दूध, डिटर्जंट पावडर ते घरांच्या किंमती.., सर्व काही महागणार; जाणून घ्या काय आहे बातमी
Inflation : येत्या आठवड्याभरात दूध, साबण आणि पॅकबंद खाद्यपदार्थ यांसारख्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंपासून ते गृहोपयोगी वस्तू, कार आणि निवासी घरांच्या किमती महागणार आहेत.
मुंबई: एक वर्षाहून अधिक काळ राहणीमानाच्या खर्चात सातत्याने वाढ झाली आहे आणि यात आता तुम्हाला नवीन आर्थिक वर्षात थोडासा दिलासा मिळण्याची अपेक्षा असेल, तर चालू असलेला ट्रेंड तुम्हाला नक्कीच निराश करेल. आम्ही असं का म्हणतो आहोत यासाठी ही बातमी सविस्तर वाचा
दूध, साबण आणि पॅकबंद खाद्यपदार्थ यांसारख्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंपासून ते गृहोपयोगी वस्तू, कार आणि निवासी घरे यासारख्या ग्राहकांच्या बहुतेक वस्तूंच्या किमती येत्या आठवड्यात आणखी वाढण्याची शक्यता आहे.
दुधाच्या किंमती वाढणार?
पॅकेज्ड दुधाच्या बाजारपेठेतील सर्वात मोठी कंपनी गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन किंवा अमूल लवकरच किमतीत वाढ करेल अशी अपेक्षा आहे. निविष्ठा खर्चात लक्षणीय वाढ झाल्यामुळे किमती वाढल्या आहेत. योगायोगाने मार्चच्या सुरुवातीला अमूलने दुधाचे दर किलोमागे २ रुपयांनी वाढवले होते. गोवर्धन डेअरी आणि गोवा आणि ओडिशातील राज्य सहकारी संस्थांनी एप्रिलमध्ये अनुक्रमे 4 रुपये आणि 2 रुपये प्रति किलोने दर वाढवले आहे असं आनंद-आधारित को-ऑपरेटिव्हचे व्यवस्थापकीय संचालक आर.एस. सोढी यांनी म्हटलं आहे
डिटर्जंट पावडरची किंमतही वाढणार?
हिंदुस्तान युनिलिव्हर - देशातील सर्वात मोठी फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुड्स (FMCG) कंपनी एप्रिलमध्ये त्वचेची काळजी आणि डिटर्जंटच्या किमती पुन्हा वाढवणार असल्याची बातमी आहे. कंपनीने गेल्या सहा महिन्यांत आधीच 5 वेळा किमती वाढवल्या आहेत. उद्योग क्षेत्रातील सूत्रांच्या मते, डोव्ह, लाइफबॉय यांसारख्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या साबणांवर त्याचा 10-20 टक्के परिणाम झाला आहे. डिटर्जंट आणि डिशवॉशर पोर्टफोलिओमध्ये असताना - व्हील आणि विम सारखे ब्रँड - 3-5 टक्क्यांनी महाग होणार आहेत.
कंपन्यांच्या उत्पादनांच्या कमाल किरकोळ किमतीत वाढ करण्याबरोबरच, HUL, Nestle आणि ITC सारख्या आघाडीच्या FMCG कंपन्या, grammage कमी करण्याचाही विचार करत आहेत - परिणामी समान किमतीत समान उत्पादनांचे प्रमाण कमी होते.
प्रवासी भाड्यातही वाढ
मारुती सुझुकी या आघाडीच्या वाहन निर्माता कंपनीने या आठवड्यात जवळपास सर्वच यूटीएस मॉडेल्सच्या किमती वाढवल्या आहेत. अल्टोची सर्वात परवडणारी ऑफर 6,000 रुपयांनी महाग झाली आहे, तर स्विफ्ट आणि वॅगनआर सारख्या सर्वाधिक विकल्या जाणार्या मॉडेलना आवृत्तीनुसार - 7,000 रुपयांची वाढ मिळाली आहे. ब्रीझा आणि सियाझ सारखे महागडे मॉडेल आता अनुक्रमे 11,000 रुपये आणि 12,000 रुपये महाग झाले आहेत.
टोयोटा मोटर्स इंडिया सारख्या इतर कंपन्यांनी त्यांच्या प्रवासी कारच्या किमतीत चार टक्के वाढ जाहीर केली आहे, तर किआ मोटर्स सोनेट आणि सेल्टोसच्या किंमती 36,000 रुपयांनी वाढल्या आहेत. Hyundai Motor India ने त्यांच्या लोकप्रिय क्रेटा कारच्या किमती रु. 5,000 ने वाढवल्या आहेत, तर प्रीमियम केअर मेकर Volvo ने XC40, XC60, XC90 आणि S90 सारख्या मॉडेल्सच्या किंमतींमध्ये 2-4 टक्के वाढ जाहीर केली आहे.
रॉयल एनफिल्डने 300CC वरील टू-व्हीलर मार्केट सेगमेंटवर त्यांची साहसी बाईक 400CC हिमालयनची किंमत 4,200 रुपायांनी वाढली आहे
घर विकत घेणंही महाग
निवासी रिअल इस्टेटच्या जगतात बहुतेक विकासक आधीच घरांच्या किमतींमध्ये 5-7 टक्के वाढ लागू करण्याच्या प्रक्रियेत आहेत, क्रेडाई (CREDAI) माहितीनुसार देशातील सर्वोच्च रिअल इस्टेट संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्षवर्धन पटोदिया यांनीही सांगितले की घरांच्या किमतींमध्ये एकूण 10-15 टक्क्यांनी वाढ होणार आहे, कारण कच्चा माल आणि लॉजिस्टिक्सच्या वाढत्या किंमतीमुळे विकासकांना दुसरा पर्याय उरलेला नाही.
त्यामुळे केवळ इंधनच नव्हे तर सगळ्याच क्षेत्राला महागाईचा फटका बसत असल्याने आता याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार असून याचा थेट फटका आर्थिक आयुष्याला बसणार असल्याचं तज्ज्ञांचे म्हणणं आहे.
महत्त्वाच्या बातम्या: