एक्स्प्लोर

Morning Headlines 17th January: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... 

Weather Update : थंडीचा जोर वाढला! पुढील 5 दिवसात तापमानात आणखी घट होणार; काय सांगतो IMDचा अंदाज?

Today's Weather Update : देशात आता थंडीचा जोर वाढलेला पाहायला मिळत आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशाच्या हवामानात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता आहे. देशाच्या उत्तरेकडे थंडी आणि दाट धुके पाहायला मिळतेय, तर काश्मीर खोऱ्यात बर्फवृष्टी होत आहे. पुढील काही दिवस थंडीची लाट कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने (IMD) अनेक राज्यांना थंडी आणि धुक्याचा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे... वाचा सविस्तर 

लोकसभेसाठी भाजपचा मास्टर प्लॅन, भाजपचे आमदार होणार खासदार?

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक (Lok Sabha 2024)  आता हाकेच्या अंतरावर येऊन ठेपली आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपनेही (BJP)  लोकसभेसाठी महाराष्ट्रासाठी मिशन 48 चा नारा दिला आहे. त्यासाठीचा मास्टर प्लॅनही भाजपने केल्याचं समजतंय. त्याचाच एक भाग म्हणजे, महाराष्ट्रातील अनेक आमदारच लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवणार असल्याचं समजत आहे... वाचा सविस्तर 

Shinde vs Thackeray: व्हिप न मानणाऱ्या ठाकरे गटातील आमदारांना अपात्र करा; शिंदे गटाकडून हायकोर्टात याचिका, आज सुनावणी

Shiv Sena MLA Disqualification Case : मुंबई : आमदार अपात्रतेबाबतच्या (Shiv Sena MLA Disqualification Case) याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) सुनावणी पार पडणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी दिलेल्या निकालाला शिंदे गटाकडून (Shinde Group) हायकोर्टात (HC) आव्हान देण्यात आलं आहे... वाचा सविस्तर 

Gold Rate Today : सोने-चांदी झाली स्वस्त, दरवाढीतून किंचित दिलासा; तुमच्या शहरातील लेटेस्ट दर पाहा

Gold Silver Rate Today, 17 January 2024 : भारतीय सराफा बाजारात आज सोने-चांदी स्वस्त झाल्याने (Gold Silver Price Today) ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. सध्या लग्नसराईच्या खरेदीला जोर आला आहे, त्यामुळे सराफा बाजारात चांगलीच गर्दी पाहायला मिळत आहे. आज सोन्याचा दर 110 रुपयांनी कमी झाला आहे. सोने-चांदी खरेदी आधी आज सोने-चांदीचा दर काय आहे, हे जाणून घ्या. गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, आज 17 जानेवारी 2024 रोजी बुधवारी 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Silver Price)  प्रतितोळा 5805 रुपये आहे, तर 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 6333 रुपये आहे... वाचा सविस्तर 

Iran Missile Attack on Pakistan : पाकिस्तानवर इराणचा एअरस्ट्राईक; दहशतवादी स्थळांवर डागली क्षेपणास्त्र

Iran Missile Attack on Pakistan : नवी दिल्ली : Iran (Iran) पाकिस्तानमधील (Pakistan) दहशतवादी गटाच्या तळांवर एअरस्ट्राईक (Air Strike) केल्याचा दावा केला आहे. बलुचिस्तानमधील (Balochistan) पंजगुरमध्ये हा हवाई हल्ला करण्यात आला. जैश-अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या तळांवर हल्ला केल्याची माहिती इराणकडून देण्यात आली आहे. पाकिस्तानं इराणकडून करण्यात आलेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे... वाचा सविस्तर 

फ्रीमध्ये पाणीपुरी खायला घालण्याचा टोळ्याकडून आग्रह, नकार दिल्यानं जबर मारहाण, व्यक्तीचा मृत्यू

Crime News: कदाचितच कोणी असेल, ज्याला पाणीपुरी (Panipuri) आवडत नाही. पण याच पाणीपुरीमुळे एक व्यक्ती आपल्या जीवाला मुकला आहे. उत्तर प्रदेशात एका पाणीपुरीवाल्यानं फ्रीमध्ये पाणीपुरी न दिल्यामुळे त्याला जबर मारहाण करण्यात आली. याच मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेत याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर त्याच्या आधारे कारवाई केली जाईल, असं पोलिसांचं म्हणणं आहे... वाचा सविस्तर 

IND vs AFG 3rd T20I Match: वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाचा शेवटचा टी20 सामना आज; अफगाणिस्तानचा सुपडा साफ करण्यासाठी धुरंधर तयार!

India vs Afghanistan 3rd T20I Match: मुंबई : टीम इंडिया (Team India) आणि अफगाणिस्तान (Afghanistan) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 सीरिजमधील (T20 Series) शेवटचा सामना आज खेळवण्यात येणार आहे. आजचा सामना बंगळुरूमधील (Bengaluru) के एम चिन्नास्वामी स्टेडियमवर (M. Chinnaswamy Stadium) खेळवण्यात येणार आहे... वाचा सविस्तर 

17 January In History: बेळगाव-बिदर मराठी भाषिक प्रदेश कर्नाटकमध्ये, एमजीआर यांचा जन्म, इतिहासात आज

On This Day In History: आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदवलेल्या (Today History) असतात. त्याला 17 जानेवारी हा दिवसही त्याला अपवाद नाही. आजचा दिवस इतिहासातील अनेक महत्वाच्या गोष्टींचा साक्षीदार आहे. आजच्याच दिवशी 1946 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची पहिली बैठक झाली होती... वाचा सविस्तर 

Horoscope Today 17 January 2024 : आजचा बुधवार खास! 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील? आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 17 January 2024 : राशीभविष्यानुसार, आज म्हणजेच 17 जानेवारी 2024, बुधवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, मेष राशीच्या लोकांनी आज हनुमानाचं स्मरण करावं, जेणेकरून त्यांच्या सर्व समस्या दूर होतील. कर्क राशीच्या लोकांनी आज आपल्या अभ्यासाकडे अधिक लक्ष द्यावं. सर्व राशीच्या लोकांसाठी बुधवार कसा राहील? सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य जाणून घ्या... वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Aditya Thackeray On EVM : ईव्हीएम नसतं तर भाजपला 40 जागा देखील मिळाल्या नसत्या, आदित्य ठाकरेंचा टोलाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024Amol Mitkari On Hindu Rastra : 500 पार झाला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही, अमोल मिटकरींचे वक्तव्यABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
Embed widget