एक्स्प्लोर

Morning Headlines 22nd February : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूजnd

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

McDonald's बर्गर खाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, FDA च्या कारवाईमुळे खाद्यपदार्थांतून 'चीज' गायब

मुंबई: अनेक खवय्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या 'मॅकडोनाल्ड' या साखळी रेस्तराँवर राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून (FDA) मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे 'मॅकडोनाल्ड'च्या मेन्यूमधून 'चीज'  गायब होणार आहे.  गेल्या काही वर्षांमध्ये शहरी आणि निमशहरी भागात 'मॅकडोनाल्ड'चे बर्गर (McDonald's Burger) आणि तत्सम पदार्थ प्रचंड लोकप्रिय झाले आहेत. विशेषत: तरुण वर्गाकडून 'मॅकडोनाल्ड' रेस्तराँमधील पदार्थांचे सर्रास सेवन केले जाते. यामध्ये चीज असलेल्या बर्गर व अन्य पदार्थांना अधिक पसंती दिली जाते. परंतु, अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईमुळे आता 'मॅकडोनाल्ड'कडून त्यांच्या मेन्यूतून चीज हा शब्द हटवण्यात आला आहे. वाचा सविस्तर 

मुंबईतील 19 स्थानके होणार अद्यावत, अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत पंतप्रधान करणार कामाच्या शुभारंभ

19 suburban railway stations  : मुंबईच्या प्रवाशांसाठी अनदांची बातमी आहे. मुंबईतील 19 उपनगरीय स्थनाकांचा अमृत भारत स्थानक योजने अंतर्गत पुनर्विकास करण्यात येणार आहे. 26 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी या योजनेचा शुभारंभ करतील. दिल्लीतील कार्यक्रमातून दूर दृश्य प्रणाली द्वारे हा शुभारंभ केला जाईल. वाचा सविस्तर 

Farmer Protest : शेतकरी आंदोलनात एकाचा मृत्यू? संघटनांनी दिल्ली मोर्चा 2 दिवसांसाठी पुढे ढकलला, पोलिसांनी दावा फेटाळला

Farmer Protest : आपल्या विविध मागण्यांसाठी पंजाब (Punjab) आणि हरियाणातील शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र अशातच हरियाणा सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांने असा दावा केला आहे की, बुधवारी पोलिसांशी झालेल्या चकमकीत एका 21 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. मात्र, पोलिसांनी हा दावा अफवा असल्याचे फेटाळून लावले आहे... वाचा सविस्तर 

Weather Update : देशभरात हवामानात सातत्याने बदल, राज्यात उकाड्यात वाढ, कुठे होणार पाऊस? हवामानाचे ताजे अपडेट जाणून घ्या

Weather Update : सध्या देशभरात हवामानात सातत्याने बदल होत आहेत. राज्यात थंडी जवळपास गायब झाली असून सगळ्याच जिल्ह्यांमध्ये तापमानात वाढ होऊ लागली आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे डोंगराळ भागात बर्फवृष्टी झाली असून हवामानात बदल दिसत आहे. याचा परिणाम राज्यावर होताना दिसत आहे. या संदर्भात भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) एक अपडेट जारी करून सांगितले की, पुढील 3 दिवस उत्तर-पश्चिम भारतातील काही भागात पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रातील स्थिती पाहता पुणे, मुंबई, नागपूर, जळगाव, अकोला, वर्धा यासारख्या काही जिल्ह्यांमध्ये दिवसा तापमानाचा पारा 35 डिग्री सेल्सिअसवर पोहोचत आहे. त्यामुळे उकाड्यातही मोठी वाढ झाली आहे. अशातच आता राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मात्र पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाचा सविस्तर

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, 31 मार्चनंतरही तांदळाच्या निर्यातीवर 20 टक्के निर्यात शुल्क कायम

Rice Export Duty : तांदूळ निर्यातीच्या (Rice Export) बाबातीत केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. 31 मार्च 2024 नंतरही तांदळाच्या निर्यातीवर 20 टक्के निर्यात शुल्क सुरू ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं (Central governments) घेतला आहे. काल (21 फेब्रुवारी) नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यासह अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. वाचा सविस्तर 

