एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी मोदींचं ट्रम्पना निमंत्रण
ट्रम्प सरकार भारताच्या निमंत्रणावर गांभीर्याने विचार करत असल्याचे संकेत आहेत.
नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण पाठवण्यात आलं. या निमंत्रणावर ट्रम्प यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
एप्रिल महिन्यात ट्रम्प यांना हे निमंत्रण पाठवण्यात आलं. ट्रम्प सरकार भारताच्या या निमंत्रणावर गांभीर्याने विचार करत असल्याचे संकेत आहेत.
दोन्ही देशांदरम्यान झालेल्या अनेक राजकीय चर्चांचा विचार करुन केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी निमंत्रण स्वीकारल्यास परदेशी धोरणाबाबत केंद्रावर होणारी टीका निवळण्यास मदत होईल, असं मानलं जात आहे. ट्रम्प सरकारसोबत गोडी गुलाबीने वागण्यासाठी जगभरातील अनेक देशांच्या प्रमुखांनी प्रयत्न केले आहेत.
2015 मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा मोदी सरकारचे पहिले प्रमुख पाहुणे होते. 2016 मध्ये फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकस ओलांद, तर 2017 मध्ये अबुधाबीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी झाले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement