Abhishek Bachchan On Aaradhya Bachchan: ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर आराध्याचं काय मत होतं? अभिषेक बच्चन म्हणाला...
Abhishek Bachchan On Aaradhya Bachchan: बॉलिवूडच्या ए-लिस्ट कपलपैकी एक म्हणून ओळखलं जाणारं अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांना अनेकदा ट्रोलर्सचा सामना करावा लागतो.

Abhishek Bachchan On Aaradhya Bachchan: काही महिन्यांपासून बॉलिवूड (Bollywood News) कपल ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) एकमेकांपासून वेगळं होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं. असं सांगितलं जात होतं की, ऐश्वर्या आणि अभिषेक वेगळे राहत असून घटस्फोट घेणार आहेत. पण, नंतर या जोडप्यानं सर्व चर्चांना पूर्णविराम देत स्पष्टीकरण दिलं. आता अभिषेक बच्चननं त्याची मुलगी आराध्य बच्चनची (Aaradhya Bachchan) आई-वडिलांच्या घटस्फोटाच्या चर्चांवर प्रतिक्रिया काय होती? यावर भाष्य केलं आहे.
बॉलिवूडच्या ए-लिस्ट कपलपैकी एक म्हणून ओळखलं जाणारं अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांना अनेकदा ट्रोलर्सचा सामना करावा लागतो. गेल्या कित्येक दिवसांपासून दोघांच्या नात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. अलिकडच्याच एका मुलाखतीत बोलताना अभिषेक बच्चननं त्याच्या पालकांच्या घटस्फोटाच्या अफवांवर आराध्य बच्चनचं काय म्हणणं आहे, याबाबत सांगितलं. याशिवाय अभिषेक बच्चननं खुलासा केला की, त्याची मुलगी 14 वर्षांची आहे आणि तिच्याकडे फोन नाही, याचं कारण की, ती तिची आई ऐश्वर्या आणि माझ्याबाबत गुगल करू नये.
अभिषेक बच्चननं सांगितलं की, आराध्या बच्चनला त्याच्या आणि ऐश्वर्या रायच्या घटस्फोटाभोवतीच्या अफवांची माहिती नाही. अलिकडेच पीपिंग मूनला दिलेल्या मुलाखतीत, अभिनेत्यानं खुलासा केला की, आराध्याचा स्वतःचा फोन नाही. याशिवाय, आराध्याला या अफवांपेक्षा तिच्या अभ्यासात जास्त रस आहे. शिवाय, अभिनेत्यानं आराध्यावर केलेल्या संस्कारांसाठी ऐश्वर्याचं कौतुकही केलं आहे.
आराध्याची प्रतिक्रिया कशी होती?
PeepingMoon शी बोलताना अभिषेक म्हणाला, "ऐश्वर्यानं आराध्याच्या मनात सिनेसृष्टीबाबत प्रचंड आदर निर्माण केलाय. तिनं तिला आम्ही दोघे काय करतो, हे स्पष्टपणे समजावून सांगितलं आहे. चित्रपट आणि प्रेक्षकांनी आम्हाला जे दिलंय, ते आम्ही आहोत. आराध्या एक कॉन्फिडेंट टीनेज म्हणून मोठी होतेय. तिचं स्वतःचं मत आहे. जर तिचं एखाद्या गोष्टीवर वेगळं मत असेल, तर आम्ही त्यावर चर्चा करतो. तिचा स्वतःला व्यक्त करण्याचा एक अतिशय नैसर्गिक मार्ग आहे. आराध्या तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत करतेय. तिच्याकडे मोबाईल फोन नाही. ती 14 वर्षांची आहे. जर आराध्याच्या कोणत्याही मैत्रिणीला तिच्याशी बोलायचं असेल तर ते ऐश्वर्याच्या फोनवर कॉल करतात. ऐश्वर्या आणि मी हे खूप आधीपासूनच ठरवलं होतं. जरी आराध्याकडे इंटरनेट वापरण्याच्या सोयी सुविधा आहेत, तरीसुद्धा ती तिचा बहुतेक वेळ होमवर्क पूर्ण करण्यात किंवा रिसर्च करण्यात घालवते... तिला शाळा खूप आवडते..."
'मला नाही वाटत की, तिनं गुगलवर आमचं नाव...'
अभिषेक आराध्याबाबत बोलताना पुढे म्हणतो की, "आराध्याला तिचा होमवर्क करायला खूप आवडतं. तिला शाळाही खूप आवडते. त्यामुळे मला नाही वाटत की, ती गुगलवर आमची नावं शोधेल... ती कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवणार नाही... तिच्या आईनं तिला खूप व्यवस्थितपणे शिकवलंय की, जे काही तिला ऐकू येईल किंवा तिला समजेल त्यावर तिनं आंधळेपणानं विश्वास ठेवू नये. जसे माझे आई-वडील माझ्यासोबत होते, आम्ही कुटुंबासोबत विश्वासानं राहतो. त्यामुळे अशी वेळ कधीच आलेली नाही की, कोणाच्याही हेतूबाबत कधीही कुणाला शंका आली आहे..."
अभिषेक बच्चननं खुलासा केलाय की, जेव्हा ऐश्वर्या गरोदर राहिली तेव्हा त्यानं स्मोकिंग आणि ड्रिंकिंग सोडलेलं. याला दुजोरा देत अभिषेक म्हणाला की, "हो, मी दोन्ही सवयी सोडलेल्या. आता मी दोन्ही गोष्टींना स्पर्शही करत नाही." अभिषेक आणि ऐश्वर्याचं 2007 मध्ये लग्न झालेलं आणि 2011 मध्ये आराध्याचा जन्म झालेला.