और ये लगा सिक्स...! 'हा' खेळतो की मस्करी करतो? एका ओव्हरमध्ये सलग 6 सिक्स; BCCI कडून VIDEO शेअर

Vamshi Krishna Smashed Six Sixes In An Over: सध्या भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये अंडर-23 कर्नल सीके नायडू ट्रॉफी खेळवली जात आहे. या स्पर्धेत एका स्पर्धकानं आपल्या दमदार फलंदाजीनं सर्वांना चकीत केलं आहे. हा फलंदाज म्हणजे, आंध्रप्रदेशच्या (Andhra Pradesh) संघाकडून खेळणारा वामशी कृष्णा (Vamshi Krishna). आंध्र प्रदेशचा फलंदाज वामशी कृष्णानं आपल्या दमदार फलंदाजीनं सर्वांना चकित केलं आहे. या 22 वर्षीय तरुण फलंदाजानं कसोटी क्रिकेट फॉरमॅट स्पर्धेत टी-20 सारखी तुफानी फलंदाजी केली आणि एकाच ओव्हर्समध्ये सलग 6 षटकार ठोकले... वाचा सविस्तर 

Horoscope Today 22 February 2024 : आजचा गुरुवार खास! स्वामींच्या कृपेने ‘या’ राशीच्या व्यक्तींची अडकलेली कामं लागतील मार्गी, वाचा 12 राशींचं भविष्य

Horoscope Today 22 February 2024 : आजचा दिवस, गुरुवार 22 फेब्रुवारी 2024, काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी खास असणार आहे. सर्व राशीच्या लोकांसाठी गुरुवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या... वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
Jaya Kishori on Mahakumbh : 'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NCP News : शरद पवारांचा आमदार अजित पवारांच्या भेटीला, संदीप क्षीरसागरांना घेतली दादांची भेटSandeep Kshirsagar : जुन्नरमध्ये घेतली अजित पवारांची भेट, संदीप क्षीरसागरांना स्वतः सांगितलं कारणAnandache Paan:ऐतिहासिक रहस्य कादंबरी 'पतिपश्चंद्र' उलगडताना लेखक Dr. Prakash Koyade यांच्याशी गप्पाABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 16 February 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
Jaya Kishori on Mahakumbh : 'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
Elon Musk : अवघ्या तीन दिवसांपूर्वीच पीएम मोदींची सहकुटुंब भेट अन् आज एलाॅन मस्क यांचा थेट भारताला दणका!
अवघ्या तीन दिवसांपूर्वीच पीएम मोदींची सहकुटुंब भेट अन् आज एलाॅन मस्क यांचा थेट भारताला दणका!
Nashik Crime : चॉपरने केक कापणं भोवलं, 'बर्थडे बॉय'ला नाशिक पोलिसांनी दाखवला चांगलाच इंगा
चॉपरने केक कापणं भोवलं, 'बर्थडे बॉय'ला नाशिक पोलिसांनी दाखवला चांगलाच इंगा
मुंबईत कोळसा भट्टीवरील तंदुर रोटी बंद; हॉटेल्स, बेकर्स अन् रेस्टॉरंट चालकांना महापालिकेच्या नोटीसा
मुंबईत कोळसा भट्टीवरील तंदुर रोटी बंद; हॉटेल्स, बेकर्स अन् रेस्टॉरंट चालकांना महापालिकेच्या नोटीसा
Pune: पुण्यात कोंबड्यांमुळे GBSची लागण, अजित पवारांची माहिती; मात्र मांसाहार केल्यानेच जीबीएस सिंड्रोमचा आजार होतो का? डॉक्टर म्हणाले...
पुण्यात कोंबड्यांमुळे GBSची लागण, अजित पवारांची माहिती; मात्र मांसाहार केल्यानेच जीबीएस सिंड्रोमचा आजार होतो का? डॉक्टर म्हणाले...
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.