Morning Headlines 29th November : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
Weather Update : हिवाळ्यात पावसाळा! महाराष्ट्रासह 'या' राज्यात जोरदार पावसाची शक्यता, IMD कडून अलर्ट जारी
Weather Update Today : राज्यासह देशात हिवाळ्यात (Winter) पावसाची हजेरी (Unseasonal Rain) पाहायला मिळत आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशभरातील हवामानात मोठा बदल झाला आहे. आजही देशभरात विविध ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. भारतीय हवामान विभागाकडून (India Meteorological Department) आज महाराष्ट्र, तामिळनाडू, मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही भागात ढगाळ वातावरणासह रिमझिम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. देशभरात विविध ठिकाणी हवामान विभागाकून अलर्ट जारी करण्यात आला आहे. वाचा सविस्तर...
Maharashtra Weather : राज्यात पुढील 48 तास पावसाची शक्यता, काही ठिकाणी गारपीट; शेतकऱ्यांची चिंता वाढली
Maharashtra Weather Today : राज्यात दोन दिवस पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने (IMD) पुढील 48 तास राज्यात पावसाची (Unseasonal Rain) शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज राज्यासह देशातही पावसाचा अंदाज आहे. राज्यात विविध ठिकाणी आज मध्यम पावसाच्या सरी कोसळणार आहेत, तर काही ठिकाणी तुरळक पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. त्याशिवाय काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. आज महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. वाचा सविस्तर...
Tunnel Rescue : 'त्या' 41 मजुरांना प्रत्येकी एक लाखांचा चेक मिळणार, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा
Uttarkashi Tunnel Rescue : उत्तराखंडमधील (Uttarakhand) उत्तरकाशी (Uttarkashi) इथं बोगद्यात अडकलेल्या मजुरांची अखेर सुटका करण्यात आली. या बोगद्यात 41 कामगार अडकले होते, त्यांची 17 दिवसांनी सुटका करण्यात आली. यशस्वी मोहिमेनंतर प्रशासन आणि मजुरांनाही सुटकेचा निश्वास सोडला. बोगद्यातून बाहेर आलेल्या 41 कामगारांसाठी आणखी एक दिलासादायक बातमी आहे. उत्तरखंडचे मुख्यमंत्री धामी यांनी मजुरांसाठी मदतीची घोषणा केली आहे. प्रत्येक मजुराला एक एक लाख रुपयांची मदत मिळणार आहे. वाचा सविस्तर...
Gold Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं उच्चांकी पातळीवर, तुमच्या शहरातील सोने-चांदीच्या दरावर काय परिणाम? आजचे दर पाहा
Gold Silver Rate Today : लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला सोने-चांदी खरेदी करायची असेल किंवा सोन्यात गुंतवणूक (Gold Investment) करायची असेल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. गुडरिटर्न्स (GoodReturns) वेबसाइटनुसार, आज म्हणजेच बुधवार 29 नोव्हेंबर रोजी देशात (India Gold Price Today) सोने-चांदीच्या किमती स्थिर आहेत. दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 57,500 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 62,710 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. मुंबईत आज सोन्याचा भाव 22 कॅरेट सोन्यासाठी 5,735 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्यासाठी 6,256 रुपये प्रति ग्रॅम आहे. वाचा सविस्तर...
NCP Crisis : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कुणाचा? निवडणूक आयोगात आज महत्वाची सुनावणी
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) नेमका कुणाचा याबाबत आज निवडणूक आयोगात (Election Commission) सुनावणी पार पडेल. निवडणूक आयोगात आपली बाजू मांडण्यासाठी शरद पवार गटाचा आजचा शेवटचा दिवस असेल. यानंतर गुरुवारपासून अजित पवार गट आपली भूमिका मांडणार आहे. यापूर्वी शरद पवार गटाच्या वतीने अजित पवार गटाने खोटी कागदपत्र सादर केलीय, राष्ट्रीय कार्यकारणी सहभागी सदस्यांची खोटी माहिती दिली, असे आरोप करत कायदेशीर कारवाई करत तत्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी केली होती. त्यामुळे आजची सुनावणी महत्वाची असणार आहे. वाचा सविस्तर...
Pneumonia Outbreak : चीनमध्ये नवा आजार, आता राज्य सरकार अॅक्शन मोडमध्ये, प्रत्येक जिल्ह्यांना सूचना
Pneumonia Outbreak in China : चीनमध्ये लहान मुलांना होणाऱ्या श्वसनविकाराची नवी साथ आल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यापार्श्वभूमिवर प्रत्येक जिल्ह्यांना केंद्र सरकार मार्फत सूचना करम्यात आल्या आहेत. कोरोना महामारीसारखी परिस्थिती उद्भवू नये, त्यासाठी भारत सरकारने आधीच तयारी सुरु केली आहे. करोना संकटानंतर चीनमध्ये आता लहान मुलांच्या श्वसनविकाराची साथ आली आहे. यामुळे अनेक देशांनी सावधगिरीची उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सावधगिरीचा उपाय म्हणून आरोग्यविषयक उपाययोजनांचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. वाचा सविस्तर...
29 November In History : जेआरडी टाटा यांची पुण्यतिथी, आजच्या दिवशी काय काय घडलं?
What Happened on November 29th This Day in History : आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे 29 नोव्हेंबर रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. जहांगीर रतनजीभाई टाटा यांची आज पुण्यतिथी आहे. 1993 मध्ये आजच्याच दिवशी त्यांचे निधन झालं होतं. त्याशिवाय ताज हॉटेल दहशतवाद्यांपासून मुक्त करण्यात पोलिसांना यश आले होते. त्याशिवाय आजच्या दिवशी इतिहासात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत. वाचा सविस्तर...
Horoscope Today 29 November 2023 : आजचा बुधवार खास! मेष ते मीन राशीसाठी कसा असेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या
Horoscope Today 29 November 2023 : राशीभविष्यानुसार आज, म्हणजेच 29 नोव्हेंबर 2023, बुधवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, मिथुन राशीचे लोक आज आपल्या नोकरीत आत्मविश्वासाने राहतील, त्यांना प्रगतीच्या संधी मिळतील. कन्या राशीचे लोक आज समाधानी राहतील, तुमच्या मुलांच्या भविष्याबद्दलही तुम्ही आनंदी असाल. सर्व राशीच्या लोकांसाठी बुधवार कसा राहील? जाणून घेऊया सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा सविस्तर...