कोरोनाविरोधात भारताने मंजुर केलेल्या Molnupiravir टॅब्लेट विषयी जाणून घ्या सर्व काही
भारतीय औषध नियामक यांनी मंगळवारी (28 डिसेंबर) पहिली अँटी-व्हायरल कोविड-19 टॅब्लेट मोल्नुपिराविरला मंजुरी दिली आहे.
Molnupiravir : देशात लवकरच कोरोनावरील टॅब्लेट्स मिळणार आहेत. सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) च्या तज्ञ समितीने सोमवारी कोरोनावरील टॅब्लेट मोल्नुपिराविरचा देशात आपात्कालिन परिस्थितीत वापर करण्याची शिफारस केली होती. भारतीय औषध नियामक यांनी मंगळवारी (28 डिसेंबर) पहिली अँटी-व्हायरल कोविड-19 टॅब्लेट मोल्नुपिराविरला मंजुरी दिली आहे. यूएस-स्थित बायोटेक्नॉलॉजी कंपनी रिजबॅक बायोथेरप्युटिक्सने यूएस फार्मा कंपनी मर्कच्या सहकार्याने विकसित केलेली ही टॅब्लेट आता 13 भारतीय औषध उत्पादकांद्वारे तयार केली जाईल.
मोल्नुपिराविर (MK-4482, EIDD-2801) ही कॅप्सूल सुरुवातीला इन्फ्लूएंझाच्या उपचारासाठी विकसित केले गेले, हे कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी तयार करण्यात आलेली अँटी-व्हायरल टॅब्लेट आहे. मोल्नुपिराविर टॅब्लेट तोंडा वाटे घेतली जाईल. प्रौढांना आणि ज्यांना कोरोनाचा धोका जास्त आहे अशा लोकांच्या उपचारासाठी या टॅब्लेटचा वापर भारतात केला जाईल.
हे नियम पाळण्यात येतील
रिपोर्टनुसार, या टॅब्लेट्सचा वापर 93 टक्के एसपीओ2' असलेल्या प्रौढ रूग्णांसाठी तसेच मृत्यूचा उच्च धोका असलेल्या रूग्णांसाठी केला जाऊ शकतो. 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांनाच ही गोळी देण्यात येणार आहे. तसेच डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय ही गोळी देण्यात येणार नाही.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की, 13 भारतीय औषध उत्पादक हे या टॅब्लेटचे देशांतर्गत उत्पादन करतील. डॉ. रेड्डी लॅबोरेटरीज, सिप्ला, नॅटको फार्मा, ऑप्टिमस फार्मा प्रायव्हेट लिमिटेड, स्ट्राइड, आणि हेटेरो हे औषध उत्पादक या टॅब्लेट्सचे उत्पादन करतील.
ओमायक्रॉनबाधितांच्या (Omicron) संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. देशभरातील 21 राज्यांमध्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये कोविड-19 चा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या 650 हून अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद महाराष्ट्र आणि दिल्लीत झाली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Coronavirus Update : देशात कोरोनाची तिसरी लाट अटळ? दिल्लीत 496, तर मुंबईत 1377 दैनंदिन कोरोना रुग्ण
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha