Monkeypox Virus : देशात मंकीपॉक्सचा वाढता धोका, संरक्षणासाठी काय करावं? केंद्र सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी
Monkeypox Virus : भारतात मंकीपॉक्सचा धोका वाढत आहे. आतापर्यंत आठ रुग्णांची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.
Monkeypox Guidelines : जगभरात मंकीपॉक्स (Monkeypox) विषाणूचा प्रार्दुभाव वाढताना दिसत आहे. देशात आतापर्यंत मंकीपॉक्सच्या आठ रुग्णांची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून पाऊलं उचलण्यात येत आहे. मंकीपॉक्स विषाणूचा वाढता धोका पाहता, केंद्र सरकारने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. याआधीचं केंद्र सरकारकडून सर्व राज्यांच्या सरकारला मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
केंद्र सरकारने देशातील मंकीपॉक्सचा संसर्ग आणि परिस्थितीवर नजर ठेवण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना केली आहे. नीति आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करत आहे. या समितीमध्ये आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्यासह इतर अधिकाऱ्यांचा समावेश आहे. केंद्र सरकारने आता नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दरम्यान, केंद्र सरकारने विविध लस निर्मिती कंपन्यांना मंकीपॉक्स विरोधी लस तयार करण्याचं आवाहन केलं आहे.
Protect yourself from #Monkeypox. Know what you should and should not do to avoid contracting the disease.
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) August 3, 2022
For more information, visit https://t.co/4uKjkYncqT pic.twitter.com/Zz9tYec9JR
काय करावं?
- मंकीपॉक्सची लागण झालेल्या रुग्णाच्या किंवा मंकीपॉक्ससदृश्य लक्षणं आढळलेल्या व्यक्तींच्या संपर्कात राहू नये.
- मंकीपॉक्स संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात राहिल्यास मास्क आणि सर्जिकल हँड ग्लव्हजचा वापर करावा.
- हात स्वच्छ ठेवावेत. साबण किंवा हँड सॅनिटायझरचा वापर करुन हात साफ ठेवावेत.
- तुम्हाला मंकीपॉक्सची लक्षणं आढळल्यास आयसोलेशनमध्ये राहून आरोग्य अधिकाऱ्यांना माहिती द्यावी. सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळा.
काय करु नये?
- मंकीपॉक्स संक्रमित किंवा मंकीपॉक्ससदृश्य लक्षणं आढळलेल्या व्यक्तीचे कपडे वापरू नये.
- मंकीपॉक्सची लागण झालेल्या व्यक्तीच्या कपड्यांसोबत तुमचे कपडे धुवू नका.
- मंकीपॉक्स संक्रमित व्यक्तीसोबत लैंगिक संबंध टाळा.
- मंकीपॉक्स संक्रमित किंवा मंकीपॉक्ससदृश्य लक्षणं आढळलेल्या व्यक्तीची भांडी वापरू नये.
- चुकीच्या माहितीच्या आधारे कुणालाही घाबरवू नये.
मंकीपॉक्सची लक्षणं काय?
तज्ज्ञांच्या मते 'मंकीपॉक्स' हा एक दुर्मिळ विषाणू आहे. ताप आलेल्या व्यक्तीमध्ये जे सामान्य लक्षणे दिसतात, तीच लक्षणे यात दिसून आली आहेत. यामध्ये संक्रमित व्यक्तीच्या संपूर्ण शरीरावर आणि चेहऱ्यावर पुरळ दिसू लागते. याशिवाय ताप, स्नायू दुखणे, डोकेदुखी, थंडी वाजून येणे आणि थकवा अशी लक्षणे दिसू शकतात.
कसा वाढतो संसर्गाचा धोका?
संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांना या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. हा विषाणू त्वचा, श्वसनमार्गातून किंवा डोळे, नाक आणि तोंडातून आपल्या शरीरात प्रवेश करू शकतो. तसेच, संक्रमित प्राणी देखील या विषाणूचे सक्रिय वाहक असू शकतात. अशा प्राण्याच्या संपर्कात आल्याने, किंवा विषाणू-दूषित वस्तूंद्वारे देखील ‘मंकीपॉक्स’ पसरू शकतो. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये ‘मंकीपॉक्स’ची सर्वाधिक प्रकरणे आढळतात. मुख्यतः आंतरराष्ट्रीय प्रवासामुळे किंवा आयात केलेल्या प्राण्यांमुळे हा विषाणू पसरतो.
मंकीपॉक्सवर लवकरच येणार लस
सीरम इन्स्टिट्यूटचे (SII) सीईओ अदार पूनावाला यांनी सांगितलं आहे की, 'लवकरच मंकीपॉक्स लस उपलब्ध होईल. त्यावर संशोधन सुरु आहे. गेल्या काही महिन्यांपासून मंकीपॉक्सचा विषाणू जगातील अनेक देशांमध्ये वेगाने पसरत आहे. आता भारतातही मंकीपॉक्स विषाणूची अनेक प्रकरणं समोर आली आहेत, अद्याप अनेक रुग्णांचा अहवाल येणं बाकी आहे. सीरमकडून लस तयार करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. काही महिन्यांत लस उपलब्ध होईल.'
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Monkeypox Vaccine : मोठी बातमी! मंकीपॉक्स विषाणूवर लवकरच येणार लस, सीरम इंस्टिट्यूटकडून संशोधन सुरु
- Monkeypox : मंकीपॉक्सचे सर्वाधिक रुग्ण समलिंगी संबंध ठेवणारे, WHO ची माहिती, एकपेक्षा जास्त लैंगिक संबंध टाळण्याचा सल्ला
- Monkeypox : मंकीपॉक्स आणि चिकनपॉक्समधील फरक काय? जाणून घ्या, त्यावरील उपचार पद्धती
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )