Anand Mahindra Love Story : जेव्हा 17 वर्षांच्या मुलीच्या प्रेमात पडले अन् तिच्यासोबत राहण्यासाठी सेमिस्टरला दांडी मारली!
Anand Mahindra Love Story : आनंद महिंद्रा यांच्या पत्नी अनुराधा महिंद्रा Verve मासिकाच्या संस्थापक आहेत. प्रसिद्ध लक्झरी जीवनशैली मासिक Verve च्या संस्थापक आहेत.

Anand Mahindra Love Story : आनंद महिंद्रा (Anand Mahindra) या नावाने प्रसिद्ध असलेल्या महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद गोपाल महिंद्रा हे भारतातील सर्वात मोठ्या समूहांपैकी एक आहेत. 2004 मध्ये, आनंद महिंद्रा यांना व्यवसाय क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल प्रतिष्ठित राजीव गांधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. एरोस्पेस, कृषी व्यवसाय, संरक्षण, हाॅस्पिटीलिटी आणि बरंच काही यासह जगभरातील विविध क्षेत्रात त्यांची मुशाफिरी आहे.
अनुराधा महिंद्रा Verve मासिकाच्या संस्थापक
2016 मध्ये, आनंद महिंद्रा यांना इंटरनेट आणि मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाने सोशल मीडिया पर्सन ऑफ द इयरचा किताब दिला होता. यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम (USISPF) तर्फे त्यांना लीडरशिप अवॉर्डनेही गौरविण्यात आले. जरी ते सोशल मीडियावर खूप सक्रिय असले तरी, महिंद्रा त्यांचे वैयक्तिक जीवन खाजगी ठेवण्यास प्राधान्य देतात आणि त्यांच्या पत्नी आणि कुटुंबाबद्दल क्वचित शेअर करतात. आनंद महिंद्रा यांच्या पत्नीचे नाव अनुराधा महिंद्रा आहे. त्यांना दिव्या आणि अलिका या दोन मुली आहेत.
आनंद महिंद्रा यांच्या पत्नी अनुराधा महिंद्रा Verve मासिकाच्या संस्थापक आहेत. प्रसिद्ध लक्झरी जीवनशैली मासिक Verve च्या संस्थापक आहेत आणि पुरुषांच्या जागतिक मासिकाच्या सह-संस्थापक आहेत. त्यांचा जन्म मुंबईत झाला. त्यानी प्रतिष्ठित सोफिया कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. तसेच बोस्टन विद्यापीठात कम्युनिकेश प्रोग्राम पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिता आणि प्रकाशनात व्यावसायिक कारकीर्द सुरू ठेवली. अनुराधा महिंद्रा काही काळ कनिष्ठ पदावर काम केल्यानंतर रोलिंग स्टोन इंडियाच्या मुख्य संपादक बनल्या. अनेक वर्षे कठोर परिश्रम केल्यानंतर त्या ARTISANS च्या सल्लागार समितीच्या भाग बनल्या.
आनंद महिंद्रा अनुराधा यांना कसे भेटले?
आनंद महिंद्रा यांची प्रेमकहाणी खूपच मनोरंजक आणि रोमँटिक आहे. महिंद्रा हार्वर्ड विद्यापीठात शिकत असताना त्यांच्या महाविद्यालयीन असाइनमेंटसाठी विद्यार्थ्यांच्या चित्रपटाचे शूटिंग आणि निर्मिती करण्यासाठी इंदूरला आले. इंदूरच्या भेटीदरम्यान, ते अनुराधा नावाच्या 17 वर्षांच्या मुलीला भेटले आणि क्रशही झाला. धक्कादायक म्हणजे आनंद महिंद्रा यांनी अनुराधासोबत डेट करत असताना त्यांच्यासोबत अधिक वेळ घालवण्यासाठी सेमिस्टरची सुट्टी घेतली. अनुराधासोबत आयुष्य घालवायचे आहे याची आनंद यांना खात्री असल्याने त्यांनी हे अवघड पाऊल उचलले.
आनंद महिंद्रा यांनी अनुराधा यांना लग्नाचा प्रस्ताव दिला
या अब्जाधीशाने काही काळ डेट केल्यानंतर आजीच्या अंगठीने आपल्या मैत्रिणीला प्रपोज केले आणि अनुराधाने त्यांच्या लग्नाचा प्रस्ताव स्वीकारला. 17 जून 1985 रोजी या लव्हबर्ड्सचे लग्न झाले आणि लग्नानंतर ते अमेरिकेला गेले. त्यांना दिव्या आणि अलिका या दोन मुली आहेत. आनंद महिंद्रा अनेकदा त्यांची पत्नी अनुराधाचे कौतुक करताना दिसतात की त्यांच्या उद्योजकीय प्रवासात ती त्यांची सर्वात मोठी सहाय्यक आहे.
मी कधीही सर्वात श्रीमंत होणार नाही, कारण...
फोर्ब्सच्या मते, आनंद महिंद्रा एक अब्जाधीश असून त्यांची एकूण संपत्ती सुमारे USD 2.6 अब्ज आहे, म्हणजे सुमारे 26,000 कोटी रुपये. फोर्ब्सच्या भारतातील श्रीमंतांच्या यादीत आणि फोर्ब्सच्या जागतिक अब्जाधीशांच्या यादीतही त्यांचा समावेश झाला आहे. जेव्हा आनंद महिंद्रा यांना 2022 मध्ये विचारण्यात आले की ते भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत प्रथम कधी येतील, तेव्हा त्यांनी हृदयस्पर्शी उत्तर दिले. ते म्हणाले की, “सत्य हे आहे की मी कधीही सर्वात श्रीमंत होणार नाही. कारण ती माझी इच्छा कधीच नव्हती.”
महिंद्राचे चेअरमन हे भारतातील सर्वात प्रिय अब्जाधीशांपैकी एक आहेत जे त्यांच्या धर्मादाय कार्यासाठी ओळखले जातात. बिझनेस टायकून आनंद महिंद्रा यांना विविध क्षेत्रात आणि उद्योगांमध्ये उल्लेखनीय योगदानासाठी अनेक सन्मान आणि पुरस्कार मिळाले आहेत. बिझनेस टायकून आनंद महिंद्रा यांना त्यांच्या विविध क्षेत्रांमध्ये आणि उद्योगांमध्ये उल्लेखनीय योगदानासाठी अनेक सन्मान आणि पुरस्कार मिळाले आहेत. आनंद महिंद्रा सोशल मीडियावरही कमालीचे सक्रिय आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
