(Source: Poll of Polls)
Monkeypox : मंकीपॉक्सचे सर्वाधिक रुग्ण समलिंगी संबंध ठेवणारे, WHO ची माहिती, एकपेक्षा जास्त लैंगिक संबंध टाळण्याचा सल्ला
WHO On Monkeypox : जगभरात मंकीपॉक्सच्या वाढत्या प्रादुर्भावानं चिंता वाढवली आहे. मंकीपॉक्सची लागण होण्यामागे आता आणखी एक कारण उघड झालंय.
WHO On Monkeypox : जगभरात मंकीपॉक्सच्या वाढत्या प्रादुर्भावानं चिंता वाढवली आहे. मंकीपॉक्सची लागण होण्यामागे आता आणखी एक कारण उघड झालंय. समलैंगिक संबंध असणाऱ्या आणि एकापेक्षा अधिक व्यक्तींशी लैंगिक संबंध ठेवणाऱ्या पुरुषांना मंकीपॉक्सचा धोका अधिक आहे. मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव टाळण्याकरता एकापेक्षा अधिक व्यक्तींसोबतचे लैंगिक संबंध टाळा, असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे.
न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन' मध्ये प्रकाशित संशोधनानुसार, मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव 95 टक्के प्रकरणांत लैंगिक क्रियांद्वारे झाला आहे. आणि संक्रमित झालेल्यांपैकी 98 टक्के समलिंगी किंवा उभयलिंगी (स्त्री आणि पुरुष दोघांसोबत लैंगिक संबंध ठेवणारे) पुरुष होते. या संशोधनात एकूण 528 संक्रमित लोकांवर संशोधन करण्यात आलंय.
अलीकडेच, WHO ने मंकीपॉक्स महामारीला जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणूनही घोषित केलं आहे. आता WHO ने लैंगिक साथीदारांची संख्या मर्यादित ठेवण्याचा सल्ला दिला आहे. डब्ल्यूएचओने सल्ला दिला आहे की, 'ज्या पुरुषांना मंकीपॉक्सचा धोका आहे, त्यांनी काही काळासाठी लैंगिक साथीदारांची संख्या मर्यादित करण्याचा विचार करावा. ' 78 देशांमध्ये मंकीपॉक्सची 18 हजारांहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यापैकी सुमारे 70 टक्के प्रकरणे युरोपमधील आहेत. बहुतेक संक्रमण समलैंगिक पुरुषांमध्ये झाले आहे. भारतात सध्या मंकीपॉक्सचे चार रुग्ण आहेत आहेत. यांपैकी तीन केरळमधील असून एक रुग्ण दिल्लीतील आहे. मंकीपॉक्स प्रादुर्भाव रोखण्याकरता जनजागृतीसोबतच यंत्रणांनाही अलर्ट मोडवर राहाणं गरजे आहे.
मंकीपॉक्सची लक्षणे काय?
सामान्यत: ताप, डोकेदुखी, तीन आठवड्यांपर्यंत पुरळ, घसा खवखवणे, खोकला आणि फोड ही मंकीपॉक्सची लक्षणे आहेत. फोड साधारणपणे ताप आल्यानंतर एक ते तीन दिवसांच्या आत सुरू होतात, सुमारे दोन ते चार आठवडे टिकतात आणि उपचार सुरू राहेपर्यंत अनेकदा वेदनादायक असतात. त्यांना खाजही येते. मंकीपॉक्स विषाणूचा तळवे आणि तळवे यांच्यावर विशेष प्रभाव पडतो.