीमला रस्त्यात गाठलं अन्..., नागपूर हादरलं!
आधी स्वतः तलाक दिला, मग पूर्वाश्रमीच्या बायकोनं दुसरं लग्न केल्याचा राग अनावर, नमाज पठणासाठी गेलेल्या वसीमला रस्त्यात गाठलं अन्..., नागपूर हादरलं!
Embed widget